सर्व मताने आपण जिला वाईट ठरवू शकतो अशी ती एक वेळ. बातमी कानावर येऊन आदळते. अपघात...!
बळकट हृदयाचे दोन, तीन व्यक्ती घरी उरलेल्यांना धीर देऊन बाहेर पडतात. पुढे अपघाताच्या ठिकाणी जाऊन पोहचणं. परिस्थितीचा आढावा घेणं. पटापट काही निर्णय घेणं. जवळचं हॉस्पिटल, ओळखीच्या व्यक्तींना फोन. सगळं करून अखेर रुग्ण(कोणाचा भाऊ, नवरा, मुलगा वगैरे) रुग्णालयात दाखल. आधी प्राथमिक उपचार मग काही टेस्ट, काही स्कॅन, पुढे काही अवघड नाव घेत डॉक्तरांचं स्पष्टीकरण, सगळं झाल्यानंतर काळजात धडकी भरवेल असा मोठा दरवाजा, त्यावर लाल रंगाच्या अक्षरांनी लिहिलेलं I.C.U नाव. अशा आकाराने मोठ्या असलेल्या खोली मध्ये रुग्ण.
कसलातरी असह्य, विचित्र वास पसरलेली परंतु अतिशय स्वच्छ अशी ती खोली. जीवघेणी शांतता, कानावर पडणारे मशीनचे आवाज. दोन्ही बाजूला रांगेत लावलेले बेड. रुग्ण आता तीन, चार लोकांच्या अति दक्षते खाली. वेदना असह्य. खोली मधील परिस्थिती पाहून धावपळ पाहून घाबरलेला. त्याच्या मनाची अवस्था त्यालाच ठाऊक. आता त्याच्या जवळ जाण्याची परवानगी फक्त एका व्यक्तीला. पुढे इंजेक्शन्स, सलाईन्स, आणि बरंच काही लिहिलेल्या चिट्ट्य वेगवेगळा व्यक्ती हातात आणून देतोय. मेडिकल वगैरे शोधण्याचं कष्ट नाही ते अगदी हाकेच्या अंतरावर. ते लोक न सांगता नाव, नंबर घेऊन रुग्ण तिथे असे पर्यंत पैसे उदार ठेवायला तयार.
आपला रुग्ण काय यातना सहन करतोय यावर विचार करण्याची संधी घरच्या मंडळींना किंवा नातेवाईकांना नाही. कोणी त्यांना रिसेप्शनला ऍडव्हान्स भरायला सांगतोय. कोणी कुठे सही करायला सांगतोय. कोणी आधार कार्ड मागतोय. इकडे जा यांना भेटा, तिकडे जा त्यांना भेटा. काय घडलंय, काय घडतंय यावर विचार करायला वेळच नाही. धावपळ पाहून घाबरणं किंवा रडणं देखील शक्य नाही. रुग्ण आता झोपेच्या इंजेक्शन ने शांत. घरची मंडळी किंवा नातेवाईक अजून सक्रिय. त्यांना तहान, भूक, झोप, कसलीच जाण नाही. पैशाची तयारी, क्लेम वगैरे असेल तर ती गडबड तर महाभयंकर. मध्येच फोन वाजला तर घडला प्रकार सांगा, कधी घडलं? कसं घडलं? कुठलं हॉस्पिटल? तेच का? सगळी प्रश्नमंजुषा संपल्यानंतर उद्या येतोच असं आश्वासन.
मी थांबतो किंवा मी थांबते रात्रभर असं म्हणाऱ्या पैकी सगळ्या प्रकारची गैरसोय सहन करू शकतो. जागा मिळेल तिथे झोपू शकतो. ज्याची झोप मोडणं चपलच्या आवाजालाही शक्य. ज्याला रात्रीत कुठल्याही प्रकारचा त्रास असलेला रुग्ण पाहून भीती वाटणार नाही ज्याला नाईलाजाने का असेना मोठं असल्याची जबाबदारी पार पडायची आहे, अश्या व्यक्तीला रात्रपाळीची जबाबदारी. हॉस्पिटल मध्ये साहजिकच अश्याव्यक्तीसाठी कुठलीही सोय नाही. सकाळी त्याला घरी पाठवून जबाबदारी घेण्यासाठी दुसरा व्यक्ती सुसज्ज. पुढे अति जवळचे, जवळचे, दूरचे, अति दूरचे नातेवाईक, मित्र, शेजारी, ऑफिस मधले मित्र असे अनेक जण मनापासून काळजी वाटली म्हणून किंवा आपलं तोंड दिसावं म्हणून हॉस्पिटल मध्ये हजर. काही लोक येऊन भेटून शांतपणे घरी पण काही आग्रही घडला प्रकार सांगा, कसा घडला सांगा पुढे ओघाने आलेले काही सल्ले. जाता जाता न विसरता एखादा अमुक एका हॉस्पिटलला का घेऊन गेले नाहीत सांगून जातो. आता घरातल्या मंडळींनी कितीही नाही ठरवलं तरी यांचे सल्ले छळतात. घेतलेल्या निर्णयावर पुन्हा विचार करायला भाग पडतात. म्हणजे ते पुन्हा सक्रिय त्यांना पुन्हा घेतलेला निर्णय, येणार बिल, मधेच भेटून घाबरवून गेलेला नातेवाईक किंवा अगदी डॉक्टरही, अश्या अनेक गोष्टींवर विचार करत राहायचं आहे.
