१) शिंदे गटाला शह ,नुकतेच जाहिरातींवरून राजकीय वातारवरण तापले होते ,श्रीकांत शिंदे डोईजड झाले असे लोकसत्ता वरून वृत्तावरून दिसते खाली लिंक आहे
तसेच एकनाथ शिंदे तब्बल १९ खाती ठेऊन होते ह्याच्या अर्थ मंत्रिमंडळ मध्ये त्यांचे मंत्री येणे अवघड होते
." डोंबिवलीत चव्हाण यांचे कट्टर समर्थक नंदू जोशी यांच्याविरोधात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास करुन पुढील कार्यवाही करायला हवी होती असे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात मात्र ठाणे जिल्ह्यातील एका बड्या लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला. हा लोकप्रतिनिधी कोण या प्रश्नाचे उत्तर कांबळे यांनी जाहीरपणे दिले नसले तरी भाजप कार्यकर्त्याचा रोख मात्र मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे असल्याचे अगदी स्पष्टपणे दिसून आले."
https://www.loksatta.com/politics/shindesena-bjp-conflict-in-thane-distr...
२) विखे गटाला शह ,विखे ३ पिढ्यांचे हाडवैरी ,त्यांना नवीन मध्ये महसूल मंत्री मिळाले ,विखे ह्यांनी २०१९ मध्ये जुन्या जखमा काढल्या होत्या ,२०२४ मध्ये काही झाले तरी नगर मध्ये निवडणूक चुरशीची होणारच ,पण आत्ताच अजित दादांनी अर्थ आणि उप मुख्यमंत्रीपद घेऊन शह दिला
३) फडणवीस ह्यांना शह ,ह्यावर बरीच चर्चा झाली आहे ,शिंदे फडणवीस जमत नाही ,आता अजितदादा शिंदे बघू जमते का
४) भाजप विरोधी आघाडीत मध्ये भीती ,आत्ता तृणमूल वगैरे ह्याच भीतीत असणार कि त्यांचे आमदार पण फुटतील
५) उद्धव ठाकरे ह्यांचे भजे ,नुकताच न्यायालयाने निकाल दिला होता कि त्यांनी राजीनामा देणे हि मोठी चूक होती,पवार साहेबांनी ज्या जलद गतीने प्रतोद बदलला लोक पुढच्या वेळी त्यांचेच नेतृत्व जास्त मानतील
५) आव्हाड साहेब - आधी शिंदे ह्यांच्याकडून विरोधी पक्षात असून पण त्यानं निधी मिळत नव्हता ,पण आत्ता आव्हाड साहेब फुटले नसताना पण त्यानं निधी नक्की मिळेल ,लिहून घ्या
मुख्य मुद्दा अपात्रतेची आहे ,तर एकाच वर्ष राहिले आहे आणि सरकार तसे पण स्थिर आहे म्हणून शकयतो फक्त १-२ आमदारांवर अपात्र ठरवतील असा माझा अंदाज आहे
----- "अशी जाहिरात यावी
----- "अशी जाहिरात यावी यासाठी फडणावीस यांच्या विश्वासू व्यक्तीने शिंदे यांची मध्यरात्री नंतर भेट घेतली होती... ">> आमच्या इतिहासाच्या पुस्तकात शिंदे आणि नाना फडणीस नौकेत बसून सारसबागेच्या तलावात विहार करत आहेत असे चित्र होते. अगदी त्याची आठवण झाली.
कपिल सिबल म्हणतात कि
कपिल सिबल म्हणतात कि महाराष्ट्रात जे काय चालले आहे तो राजकीय "तमाशा" आहे. आणि तो कायद्याला धरून आहे.
मला वाटतय कि आपल्या जगप्रसिद्ध लोकशाहीला हे अपेक्षित आहे. आणि मंजूर आहे.
<< मला वाटतय कि आपल्या
<< मला वाटतय कि आपल्या जगप्रसिद्ध लोकशाहीला हे अपेक्षित आहे. आणि मंजूर आहे. >>
------- जनतेला हे कृत्य आवडले नाही तर पुढच्या निवडणूकीत या लोकांना घरी बसवतील.
महाराष्ट्रातील सद्य
महाराष्ट्रातील सद्य परिस्थितीवर पुरेशा गांभीर्याने भाष्य करायचे झाल्यास फक्त इतकेच म्हणता येईल
जनता? जनता सध्या टोमॅॅटो
जनता? जनता सध्या टोमॅॅटो शिवाय टोमॅॅटो आम्लेट आणि टोमॅॅटो उत्ताप्पा कसा बनवायचा ह्याच्या पाककृती शोधण्यात गर्क आहे. (btw पाककृती ला पर्यायी शब्द पाहिजे आहे. किचनमध्ये पण पाकिस्तान?)
