अवीट गोडीची अशी हटके गाणी हवी आहेत.

Submitted by रश्मी. on 22 August, 2013 - 09:15

मला अशा गाण्यांची माहिती ( नावे, चित्रपट किंवा गायक सुद्धा) हवी आहे की जी गाणी बर्‍याच जणांना माहीत आहेत पण नेहेमीच्या लिस्टमध्ये नाहीयेत. मी खाली उदाहरणे देतेय्,कृपया तुम्हाला माहीत असलेली आणी आवडत असलेली नवी जुनी गाणी, त्यांचे चित्रपट किंवा गायक यांच्या नावासहीत लिहा.

धन्नोंकी आंखोमें रातका सुरमा हे किताब मधले आर डी बर्मनचे धम्माल गाणे, एकदम हटके. गंमत म्हणजे हे गाणे मला बरीच वर्षे माहीत नव्हते. एकतर माझ्या जमान्यातली अमिर, सलमान शाहरुखचीच गाणी माहीत होती किंवा मग अतीशय जूनी अशी मुकेश, रफी यांचीच गाणी माहीत होती.

तर कृपया तुम्हालाही अशी गाणी आणी असे आवडलेले चित्रपट इथे लिहा. ( खरच मी किताब पाहिलेला नाही, आता मात्र जरुर पाहीन्.:स्मित:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.youtube.com/watch?v=g7QjIewLu6U
शोले सिनेमात एक कव्वाली असणार होती पण सिनेमा लांबला म्हणून ती कापून टाकली.
https://www.youtube.com/watch?v=5SVMfYZf7wo
सज्जाद हुसेनची एक रुस्तम सोहरब सिनेमातील कव्वाली. थोडी मध्यपूर्व संगीताची शैली आहे.

१. तुम्हारी नजारों मे हमने देखा अजबसी चाहत झलक रही है - आशा भोसले, कुमार सानू आणि श्रवण राठोड. चित्रपट - कल की आवाज १९९२
हमारी सासोंमे आज तक वो हिना कि खुशबू महक रही है - नूरजहाँ
https://www.youtube.com/watch?v=hI3PEDLGPKU
२. तू मेरी जिंदगी है - तस्सवर खानम
३. अगर तुम मिल जाओ - तस्सवर खानम
४. चिता कुक्कड़ बनेरे ते - मुस्सरत नाजिर
https://www.youtube.com/watch?v=EiRDDGt4Fu0
५. पंजाबी टप्पे - जगजित सिंग, चित्रा सिंग -
https://youtu.be/ERjFX8K_BmM
६. मेरे प्यार कि उमर हो इतनी सनम - लता मंगेशकर, मनमोहन सिंग. चित्रपट - वारिस १९८८
७. कहे तोसे सजना - शारदा सिन्हा - चित्रपट - मैने प्यार किया
८. अब मुझे रात दिन - सोनू निगम
९. खिलते है गुल यहाँ - किशोर कुमार - चित्रपट - शर्मिली १९७१
१०. पत्ता पत्ता बुटा बुटा - लता मंगेशकर, रफ़ी - चित्रपट - एक नजर

दिखाई दिये यूं कि बेखुद किया - लता मंगेशकर - चित्रपट - बाजार १९८२
फिर छिडी रात बात फुलोंकी - तलत अजीज, लता मंगेशकर - चित्रपट - बाजार १९८२

पहेली सिनेमातले आधि रात जब चांद ढले और कोइ ना हो पिछवाडे मे हे गाणं. यात जेव्हा राणिच्या बिदाई ची वेळ येते तेव्हाचं कडवं माझं सर्वात फेवरेट आहे ( गुडीया पटोले मोरे पासून). पहिली २ कडवी स्किप करून मी हे कडवं डायरेक्ट ऐकतो. या कडव्याच्या शेवटी (साधारण ४:५४ मिनिटापासून) असलेले सूर बहुतेक सनईचेच आहेत आणि माझे फेवरेट आहेत.
https://www.youtube.com/watch?v=0XFFOBzJ3aw

Aspirants web series: मोहभंग (पारूल मिश्रा)
कला : फेरो ना नजरिया आणि बिखरने का मुझको ( या चित्रपटातील इतर गाणी देखील छान आहेत )
बंदीश बँडिट्स वेब सीरिज : विरह आणि लब पर आये
हुस्ना by पियुष मिश्रा. हा माणूस अफलातून आहे, याची गुलाल मधली आणि गॅम्ग्स ऑफ वासेपूर मधली गाणी हटके आहेत)
कमांडो: सावन बैरी
ओमकारा: नैना ठग लेंगे
अग्निपथ ( नवीन): रुप कुमार राठोड यांचे जिंदगी ने पेहनी है ... ओ सैय्यां

वरील गाणी अगदी रोज रिपिट मोड वर ऐकू शकतो मी.

Pages