
गेल्या आठवड्यात अमेरिकेतील 32 वर्षीय Kelsey Hatcher यांनी एका विशेष प्रकारच्या ‘जुळ्या’ मुलींना जन्म दिल्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. या बाईंना चक्क दोन गर्भाशये असून त्या प्रत्येक गर्भाशयात एक मुलगी अशा प्रकारचे त्यांचे हे गरोदरपण होते.
(https://www.ndtv.com/world-news/us-woman-kelsey-hatcher-born-with-rare-d...).
अशी घटना दुर्मिळ असून ती कित्येक दशलक्ष स्त्रियांमध्ये १, या प्रमाणात आढळते. या प्रकारे जन्मलेल्या बालकांना ‘जुळी’ म्हणायचे का आणि म्हटल्यास कोणत्या प्रकारची जुळी, इत्यादी खल प्रसूतीतज्ञांमध्ये चालू आहेत. या निमित्ताने ‘जुळी बालके’ या विषयावरील काही मूलभूत रंजक माहिती वाचकांसमोर ठेवतो.
जेव्हा एका गरोदरपणात स्त्रीच्या गर्भाशयात एकाहून अधिक गर्भ निर्माण होतात त्या प्रकाराला बहुगर्भीय (Multifetal) गरोदरपण असे म्हटले जाते. त्यामध्ये एका वेळेस दोन, तीन किंवा त्याहूनही अधिक गर्भ असू शकतात. तूर्त आपण फक्त दोन गर्भाचा म्हणजेच जुळ्यांचा विचार करू.
जुळ्यांचे वर्गीकरण
यांचे दोन मूलभूत प्रकार आहेत :
1. एकसमान जुळे (monozygotic) : यामध्ये फक्त एकाच स्त्रीबीजाचे एका शुक्राणूमुळे फलन होते. पुढे त्याचा गर्भ झाल्यानंतर त्याचे दोन गर्भांमध्ये विभाजन होते.
2. विभिन्न जुळे : (dizygotic) : यामध्ये दोन स्वतंत्र स्त्रीबीजांचे दोन स्वतंत्र शुक्राणूंमुळे फलन होऊन मूलतः दोन वेगळे गर्भ तयार होतात.
वरील प्रकारांपैकी सुमारे एक तृतीयांश जुळी पहिल्या (MZ) प्रकारची, तर दोन तृतीयांश दुसऱ्या प्रकारची (DZ) असतात.
चित्र पहा :
कारणमीमांसा
१. एकसमान जुळे : याची कारणे विज्ञानाला अद्याप ज्ञात नाहीत.
२. विभिन्न जुळे : याचे मूलभूत कारण म्हणजे स्त्रीबीजांडातील एकाहून अधिक बीजांचे ovulation होते. असे होण्यास मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतील gonadotropins या हार्मोन्सची वाढलेली पातळी जबाबदार असते. अशी परिस्थिती स्त्रीच्या गरोदरपणाच्या वेळेसच्या वाढलेल्या वयामध्ये कॉमन असते. गेल्या 20- 25 वर्षात वंध्यत्वासाठी कृत्रिम गर्भधारणेच्या(assisted reproductive technology)उपायांचा वाढता वापर होत आहे. या प्रकारच्या उपचारांमुळे एका वेळेस एकाहून अधिक स्त्री-बीजांचे ovulation होण्यास उत्तेजन मिळते आणि त्यातून बहुगर्भीय गरोदरपणे वाढतात.
३. जुळ्याच्या विभिन्न या प्रकाराबाबत काही अंशी कौटुंबिक आनुवंशिकता दिसून येते.
जुळ्यांचे जागतिक प्रमाण
सर्वसाधारणपणे अचानक उत्पन्न होणाऱ्या (spontaneous) जुळ्यांचे प्रमाण ८० गरोदरपणांमध्ये १ असे आहे. एकसमान जुळ्यांचे प्रमाण जागतिक पातळीवर साधारण सारखे आहे. परंतु विभिन्न जुळ्यांच्या बाबतीत देश आणि वंशानुसार मोठे फरक आढळतात. उदाहरणार्थ,
नायजेरियात त्यांचे प्रमाण दर १००० जन्मामागे ४९ एवढे, तर
जपानमध्ये ते दर हजारी फक्त १.३ एवढे आहे.