I.C.U
Submitted by aksharivalay 02 on 8 July, 2023 - 01:14
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खरंय. मानसिक आणि भावनिक
खरंय. मानसिक आणि भावनिक दृष्ट्या अगदी ड्रेन करणारा प्रकार असतो. अपघातच नाही. आजारपणातही ; अगदी आय सी यू नसेल, साधा वॉर्ड असेल तरीही.
पेशंट दगावल्यावरही हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज - उरलेली औषधं फार्मसीला परत करा, शेवटच्या तयारीसाठी लागणारं सामान तिथे पैसे भरून आणा , आधार कार्ड, डेथ सर्टिफिकेटवर लागणारी अन्य माहिती शोधा.
त्यावेळी तर हे सगळं मन घट्ट करून केलं जातं. नंतर त्रास होतो.
बापरे
बापरे
अगदी योग्य वर्णन.या परिस्थितीत तुम्ही स्वतः सध्या नसावे ही आशा, असलात तर काही मदत(नाक खुपसणे वाटणार नाही, उपद्रव होणार नाही या प्रकारे केलेली) लागणार असेल तर इथे हाक नक्की मारा.
भरत आणि अनु +१
भरत आणि अनु +१
खरंय. मानसिक आणि भावनिक
खरंय. मानसिक आणि भावनिक दृष्ट्या अगदी ड्रेन करणारा प्रकार असतो. अपघातच नाही. आजारपणातही ; अगदी आय सी यू नसेल, साधा वॉर्ड असेल तरीही.... ...+1.
तरीही मधल्या काळात अनुभवांती खूप टणक झाले आहे.त्याशिवाय पर्यायच नाही.
पण देव ना करो कोणावर पाळी येवो.
पेशंट दगावल्यावरही
पेशंट दगावल्यावरही हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज - उरलेली औषधं फार्मसीला परत करा, शेवटच्या तयारीसाठी लागणारं सामान तिथे पैसे भरून आणा , आधार कार्ड, डेथ सर्टिफिकेटवर लागणारी अन्य माहिती शोधा.>> ह्या बद्दल थोडे अधिक लिहाल का? काय काय करावे लागते? अंति म संस्कार वर रजिस्टर केले तर ते लोक्स मदत करतात का ह्या बाबतीत?
माझा सर्व पेशंट व केअर गिव्हरस ना मना पासून भावनिक आधार.
हल्ली पैसे कमावण्यासाठी ICU त
हल्ली पैसे कमावण्यासाठी ICU त ठेवण्याचे प्रकार घडतात. तितकं गंभीर कारण नसताना पेशंटला, नातेवाईकांना उगाच घाबरवतात. जवळच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागतो.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
ICU पेशंट च्या नातेवाईकांसाठी
संपादित
अगदी यथार्थ वर्णन केले आहे.
अगदी यथार्थ वर्णन केले आहे.
हे चांगलेच अनुभवले आहे आणि तेव्हा लॉक डाऊन असल्याने मदतीला इतर कोणी येऊ न शकल्याने अनुभवाची तीव्रता जास्त होती.
सामी ऑल द बेस्ट, ते लवकर बरे होवोत ही शुभेच्छा.
धन्यवाद मानव.
धन्यवाद मानव.
धन्यवाद
धन्यवाद
खरंय. मानसिक आणि भावनिक
खरंय. मानसिक आणि भावनिक दृष्ट्या अगदी ड्रेन करणारा प्रकार असतो. अपघातच नाही. आजारपणातही ; अगदी आय सी यू नसेल, साधा वॉर्ड असेल तरीही.... ...+1.
धन्यवाद sharmilaR
धन्यवाद sharmilaR
अगदी यथार्थ वर्णन केले आहे.>>
अगदी यथार्थ वर्णन केले आहे.>>+१
किंवा आपलं तोंड दिसावं म्हणून हॉस्पिटल मध्ये हजर>>> याही पुढे गेलीत लोकं. गावावरून भेटायला आले आणि घरून पेशंटसाठी पाठवलेला डबा खाऊन गेलेले मी पाहिलेत.
धन्यवाद sonalisl
धन्यवाद sonalisl