असे म्हणतात कि जग बदलून ठेवणार्या व्यक्तींमधे ओपेनहायमरचा समावेश होतो. नोलान म्हणतो कि ओपेनहायमरने जग असं बदलून ठेवलं आहे कि ते आता मागे जाऊन जैसे थे करता येत नाही. आपण आता पोस्ट ओपेनहायमरच्या जगात राहतो.
त्याने बर्याचशा मुलाखतीत ओपेनहायमरच्या हातात एक क्षण असा होता कि ज्या क्षणी तो हे सगळं थांबवू शकत होता, पण तो स्वतःला आवर घालू शकला नाही असे म्हटले आहे. चेन रिअॅक्शनचा ट्रिगर दाबण्याआधी त्याने संयम पाळला असता तर आजचं जग हे सुंदर असतं. कुठे तरी त्यालाही हा ट्रिगर दाबून पहायची तीव्र उबळ होती असे म्हणतात.
जर्मनीची बाँब बनवण्याची रेस, जपानचा विध्वंस ही बाह्य कारणे आहेत असे नोलानला वाटते. त्याने भगवदगीतेचा अभ्यास केला त्यामुळे त्याला शांती मिळाली. तो कम्युनिस्ट होता. वडलांची मिळालेली सगळी संपत्ती त्याने युनिव्हर्सिटीला हुषार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी दान केली. पन स्टॅलीनच्या अत्याचारांमुळे त्याचा कम्युनिजमवरचा विश्वास उडाला आणि त्याने अमेरिकेच्या अणुबाँब मोहिमेला पूर्ण सहकार्य केले.
मात्र विध्वंस पाहिल्यावर आता अण्वस्त्रे बनवू नयेत असे तो म्हणाला. अमेरिकेने हायड्रोजन बाँब बनवण्याचे निमंत्रण त्याला दिले. पण त्याने नकार दिला. यावर अमेरिकेने त्याच्यावर रशियाचा समर्थक असा शिक्का मारला आणि त्याची सुरक्षा काढून घेतली. त्याचे महत्व संपवून टाकले.
नोलानचे चित्रपट हे फक्त साय फाय स्टोरी साठी नसतात. मिशन इम्पॉसिबल मधून अॅक्शन वजा केली तर काय उरतं ? रिटर्न ऑफ जेद्दा मधून साय फाय कन्स्पेट्स वजा केल्या तर काय उरतं ? पण नोलानच्या चित्रपटांना हे लागू होत नाही असे म्हणतात. साय फाय वजा केल्यावरही त्याच्या चित्रपटात बरंच काही उरतं. ओपेनहायमर मधे पण आण्विक बाँब हा काही क्षणच आहे. बाकी आहे तो नोलान आणि ओपेनहायमर.
नोलानने अनेक मुलाखतीतून असे म्हटलेय कि जग बदलून टाकणारी आणखी एक घटना म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता. इन्स्पेशन इतकी ती लगेचच रूप घेणार नाही. पण जे काही असेल ते खूप इंटरेस्टिंग असेल असे नोलान म्हणतो. चित्रपट बनवण्याचे तंत्र बदलून जाईल. सगळेच बदलेले असे तो म्हणतो.
पण एका मुलाखतीत त्याने एआय ची तुलना त्या चेन रिअॅक्शन च्या ट्रिगरशी केली आहे. संगणक क्रांती, मोबाईल क्रांती कींवा अन्य क्रांती येत असताना विरोध झाला आणि पचवून जगाने या क्रांत्याही पचवल्या. पण ए आय चे परिणाम सामान्य माणसाला सुद्धा दिसतात.
ए आय मधे हिरोशिमा नागासिकीप्रमाणेच जग बदलून ठेवण्याची क्षमता आहे. नोलान म्हणतो, थोडं थांबून जबाबदारीने आपण या बदलाला सामोरं गेलं पाहीजे. ?
काय वाटतं ?