जुळ्यांची जैविक वैशिष्ट्ये
१. एकसमान जुळे : या दोघांचेही लिंग (दुर्मिळ अपवाद वगळता) एकच असते. तसेच त्या दोघांचाही जनुकीय संच (genome) जवळजवळ (९९.९९...%) एकसमान असतो.
२. विभिन्न जुळे : यांचे लिंग एक अथवा भिन्न असू शकते. तसेच प्रत्येकाचा जनुकीय संच (अन्य सामान्य भावंडांप्रमाणे) फक्त पन्नास टक्केच समान असतो. ते एकलिंगी असले तरीही त्या दोघांच्या बाह्यरूपामध्ये काही फरक असू शकतो.
समान जुळी : गर्भाशय वास्तव्य
ती गर्भाशयात असताना त्यांचे चार विविध प्रकार संभवतात. एका गर्भाचे दोनमध्ये विभाजन फलनाच्या कितव्या दिवशी होते यावर तो प्रकार अवलंबून असतो (चित्र पहा) :
वरीलपैकी,
क्र. 2 सर्वाधिक(70%) आढळतो.
क्र. 4 ( जोडलेली जुळी) अर्थातच वाईट आहे. त्यातली बऱ्याचदा जन्मताच मरण पावलेली असतात. काही जिवंत जोड्यांच्या बाबतीत प्रगत शस्त्रक्रियांच्या मदतीने त्यांना सुटी करण्यात यश येते.
..
आता वर उल्लेखलेल्या Kelsey Hatcher या बाईंच्या विशेष प्रसूतीबाबत :
१. आतापर्यंत त्यांची एकूण तीन गरोदरपणे झालीत. त्यापैकी पहिली दोन ही सामान्य स्वरूपाची असून त्यामध्ये प्रत्येक वेळेस एकच बालक जन्माला आलेले आहे.
२. या तिसऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गरोदरपणाला dicavitary pregnancy असे शास्त्रीय नाव आहे.
३. या गरोदरपणाचे 39 आठवडे झाले असताना त्यांना औषध देऊन प्रसूतीस उत्तेजित करण्यात आले (induced).
४. पहिली मुलगी योनीमार्गे जन्मली तर दुसरीच्या जन्माच्या वेळेस सिझेरियन करावे लागले.
५. या बाळंतपणाची झुंज एकूण वीस तास चालली होती. दोन्ही मुलींच्या जन्मवेळेत सुमारे दहा तासांचे अंतर पडले.
अशी ही आवळ्याजावळ्यांची कथा सुफल संपूर्ण !
*********************************************************************************************************
लेखातील चित्रे जालावरून साभार !
जुळे गरोदरपण आणि एक विचित्र
जुळे गरोदरपण आणि एक विचित्र घटना
अशा गरोदरपणांच्या सुमारे 36 टक्के प्रकरणांमध्ये Vanishing Twin Syndrome या प्रकारची घटना घडते. यामध्ये एका गर्भाची वाढ खुंटते आणि हळूहळू त्याचा नाश होतो. पण तो होत असताना त्याचे काही अंश जिवंत असलेल्या गर्भात शोषले जातात (resorbed). यामागे जनुकीय बिघाड व अन्य काही कारणे असू शकतात.
रंजक बाब पुढे आहे ..
बाळंतपपणात जे जिवंत मूल बाहेर येते त्याच्या शरीरात डीएनएचे दोन संच असू शकतात - एक त्याचा स्वतःचा आणि दुसरा त्या मृत झालेल्या जुळ्या गर्भाचा ! भविष्यात या बालकासंबंधी जर काही न्यायवैद्यकीय स्वरूपाच्या घटना घडल्या तर मग तेव्हाच्या डीएनए चाचणीत अशा गोष्टी उघडकीस येतात.
https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK563220/#:~:text=Vanishing%20twin%2....