<<<--- जनतेला हे कृत्य आवडले
<<<--- जनतेला हे कृत्य आवडले नाही तर पुढच्या निवडणूकीत या लोकांना घरी बसवतील.
नवीन Submitted by उदय >>>
दुर्दैवाने आपण मतदार तेवढे प्रगल्भ नाही. किरकोळ पैसे देऊन मतदान फिरवले जाते. आपण इथे तळतळून चर्चा करणार , फारच वैतागून "नोटा" वर शिक्का मारून येणार. आणि बाकीचे नोटा घेऊन हे आणि असलेच "नेते" निवडून आणणार. हीच आपली लोकशाही...
दोन चार .
दोन चार .
हिंदू मुस्लिम.
हिंदू दलीत.
ह्यांच्यात द्वेष निर्माण करणारे व्हिडिओ टाकले की.
जनता धर्म वाचवायला सरसावली च म्हणून समजा.
प्रगल्भ समाज अजून पण आपला नाही..
हे कटू सत्य आहे.
We get the government what we
We get the government what we deserve ... माझी आवडती फिलॉसॉफी
जनता सध्या टोमॅॅटो शिवाय
जनता सध्या टोमॅॅटो शिवाय टोमॅॅटो आम्लेट आणि टोमॅॅटो उत्ताप्पा कसा बनवायचा >> पेट्रोल टोमॅटो पेक्षा स्वस्त आहे ह्यात समाधान माना की!!
इथे च बघा ना.सर्व बर्या पैकी
इथे च बघा ना.सर्व बर्या पैकी सुशिक्षित आहेत
इथे bjp ला जे विरोध जे करतात त्याचा अर्थ bjp वाले काय काढतात .
तर हे हिंदू विरोधी विचाराची लोक आहेत म्हणून bjp ला विरोध करत आहेत.
पण ते साफ खोटे आहे.
Bjp ज्या सरकार चालवत आहे.
राज्यांचे हक्क नाकारत आहे.
सरकारी यंत्रणा ना चुकीचे वर्तन करण्यास भाग पाडत आहे.
त्या यंत्रणांचा वापर विरोधी पक्ष संपवण्यासाठी करत आहे.
समाजात द्वेष निर्माण करत आहे.
.
विरोधी पक्षांच्या राज्य सरकार ना सहकार्य करत नाही.
त्या मुळे इथे bjp ल विरोध केला जात आहे.
हिंदू वादी आहे म्हणून कोणी विरोध करत नाही.
पण इतकी समज लोकात आहे का
Tomato दर वाढी मध्ये सरकार च
Tomato दर वाढी मध्ये सरकार च काही दोष नाही.
काही दिवसापूर्वी टोमॅटो ला भाव च नव्हता .
खूप नुकसान झाले शेतकऱ्यांचे त्या मुळे लोकांनी ते पीक च काढून टाकले.
आता टोमॅटो च नाहीत.
-- जनतेला हे कृत्य आवडले नाही
-- जनतेला हे कृत्य आवडले नाही तर पुढच्या निवडणूकीत या लोकांना घरी बसवतील.>>>>>>>>>>
सध्याच्या राजकीय तमाशा मुळे नाराज असलेले मतदार मतदानाला बाहेरच पडणार नाहीत , अशी पण शक्यता आहे .
पण ज्या प्रमाणे बलात्कार पीडितेच्या घरच्यांना पन्नास लाख आणि सरकारी नोकरी दिली की त्यांचा राग मावळतो , आंदोलन थांबते .
त्याच प्रमाणे मतदान केल्याची स्लीप दाखवा आणि आयकरात , मिळकत करात 5% सूट घ्या सांगितले की मतदानाला रांगा लागतील.
शेवटी काय स्वार्थ महत्वाचा , सामाजिक भूमिका गेली खड्यात !
भिकारी हे काय देणार
भिकारी हे काय देणार
सरकारी नोकरी आणि पन्नास लाख.
हे स्वतःच भिकारी आहेत.
पैशासाठी स्वतःला विकतात.
देश विकायला पण हे राजकारणी कमी करणार नाहीत.
नालायक कुठले.
राज्याची पूर्ण वाट लावली.
मराठी लोकांचे प्रचंड नुकसान केले
राजकारणी लोकांची कृत्य बघून
राजकारणी लोकांची कृत्य बघून असे वाटतं आहे.