 
 
(No subject)
पहिल्याच कमेंटने विकेट काढली
पहिल्याच कमेंटने विकेट काढली धाग्याची.
ओपेनहायमर पाहिलेला नाही
ओपेनहायमर पाहिलेला नाही अद्याप.
मुलांना पाठवले होते. त्याचा चांगलाच परिणाम दिसून आला. मुलगा वर्ल्ड वॉरचे व्हिडीओज शोधून बघत होता.
मराठी वाचण्याचा वेग संथ असल्याने माझ्याकडचे "बाराला दहा कमी" हे पुस्तक त्यांना वाचायला देता येत नाही.
अशा प्रकारचे इंग्लीश मधे कुठले पुस्तक असेल तर सुचवा. सध्या वातावरण आहे तर नक्की वाचतील.
( किंमती जबरी आहेत. मॅनहटन प्रोजेक्ट पेपरबॅकच ५५५० रूपयांना आहे).
Surely you are joking Mr.
Surely you are joking Mr. Feynman आणि Don't you have time to think ही डॉक्टर रिचर्ड फैनमन ह्यांची पुस्तकं आहेत. फाईनमन मॅनहॅटन प्रोजेक्ट मध्ये सहभागी होता, लॉस अलामोस मध्येच.
WW बद्दल नसले तरी मॅनहॅटन प्रोजेक्ट बद्दल काही गमतीशीर (आणि करुण) किस्से सुद्धा आहेत. तो लॉस आलामोसला असताना त्याची पत्नी अर्लीन मृत्युशय्येवर होती. त्यांचा पत्रव्यवहार मिश्किल आणि हृदयस्पर्शी आहे. पुस्तक काही मॅनहॅटन प्रोजेक्ट वर केंद्रित नाहीये, पण तरीही मुलांना आवडेल असे वाटते, कारण सोप्या भाषेत हलकेफुलके किस्से आहेत.
आणि अगदी डिटेल वाचायचे असल्यास काई बर्ड आणि मार्टिन श्विंगर ह्यांचे अमेरिकन प्रोमेथिअस हे ऑपनहायमरचे चरित्र आहे. ह्यावर सिनेमा बेतला आहे.
Hi raghu I will give complete
Hi raghu I will give complete reference list on ww 2 from office.
Submitted by रिक्शाचालक on 23
Submitted by रिक्शाचालक on 23 July, 2023 - 13:02

अरे वा अमा, मला पण आवडेल लिस्ट.
कॉमी, अमा धन्यवाद.
कॉमी, अमा धन्यवाद.
माझं वाचन आता खूप कमी आहे. मुलगा दहावीत आहे. त्याला आवडेल असं पुस्तक आहे का हे ?
(या मुलांच्या वयात येईपर्यंत आपल्या पिढीने मराठीतली सगळी मोठ मोठी पुस्तकं वाचून संपवलेली असतील).
Feynman ची पुस्तकं नक्की
Feynman ची पुस्तकं नक्की आवडतील.
मागवतो मग.
मागवतो मग.
अशा प्रकारचे इंग्लीश मधे
अशा प्रकारचे इंग्लीश मधे कुठले पुस्तक असेल तर सुचवा. सध्या वातावरण आहे तर नक्की वाचतील.>> मी लवकरच धागा काढणार आहे याववर, दुसऱ्या महायुद्धावर ची पुस्तके
'Surely you're joking Mr.
'Surely you're joking Mr. Feynman' - चांगलं पुस्तक आहे. ह्यात एका प्रकरणात Manhattan प्रकल्पाचा त्यांचा अनुभव आला आहे. पूर्ण पुस्तक या विषयावर नाही.
होय हपा.
होय हपा.
सॉरी, मी तुमचा Feynman
सॉरी, मी तुमचा Feynman पुस्तकांवरचा प्रतिसाद आत्ता पाहिला. माझा तो प्रतिसाद हा अनुमोदन ठरावा.