Submitted by शर्मिला. on 20 September, 2023 - 08:43
युगानुयुगे
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....
शून्यात बघत बसलेली ती... सावळा वर्ण.. लांबसडक मोकळे केस.. साधीशी साडी..
तिच्यात त्याला काहीतरी ओळखीचे वाटले. तो तिच्यासमोर गेला.
“तू.. तुम्ही..”
“मी पांचाली.” तिच्या डोळ्यात अपरंपार वेदना होती.
“पांचाली..? म्हणजे.. ?” हेच ओळखीचं वाटतंय का?.. त्याने अविश्वासाने तिच्याकडे बघितले.
“तीच..ती.. अनंतकाळापासून असलेली.. मला मरण नाही .. ” डोळ्यातील वेदना तिच्या आवाजातही होती.
“कसं शक्य आहे..?”
“जो पर्यंत माणसा माणसां मध्ये.. जाती जमातीं मध्ये वैर आहे.. तो पर्यंत मला मुक्ती नाही ..फक्त माझा नाव आणि प्रदेश बदलतो.. कधी मी खालच्या जातीची असते तर कधी माणिपूर मधे.. ”
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जळजळीत!!
जळजळीत!!
समर्पक... कथा आणि शीर्षक
समर्पक... कथा आणि शीर्षक दोन्ही..
एकदम समर्पक !
एकदम समर्पक !
सुंदर लिहिलंय!
सुंदर लिहिलंय!
कटू सत्य .... !!
कटू सत्य .... !!
विदारक सत्य!
विदारक सत्य!
समर्पक.
समर्पक.
फारच विदारक पण आजच्या
फारच विदारक पण आजच्या परिस्थितीला अनुरूप