भारताला धोका चीन ,पाकिस्तान पेक्षा ह्या भारतीय राजकारणी लोकांपासून च जास्त आहे
कधी देश विकून पसार होतील सांगता येत नाही.
ह्यांच्या वर च लक्ष ठेवले पाहिजे
चला आता कॉंग्रेस फोडूया.
चला आता कॉंग्रेस फोडूया.
ह्याला सत्तेत असताना नारळ फोडून फोडून काहीही फोडण्याचे व्यसन लागले आहे.
ह्यांचा पुढील कार्यक्रम
- मनसेचा एक आमदार आहे तो फोडायचा.
- वंचित समाज पार्टी ती फोडायची.
-भारतातील सर्व पार्ट्या फोडल्यावर अमेरिकेतील डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पार्ट्या फोडायाच्या.
-मध्ये फोडणीचे वरण खाऊन विश्रांती.
-नंतर लहान मुलांच्या बर्थ डे पार्ट्या त्या सुद्धा फोडायाच्या.
-शेवटी स्वतःची पार्टी फोडून उपपंतप्रधान व्हायचे!
-नंतर लहान मुलांच्या बर्थ डे
-नंतर लहान मुलांच्या बर्थ डे पार्ट्या त्या सुद्धा फोडायाच्या. >>>>
शेवटी एकदा काकांविरुद्ध अजित
शेवटी एकदा काकांविरुद्ध अजित पवारांनी मोहीम उघडली.धाडस केले. शिंदे त्यांचे गुरु झाले. .
सध्या राजकीय वातावरण - "माझं होत नाही पण मी तुझंही भलं होऊ देणार नाही."
ते सर्व ठीक आहे.
ते सर्व ठीक आहे.
हा सर्व नेत्यांचा खेळ चालू आहे त्यांना लोकांनी.
सेने चे उमेदवार किंवा राष्ट्रवादी चे उमेदवार म्हणून निवडून दिले आहे.
त्यांचे कार्यकर्ते पण वेगवेगळ्या विचाराचे आहेत.
आता नेत्यांनी उड्या मारल्या कार्यकर्त्यांना ,मतदारांना अशा उड्या मारता येत नाहीत.
गाव पातळीवर तर खुन्नस तयार झालेली असते
नेते म्हणजे पण पक्ष नसतो.
नेते म्हणजे पण पक्ष नसतो.
कार्यकर्ते म्हणजेच पक्ष असतो.
सर्व पक्षात काहीच अशी लोक आहेत .
त्या मध्ये दोन्ही काँग्रेस मध्येच जास्त.
की त्यांचे स्वतःचे वलय आहे.
ते स्वतःच्या कार्यावर निवडून येवू शकतात.
पण असे खूप थोडे आहेत.
शिंदे कडे तर शिंदे सोडले ते बाकी कोणी दिसत नाही.
अजित पवार कडे.
भुजबळ,मुंडे,स्वतः अजित,आणि असे आठ दहा तरी आहेत.
मोदी च चेहरा वापरून च निवडून येणे हा एकमेव मार्ग शिंदे,किंवा अजित पवार ह्यांच्या कडे आहे.
देईल तितक्या जागा घ्या आणि गप्प बसा.
अशी भूमिका नक्की bjp घेवु शकते.
आज जितक्या प्रेमाने bjp वागत आहे तशीच ती पुढे वागेल .
ह्याची बिलकुल शास्वती नाही ..
हिंदुत्व च मुद्धा महाराष्ट्र मध्ये चालत नाही..
सेना हिंदुत्व मुळे जिंकत नव्हती.
मराठी अस्मिता त्यांच्या विजया मागे होती
काही दगडांनी त्यांचाच पिंजरा
काही दगडांनी त्यांचाच पिंजरा तुटला.
मागे 'कॉंग्रेसमधून बाहेर पडले' असा समज होता. पण ते काढले गेले ते भिरकावलेल्या दगडाने. आता राजिनामा नाट्य करून नवीन अध्यक्ष तीन नेमले तेही दोन फुटले. उरलेला एक अध्यक्ष बघेल की कसा पक्ष वाढवायचा ते . मानसिक रित्या सोडलाच आहे ना ताबा. तीन अध्यक्ष 'नेमून' परत स्वतः 'सर्वैसर्वा' राहणे/ ठेवणे हे काही समजले नाही. (कॉंग्रेसमध्ये पाहा )
कालची बातमी (HT)- "कमिटीतले सभासद निवडून आलेले नाहीत,नेमलेले होते. म्हणून त्या कमिटीला फारसा अधिकार आणि महत्त्व नाही. " - प्रफुल पटेल. मागच्या वर्षी मा. उद्धव ठाकरेंचा आदेश अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाने विचारात घेतला नाही. नोंद नि. संचालनात (२०१८) नव्हती. मग इकडे राष्ट्रवादीनेही लगेच सुधारणा का केली नाही? रीतसर पक्षांतर्गत कमिटी करणे वगैरे?