या वैद्यकीय संकल्पनेवर आधारित सव्यसाची हा दक्षिणी चित्रपट काढलेला आहे (https://www.youtube.com/watch?v=0u1H9Z__bW4). त्यामध्ये जो नायक आहे त्याचा डावा हात त्याच्या स्वतःच्या नियंत्रणात नसून त्याच्या गर्भात मेलेल्या जुळ्या भावाची स्मृती आहे, असे कल्पनारंजन केलेले आहे !
नायक= विक्रम; त्याचा डावा हात = आदित्य >>> विक्रमादित्य !

‘ढिशाव- ढिशाव’ प्रकारचे दक्षिणी मसालेपट आवडत असतील तर बघायला हरकत नाही
यावरून Fetus in fetu is a
यावरून Fetus in fetu is a rare condition that has been defined as the presence of one of the twins in the body of the other हा प्रकार आठवला. अशी एक बातमी वाचली होती.
भरत,
भरत,
बरोबर ! वैद्यकीय जगतात पितृत्व दाव्यासंदर्भातील काही घटना नोंदवलेल्या आहेत. दोन जुळे भाऊ.... एकाच स्त्रीशी संबंध... मग तिचे मूल कोणाचं? .. वगैरे .
अवयवदानासंदर्भात दोन जुळ्यांचं एकमेकाशी सगळंच काही १००% “जुळेल” असे नसते. अशा अनेक गोष्टी यातून लक्षात येतात.

जेव्हा एका व्यक्तीत दोन जनुकीय उगमांमधील डीएनए संच एकत्र नांदतात त्याला chimera असे नाव आहे. ही ग्रीक पुराणातील संकल्पना असून खालील चित्रात तिथे स्वरूप दिसेल :
(सिंहासारखे डोके, बकरीसारखे शरीर व सर्पासारखे शेपूट असलेला तोंडातून आग ओकत असलेला काल्पनिक राक्षस)
बापरे. फारच complicated आहे
बापरे. फारच complicated आहे
>>>> Vanishing Twin Syndrome
>>>> Vanishing Twin Syndrome , chimera>>>> सगळच भन्नाट आहे.
((Vanishing Twin Syndrome))
((Vanishing Twin Syndrome))
भन्नाटच आहे हे...
डॉक्टर, तुमचा वैद्यकीय प्रांत आधीच जटिल आहे..त्यात अशा अदभुत आणि चमत्कारिक घटना जास्तच आव्हानात्मक वाटत असतील ना..
स्वासु,
स्वासु,
होय, खरंय...
...
chimera >>> यात अजून एक रोचक भाग आहे. प्रत्येक गरोदर स्त्रीमध्ये तिच्या गर्भाच्या पेशी (आणि पर्यायाने डीएनए) काही प्रमाणात तिच्या रक्तात जातात. बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत त्या गर्भपेशी दीर्घकाळ, तर काहींच्या बाबतीत त्या कायम राहतात. याला microchimerism असे म्हणतात.
>>>>यात अजून एक रोचक भाग आहे.
>>>>यात अजून एक रोचक भाग आहे. प्रत्येक गरोदर स्त्रीमध्ये तिच्या गर्भाच्या पेशी (आणि पर्यायाने डीएनए) काही प्रमाणात तिच्या रक्तात जातात. बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत त्या गर्भपेशी दीर्घकाळ, तर काहींच्या बाबतीत त्या कायम राहतात. याला microchimerism असे म्हणतात.
स्वीट!!! एकदा आई, कायमची आई
होणारं बाळ जर मुलगी असेल तर
होणारं बाळ जर मुलगी असेल तर तिच्या काही पेशी आधीपासून आजीच्या आणि नंतर आईच्या शरीरातून आलेल्या असतात असं काहीतरी वाचलं होतं. म्हणजे मुलगी आजीच्याही पोटात राहून आलेली असते असं काहीसं.. नेमके शब्द आठवत नाहीयेत
एकदा आई, कायमची आई >>> अगदी
एकदा आई, कायमची आई >>> अगदी अगदी !
