Submitted by रघू आचार्य on 28 September, 2023 - 12:51
शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच त्याने गेट उघडून लवकर आलेल्या मुलांना आत घेतलं. पालकांना बाहेर ठेवले.
एव्हाना टीचर्स आल्या. वेळेत आलेल्या मुलांच्या रांगा लावल्या.
आधीची मुलं विचारू लागली. त्याने इशारा केला.
" पैसे आणलेत ?
"हे काय !"
" बस भरली कि हलेल. पुन्हा विचारू नका"
त्या मुलांना त्याने बसायची जागा दाखवली.
सगळ्या बसेस भरल्या. गलका झाला.
बसेस हलल्या. शाळा मोकळी झाली.
त्याने लपून बसलेल्या मुलांना इशारा केला.
" या, कुणी नाही. ऑफीस उघडून देतो. शांतपणे उत्तर पत्रिका लिहा सहल यायच्या आत "
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो प्रश्नपत्रिका विकत होता की
तो प्रश्नपत्रिका विकत होता की काय?
जबरी ट्विस्ट!
जबरी ट्विस्ट!
हायला! हा ट्विस्ट भारी आहे
हायला! हा ट्विस्ट भारी आहे
जबरी ट्विस्ट! +१
जबरी ट्विस्ट! +१
ट्विस्ट चांगला आहे पण
ट्विस्ट चांगला आहे पण टेक्निकली शक्य नाही.
का गं मामी. फुटतात की
का गं मामी. फुटतात की प्रश्नपत्रिका.
मस्त आहे आइडिया
मस्त आहे आइडिया
@ सामो, तो प्युन असतो.
@ सामो, तो प्युन असतो. बर्याच शाळेत प्युनकडे शाळा उघडण्यापासून हेडमास्तरांची केबिन इघडणे बंद करणे अशी कामे अस्तात. उत्तर पत्रिकांचे गठ्ठे ठेवणे वगैरे. अशा काही शाळा, कॉलेजेस मधे मुलं प्युनला धरतात. पेपर द्यायचा. सप्लीमेंट जोडायच्या. नंतर प्युनला पैसे दिले कि तो नेमक्या उत्तर पत्रिका आणून देतो. सुपरवायझर्स पण बरेचदा जास्तीच्या सप्लीमेंट सह्या करून ठेवत असतात. नंतर शिकाऊ शिक्षक परीक्षा संपेपर्यंत थांबतात..
त्या सप्लीमेंटस असतील तर त्याही मिळतात. नाहीतर आधी जोडलेल्या सप्लीमेंट मधे आधीची उत्तरं खोडून नवीन उत्तरं लिहायची. ग्रामीण भागात चालायचं हे.
होय आचार्य कळलं मला तो शिपाई
होय आचार्य कळलं मला तो शिपाई असतो ते / प्यून.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
भारी ट्विस्ट
भारी ट्विस्ट
कथा पटली नाही
कथा पटली नाही
आभार जाई.
आभार जाई.
कथा पटली नाही >> च्रप्स, तुमच्या मताचा आदर आहे.
च्रप्स, तुमच्या मताचा आदर आहे
च्रप्स, तुमच्या मताचा आदर आहे.>> ओह! गंगाधर ही शक्तीमान है (साधा माणूस = च्रप्स). फार काळ माबो नीट फॉलो केली नाही की काही काही कळत नाही आम्हाला.
मस्त ट्विस्ट!
मस्त ट्विस्ट!
मस्त जमलीयं..
मस्त जमलीयं..
कुठेना कुठे असं घडत असतेच .. पेपरात तर नेहमी येतात अश्या बातम्या..
मस्त! असं खरच घडतं.
मस्त!
असं खरच घडतं.
हो हो घडतं. खरंय. पटलं.
हो हो घडतं. खरंय. पटलं.
साधा माणूस = च्रप्स). फार काळ
साधा माणूस = च्रप्स). फार काळ माबो नीट फॉलो केली नाही की काही काही कळत नाही आम्हाला
>> सिक्रेट्स असे उघड करत जाऊ नका...
कथेबाबत- मला वाटते प्युन काय.. शिक्षक देखील असे करत असावेत.. फक्त विचारण्याची हिम्मत पाहिजे.. हिम्मत ची किंमत...
जर उघडकीस येणार नसेल तर प्रत्येक माणूस लबाडी करतोच... एकही अपवाद नाही...
मस्त . खूप आवडली .
मस्त . खूप आवडली .
थोडी गंमत - हलके घ्या
लपून बसलेली पोरं म्हणजे माबोवरची खोडकर पोरं असावीत !
>>>>>>जर उघडकीस येणार नसेल तर
>>>>>>जर उघडकीस येणार नसेल तर प्रत्येक माणूस लबाडी करतोच... एकही अपवाद नाही...
यु आर राँग!!
चांगली शशक आहे..
चांगली शशक आहे..
जबरी आहे.
जबरी आहे.