----
आजची बातमी (HT)-अजित पवार गटाने caveat दाखल केला आहे. तर राष्ट्रवादीचे सेक्रेटरी श्री ब्रिजभूषण श्रीवास्तव म्हणतात की मागच्या सप्टेंबर २०२२ मध्ये बैठक होऊन मा.शरद पवार यांना पूर्ण अधिकार दिले व त्यांनी नेमलेले पदाधिकारी हेच निवडलेले असे ठरवण्यात येईल. तशी माहिती इसीला लगेच पाठवण्यात आली आहे.
तसं जर असेल तर अजित पवारांसह नऊ जणांचं निष्कासन अधिकृत ठरेल.
पक्षफुटीरता याबद्दलची दहावी घटना दुरुस्ती याबाबत लागू होते. दोन कलमं स्पष्ट केली आहेत. १)पक्षातून काढलेला उमेदवार केव्हा 'वेगळा' unattached उमेदवार राहतो आणि २) केव्हा तो सदनाचं सभासदत्वही गमावतो. ( गूगल सर्च मारल्यास दिसेल).
तर सध्या इथली चर्चा म्हणून विचार केल्यास आणि वरील कागदपत्र स्पष्ट समोर न आल्याने एवढेच म्हणू शकतो की (फेकलेले दगड,पक्षी इत्यादी) अजित पवार गटाचे भवितव्य अधांतरी आहे. पुढे अधिवेशनासाठी विप लागू केला गेल्यास तो मानला जाऊन या गटाचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. बाहेर फेकले गेल्याने अजित गटाला वेगळा पक्ष काढणे किंवा पूर्णपणे भाजपीय होणे हे दोन पर्याय उरतील.
यातून भाजपाचा विचार केल्यास १)राष्ट्रवादी मोडणे ,२)अजित पवार गट बाहेर फेकला जाणे,३)शिंदे गट युती कायम राहाणे होईल. ४)अजित पवार गट राष्ट्रवादी न राहता भाजपात प्रवेश/सामिल होऊ म्हणेल तर भाजप ज्या अटी घालेल त्या मान्य कराव्या लागतील.
एक नवीनच मुद्दा काल समोर आला.
एक नवीनच मुद्दा काल समोर आला. अजित पवारांनी काकांच्या वयाबद्दल मत प्रदर्शन केले त्यास उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी नापसंती दर्शवली. शिवाय काकांना शंभर वर्षे (भरपूर) आयुष्य लाभो ही इच्छा व्यक्त केली.
मराठी लोकांचे प्रचंड नुकसान
मराठी लोकांचे प्रचंड नुकसान केले>>>>> मग ! चावट कुठले ! धुत, चतुर्वेदी, केनिया हे सर्व मराठी लोक उच्च पदाला गेले, तरी आम्ही लोक शंख करतो की भाजपाने मारठींचे उकसान केले. छोट्या दाढीवाल्याच्या पप्पांचे काही न कमवता २ मोठ्ठाल्ले बंगले झाले तरी आम्ही दु:ख व्यक्त करतो की मराठी लोकांचे काय झाले. २० - २५ वर्षे मुंबई महापालीकेवर सत्ता होती, उलट्या येईपर्यंत खाल्ले, जिरवले तरी आम्ही तय विरुद्ध स्वतःच बोंबा मारत मोर्चा काढतो, तरी म्हनायचे की मराठी लोकांचे नुकसान झाले. पत्रा चाळ प्रकरण घडले तरी म्हणायचे की मराठी लोकांचे नुक्सान झाले.
मूळ मराठी माणुस व कोळी बांधव मुंबई पासुन दूर गेले तरी म्हणायचे मराठी लोकांचे नुकसान झाले.
टिल्ल्या नेपाळीच्या बाबाने
टिल्ल्या नेपाळीच्या बाबाने किती बंगले बांधले ते बघुन दाढीवाल्याने त्याची पप्पी घेतली असेल का?त्तुरुगात असताना वाढवलेल्या दाढीचा रुबाब पाहुन छगन भाउना मिठी मारली असेल का?