..
chimera >> या संकल्पनेवर आधारित फॉरेन्सिक हा एक चांगला चित्रपट आहे (https://www.youtube.com/watch?v=wR3VaWbvYl8). एखादा माणूस chimera होण्याचे अजून एक कारण म्हणजे, त्याच्यामध्ये झालेले मूळ पेशींचे प्रत्यारोपण.
विविध रक्तकर्करोगांमध्ये किंवा अन्य काही आजारांत अन्य निरोगी व्यक्तीच्या मूळ पेशींचे प्रत्यारोपण रुग्णात करण्यात येते. त्यानंतर रुग्णाच्या रक्तपेशी या बराच काळ दुहेरी स्वरूपाच्या राहतात (मूळच्या स्वतच्या + दात्याच्या पेशींचा डीएनए). मग हळूहळू रक्तात फक्त दात्याच्या पेशींचा डीएनए येणे अपेक्षित असते. परंतु रुग्णाचे केस किंवा नखामधला डीएनए मात्र मूळचाच त्याचा स्वतःचा राहतो !
याच विज्ञानावर आधारित तो गुन्हेगारीपट आहे.
किल्ली बरोबर.
किल्ली बरोबर.
आजीच्या डीएनएपैकी 25% नातवंडांमध्ये येतो. त्या विषयाला अजूनही बरेच पैलू आहेत
इथे ते सचित्र समजावून सांगितले आहे :
https://www.thetech.org/ask-a-geneticist/articles/2011/ask435/
अर्थात ती थेट आनुवंशिकता आहे. वर वर्णन केलेला मुद्दा वेगळा आहे
काही मिनिटांच्या अतंराने
काही मिनिटांच्या अतंराने जन्मली जुळी मुलं तरी दोघांमध्ये आहे एका वर्षाचे अंतर; चिमुकल्यांच्या जन्मावेळी घडला दुर्मिळ योगायोग!
https://www.loksatta.com/trending/new-jersey-twins-arrive-minutes-apart-...
सध्या जुळयांची लाट दिसतीय.
सध्या जुळयांची लाट दिसतीय. >>
सध्या जुळयांची लाट दिसतीय. >>>

....
एका वर्षाचे अंतर; चिमुकल्यांच्या जन्मावेळी घडला दुर्मिळ योगायोग! >>> भारी !
2016 मधली अमेरिकेतली अजून एक गंमत बघा. ( https://www.kidspot.com.au/pregnancy/labour/the-younger-of-these-twins-i...)
एका स्त्रीने अर्ध्या तासाच्या अंतराने दोन जुळ्या मुलग्यांना जन्म दिला. त्यांच्या वेळा अशा होत्या :
सॅम्युएल मध्यरात्रीनंतर : 1.39a. m.
आणि त्यानंतर 31 मिनिटांनी रोनान जन्मला.
परंतु, अमेरिकेच्या तिथल्या भागातली घड्याळे 2a. m. ला अधिकृतपणे (Daylight Savings प्रकार) एक तासाने मागे करण्यात आली. त्यामुळे रोनानची अधिकृत जन्म वेळ ठरली 1.10 a. m.
म्हणजेच, रोनानचा जन्म वास्तवात सॅम्युएलपेक्षा उशिरा होऊनही कागदोपत्री तो (अर्ध्या तासाने) ‘ज्येष्ठ’ ठरला आहे !!!
उत्तम माहितीपूर्ण लेख व
उत्तम माहितीपूर्ण लेख व चर्चा.
गर्भवतीच्या पोटात बाळ आणि…
गर्भवतीच्या पोटात बाळ आणि… बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘!! बुलढाण्यात आढळला अतिदुर्मिळ प्रकार
https://www.loksatta.com/nagpur/buldhana-after-multiple-checks-woman-had...
वैद्यकीय परिभाषित या प्रकाराला Fetus in fetu असे म्हटले जाते. हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असून सुमारे पाच लाख जन्मांमध्ये एकदा या प्रमाणात आढळून येतो.
मुळात हे जुळे असते परंतु त्यातील एकाच बाळाची व्यवस्थित वाढ होते आणि त्याच्या शरीरात ( पोटात, डोक्यात इत्यादी) दुसरे बाळ अर्धवट वाढलेल्या स्थितीत राहते.
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3634279/
Pages