Submitted by ---पुलकित--- on 29 September, 2023 - 00:25

गदगदल्या सनईला,
गवसेना सूर
गहिवरल्या घना रे,
नको सोडू धीर
मावळता दिनकरही,
थबकला पळभर
हळहळते इंद्रायणी,
अहो अश्रूंचा पूर
दृष्टीने संवाद घडे,
दाटुनीया ऊर
शब्दांना मौन पडे,
सखा जाई दूर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
मला स्वतःला सखा च्या जागी बाप्पा आवडले असते.
छान !
छान !
धन्यवाद सामो, साद!
धन्यवाद सामो, साद!