Submitted by स्वाती_आंबोळे on 23 September, 2023 - 11:33
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडं गेलं.
ती तिथेच दिसली ‘दो नंबर पर’ त्याच घड्याळाखाली
चोरट्या अधाशी भेटी जेथे घडल्या कोण्याकाळी
आणाभाकांना साक्षी ‘मनहर कहानियाँ’चा ठेला
दोघांमध्ये शेअर झालेला ‘चाय गरम’चा पेला
आठवले सारे तिचे तगादे ‘लग्न करूया’वाले
थोपवताना नाकी नऊच का, अठराही आलेले
स्लो लोकल स्लोअर होत होत मग पार बॅकला गेली
अन् ‘दो नंबर पर आनेवाली’ फास्ट ट्रॅकला गेली
तो अनाउन्समेन्टच्या आवाजाने भानावरती आला
पडलेला उचलुन चेहरा पुन्हा जागेवर लावला
‘बारिश की वजह से यातायात के आज बजेंगे बारा
यात्रियों से यही निवेदन है, वे… ललाटरारापारा…’
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी भारी. मस्तच.
भारी भारी. मस्तच.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
वाचलं होतं, पण तेवढा एक शब्द लक्षात ठेवणं ही कमाल आहे स्वाती आणि ते ओळखणे ही त्याहून जास्त कमाल वावे! दंडवत... .+१. >> +१११
पण कविता गाळीव नाही. >> हरपा मस्तच.
आतापर्यंत वाचलेल्या कथांतली
आतापर्यंत वाचलेल्या कथांतली गाडी -स्टेशन तो माहोल असलेली पहिलीच. तीही कवितेतून. मस्तच आहे.
<पण तेवढा एक शब्द लक्षात ठेवणं ही कमाल आहे स्वाती आणि ते ओळखणे ही त्याहून जास्त कमाल वावे! दंडवत..>+१.
मस्तच जमलंय हे पण.
मस्तच जमलंय हे पण.
वावे, मस्त डोकं लढवलंय.
>>> पण कविता गाळीव नाही
>>> पण कविता गाळीव नाही
हाहा थँक्यू थँक्यू!
साष्टांग दंडवत !!!
साष्टांग दंडवत !!! ललाटरारापारा काय ! ‘मनहर कहानियाँ’ काय ! ‘दो नंबर पर आनेवाली’ फास्ट ट्रॅकला गेली काय ! पडलेला उचलुन चेहरा पुन्हा जागेवर लावला काय !
कविता आणि प्रतिसाद दोन्ही
कविता आणि प्रतिसाद दोन्ही आवडले .
अरे इथे लिहायचे कसे विसरले !!
अरे इथे लिहायचे कसे विसरले !! भार्री जमलेली आहे ही!
एकदम डोळ्यासमोरच आले सगळे!
मस्त जमलीये. वावे, जबरीच !
मस्त जमलीये.
वावे, जबरीच !
फारच मस्त. विशेषतः मनहर
फारच मस्त. विशेषतः मनहर कहानिया ची खूप दिवसांनी आठवण झाली..

पूर्ण विसरून गेले होते..
पाकेट बुक्स , ठकठक- चंपक, हवेच्या उशा, प्लॅस्टिक चा spider man, चॅग्रॅम, थोटके नळ, मध्य रेल्वे खानपान व्यवस्था, उपरी उपस्कर ....आणि ललाटरारा....
मस्त लिहिली आहे काव्यमय शशक.
मस्त लिहिली आहे काव्यमय शशक.
तो पुलंच्या कथेचा स्क्रीनशॉट वाचून पुन्हा तितकाच हसलो जितका आधी कधी वाचली तेंव्हा हसायला आले होते
महालक्ष्मीला अर्परेलोल्फिं न्स्टनरो येथे दबाब दबाब खटर्रखुंट
पुणे स्टेशनवर पीएमटीचे स्थानक आहे तिथे पूर्वी एकदा बस मध्ये बसलो असता एक विक्रेता ओरडत होता
"मीठदे शेंदेलोन... मीठदे शेंदेलोन..."
मला कळेना नक्की काय विकतोय. साधे मीठ, शेंदेलोण, पादेलोण वगैरे? सहज मागे वळून त्याच्याकडे पाहिले तर तो मिड-डे आणि संध्यानंद विकत होता
भारी जमलीये . अशोक कुमार ने
भारी जमलीये . अशोक कुमार ने गायलेल्या रेलगाडी रेल गाडी रुक रुक च्या चालीवर म्हणता येतेय
मस्त झालीय काव्यात्मक शशक !
मस्त झालीय काव्यात्मक शशक !
वावे- सही एकदम पटकन संदर्भ लावला, जबरी स्मरणशक्ती!
मस्त
मस्त
लै भारी !
लै भारी !
भावना , स्थिती अन कविता - सारं .
ज्यांची वरळीची संधी गेली -
त्यांच्या ललाटी अरारा गेला चानस
प्रतिसादांमधून समजले शशक.
प्रतिसादांमधून समजले शशक..मस्तच!
कविता आवडली पण प्रतिसाद
कविता आवडली पण प्रतिसाद वाचूनही समजली नाही.
Pages