कधी होतं ना अस, मन फारच उदास होऊन जाते.
काही रस वाटत नाही जीवनात. "जगण्यात राम राहिला नाही." असे म्हणतात ना, अगदी तसे होऊन जाते.
का कोणास ठाऊक का इतके हतबल होते मन ...
कधी एके काळी मला दुःखच नाही, असे ठाम पणे सांगणारी मी, आज का सुखाचा शोध घेते आहे? सुख ?.....सुख आहे माझ्याकडे ..हो आहे खरे ..पण मन स्थैर नाही. मन भटकतंय कुठेतरी... कुठेतरी कसे.....
आणि मग स्वतःशीच स्वतःचा संवाद सुरु होतो, आपलाच आपल्याशी अगदी नकळत पणे.
मी: तुझं मन तुला माहित हवे का दुःखी आहे. काय पाहिजे त्याला.
मीच: काय बोलणार, सगळे कॅल्युलेशन केले कि समजते, अरे हे तर नाही जमणार , नाही होणार , नाही शक्य. जिथे लिहायला जमत नाही, काय पाहिजे ते. तिथे, कसे मिळवता येणार ते?
मी: मग बस अशीच उदास.
मीच: मग काय, काय बोलणार कुणाला? आणि काय मागणार कुणाकडे ?
नको त्यापेक्षा कुठेतरी कामात गुंतवून घ्यावे स्वतःला .
कारण तुझ्या अपेक्षाही फार आहेत आणि नको त्या आहेत. राहा जरा शांत आणि तुझ्या समोर असलेली कामे कर जरा.
तुला बहुतेक कामाचं कमी पडलेत . जरा जास्तीच मोकळा वेळ भेटायला लागलाय. कोणाचा बहुतेक कंट्रोल नाही राहिला तुझ्यावर.
चांगले मनोगत.
चांगले मनोगत.
धन्यवाद, मन मोकळे करण्याचा
धन्यवाद, मन मोकळे करण्याचा प्रयत्न केला प्रामाणिक पणे.. आणि तोही काय बोलायचे आहे ह्याचा उलगडा होऊ न देता.