काका पुतणे येत्या काही काळात
काका पुतणे येत्या काही काळात प्रचंड मनोरंजन करतील असे दिसते.
खरतर महाराष्ट्रात राजकारण
खरतर महाराष्ट्रात राजकारण नासवल ते भाजपने स्वतालापोर होत नाही म्हणून ईतरांची पोर दत्तक घेत भाजप सत्तेत आला भाजप हा महाराष्ट्रात स्वबळावर सरकार बनवु शकत नाही आणि आता मोदी करिश्मा ही संपत आलाय परत केंद्रात सत्तेवर यायचे तर युपी बिहार नंतर सर्वात जास्त खासदार महाराष्ट्रातून निवडून जाताय सत्तेसाठी म्हणून भाजपने महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले पंतप्रधानांनी महाराष्ट्रात केलेले दौरे हेच सांगतात पण महाराष्ट्रात भाजपला यावेळेस अनेक ठिकाणी पराभव दिसत असल्याने भाजपने शिवसेना फोडली पण शिंदेच राजकीय वर्चस्व ठाणे वा मुंबईतील काही भागातच असल्याचे लक्षात येताच भाजपने अजीत पवारांना ईडीचा धाक दाखवत राष्ट्रवादी फोडायला भाग पाडले तरी ही भाजपला ठाकरे व शरद पवार जळीस्थळी दिसतात पण यातुनही सहानुभूती ठाकरे व पवारांकडे वळण्याची भिती आहेच तसच यामुळे भाजप सर्व भ्रष्टाचारी आमदार खासदाराचे आश्रयस्थान असल्याचा संदेश जनतेत पोहचला आहेच .
एका सर्व्हेनुसार महायुतीला 39
एका सर्व्हेनुसार महायुतीला 39 जागा आणि मविआला 9 जागा मिळतील . मोदी साहेब अजूनही महाराष्ट्र्र दौरे करतील का?
यात गेम फक्त संघच खेळत आहे
यात गेम फक्त संघच खेळत आहे साऱ्या विरोधी पक्षांची फोडाफोडी करून देशात फक्त एकपक्षीय हुकुमशाहीकडे भाजपची वाटचाल सुरु झाली आहे ,मोदी सरकारने सिबिआय ईडी केंद्रीय निवडणूक आयोग आतातर ईव्हिएम कंपनीतही आपली माणस घुसवत या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत एक एक पक्ष दुबळा बनवत एकपक्षीय हुकुमशाहीकडे वेगाने वाटचाल सुरु केली आहे पण हे ना काँग्रेस ना राज्यनिहाय प्रबळ पक्षांच्या लक्षात येत किंवा आले तरी त्याकडे ते दूर्लक्ष करीत आहेत बाकी पुढे याच दत्तक पुत्रांच्या सहाय्याने भाजप निवडणूक जींकण्याचा डाव खेळणार आहे भाजपचे व निवडणुक आयोगाचे पितळ पंजाबमधील महापौर निवडणुकीत झालेली धांदली न्यायालयात उघड झाली आहेच .
यात गेम फक्त संघच खेळत आहे
यात गेम फक्त संघच खेळत आहे साऱ्या विरोधी पक्षांची फोडाफोडी करून देशात फक्त एकपक्षीय हुकुमशाहीकडे भाजपची वाटचाल सुरु झाली आहे ,मोदी सरकारने सिबिआय ईडी केंद्रीय निवडणूक आयोग आतातर ईव्हिएम कंपनीतही आपली माणस घुसवत या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत एक एक पक्ष दुबळा बनवत एकपक्षीय हुकुमशाहीकडे वेगाने वाटचाल सुरु केली आहे पण हे ना काँग्रेस ना राज्यनिहाय प्रबळ पक्षांच्या लक्षात येत किंवा आले तरी त्याकडे ते दूर्लक्ष करीत आहेत बाकी पुढे याच दत्तक पुत्रांच्या सहाय्याने भाजप निवडणूक जींकण्याचा डाव खेळणार आहे भाजपचे व निवडणुक आयोगाचे पितळ पंजाबमधील महापौर निवडणुकीत झालेली धांदली न्यायालयात उघड झाली आहेच .
काँग्रेस विरोध करतेय, खास
काँग्रेस विरोध करतेय, खास करून राहुल गांधी, परंतू पक्षातील मोठे नेते पक्ष सोडून जात असल्याच्या बातम्यांनाच जास्त चर्चेत ठेवले जाते. अदानीचा मुद्दा राहुल गांधींच लोकसभेत आणि बाहेर मांडत असतात.
Pages