वर्तुळ...

Submitted by स्मिता द on 23 December, 2009 - 02:38

पुन:प्रत्यय

वर्तुळ...

काल सहज जाता जाता
आजुबाजुला बघितले तर
प्रत्येकाभोवती ज्याची त्याची वर्तुळे
लहान वर्तुळे,मोठी वर्तुळे
अर्ध वर्तुळे, पुर्ण वर्तुळे
हसरी वर्तुळे,रडणारी वर्तुळे
मग मी माझ्या भोवती बघितले
वर्तुळच नव्हते
वर्तुळाच्या बंधनांना
मी कधी मानलेच नव्हते
अशी वर्तुळमुक्त मी
चालता चालता ,
एका वर्तुळात गेले
वर्तुळ हलले,रागाने फुत्कारले
सॉरी म्हणाले झटकन बाहेर पडले
डबडबलेल्या डोळ्यांनी बघितले
तर आता माझ्याभोवती पण वर्तुळ होते
तुडुंब पाण्याचे वर्तुळ.......

गुलमोहर: 

<< प्रत्येकाभोवती ज्याची त्याची वर्तुळे
लहान वर्तुळे,मोठी वर्तुळे
अर्ध वर्तुळे, पुर्ण वर्तुळे
हसरी वर्तुळे,रडणारी वर्तुळे >>

..
फारच उत्तम कविता...!!
........................................
स्वातंत्र्याच्या कक्षा जसजशा संकुचित होत जातात,
तसेतसे या वर्तुळामध्येच माणसाचे माणुसपण हरवत जाते..

छान Happy

बासुरी, इतके दिवस वर्तूळभ्रमण करायला गेली होतीस कि काय?

अप्रतिम कविता.. शेवटची ओळ "तुडुंब पाण्याचे वर्तूळ" खास.