उपक्रम २ - शशक - निरागस हास्य - छन्दिफन्दि

Submitted by मीस्वच्छंदी on 20 September, 2023 - 21:27

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."

ती त्याच्याकडेच अपेक्षेने बघत होती.
तिचं निरागस हसू बघून त्याची पावलं सवयीनं तिच्याकडे वळली.
"आज दोन दे .."
टपोरे गुलाब ती देत असतानाच बस आली, तसं घाईघाईने जास्तीची दहाची नोट तिच्या हातात कोंबत तो तिथून सटकला.
"दादा .. दादा .. दहा जास्तीचे... "

तो तसाच बस मध्ये घुसला..

***
दोन स्टॉप आधीच उतरला,
वृद्धनिवासातल्या आर्यमाने आजींचा आज वाढदिवस, आठवणीने आणलेली फुले बघताच त्या अश्रूंच्या मागचा त्यांचा तो हसरा चेहरा ...

एका दगडात दोन पक्षी .. नव्हे...
एका दिवसात फुलवलेली दोन निरागस हास्ये..
समाधानाने तो स्वतःशीच हसला...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सकारात्मक आहे ही गोष्ट...
खरंच, खऱ्या आयुष्यात असे सकारात्मक विचारांचे कोणीतरी प्रत्येकाला भेटावे..