" "

Submitted by mi manasi on 16 May, 2023 - 21:38

" "

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी झाले अखंड कौमार्या!
कौमार्यभंगानंतर प्रत्येकवेळी अनुष्ठान करून मला माझं यौवन, माझं तारुण्य परत मिळवता येत होतं.>>>>
>>>>> अखंड कौमार्याचे तर तोटेच जास्त असतील! प्रत्येकवेळी कौमार्यभंगाच्या वेदना नव्याने सहन कराव्या लागतील ना ?

मनीम्याऊ, urmilas ..धन्यवाद!
राजा मनाचा..
असेही कौमार्य भंग एकदाच झाला तरी ते भोग कायमचे असतातच.. फक्त तारुण्य परत मिळत नाही. ते तिला मिळणार होतं.. धन्यवाद!

वाचतोय, ईटरेस्टींग आहे.

पण कौमार्य परत मिळते म्हणजे टेक्निकली नक्की काय होत होते?
ईटरकोर्स करताना जे हायमेन की काय ब्रेक होते म्हणतात ते परत जोडले जात होते का?

@ऋन्मेष - लेखिकेच्या कानात चिमणी येउन सांगणारे का या प्रश्नाचे, उत्तर?या प्रश्नाचे उत्तर? कै च्या कै.

संस्कृतप्रचुर भाषेमुळे वाचताना अडकायला होतंय. म्हणजे तुम्ही तुमची शैली बदला असे सुचवत नाही.

<कौमार्यभंगानंतर प्रत्येकवेळी अनुष्ठान करून मला माझं यौवन, माझं तारुण्य परत मिळवता येत होतं.> तारुण्य आणि कौमार्य या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना? यौवन - तारुण्याचा संबंध वयाशी. कौमार्य म्हणजे काय त्याची चर्चा प्रस्तावनेच्या प्रतिसादांत झालीच आहे.

रजस्वला, ऋतुमती होण्याचं भाग्य फक्त तुलाच मिळालेलं आहे. जन्मदात्री होऊन तू तुझं स्त्रीत्व पूर्णत्वाला न्यावं यात तुझा गौरवच आहे.
आणि या भूतलावरचं तुझं -मातेचं- स्थान तर अनन्यसाधारण आहे.
एकमेव तूच तुझ्या उदरात एक जीव वाढवतेस.
तू तुझ्या रक्ताचं सिंचन करून, अपार वेदना सहन करून एका जीवाला या जगात आणतेस.
तू तर जन्मदात्री आहेस. जीवनदायीनी आहेस. इतकंच नाही, तरीही जन्मतः त्याच्याशी असलेली तुझी नाळ तोडून त्याला स्वतंत्र करतेस.
किती महान आहेस तू..
‘मा फलेशु कदाचन!’ हा मंत्र तर कदाचित फक्त तुझ्यासाठीच आहे..>>>>>>>>>>

या परिच्छेदाच्या वाचनाने...
स्त्रित्वाच्या भावनेने मन अभिमानाने भरून यावं...
का त्यामागच्या अव्यक्त वेदना, अगणित त्याग, स्त्रित्वावर लादलेल्या जबाबदाऱ्या... आणि एवढं करून "मा फलेशू...!!" असा विचार करून, समजून घेऊन निराश व्हावं???
To be or not to be... That is the question....

मला महाभारतातल्या अश्या untold stories वाचायचा खूप आवडेल...
अर्थात् मी सगळं महाभारत पूर्ण वाचलं आहे असा नाही .. काही काही कथा इकडून तिकडून ऐकल्या आहेत .. पण अश्या धाटणीच्या कथा वाचायला आवडेल...

साऽऽ , ध़ऽ ध़ऽ सा, धसारेग सारेगऽऽ पऽ, धऽऽ पऽ, रे ग सा रे, ग धऽ सा.."
आणि मन शांत झालं.
त्या सुरांच्या कुशीत विसावलं.>>>>>>

हे वाक्य मला खरचं खुप आवडलं...
केवळ वाक्य वाचून समाधानाची, शांत अनुभूती व्हावी असे शब्द... खूप सुंदर...

पुभाप्र...

तिला अजुन एक वर होता की तिला फक्त मुलेच जन्माला येतिल.
तिची फर्फट यामुळे जास्त झाली कारण बर्याच राजांना वारस मुलगाच हवा होता.

ययाति एकदम व्हिलनच वाटतो. त्याने पुरुचे तारुण्य घेतले. शर्मिष्ठा बरोबर अन्याय केला. माधवीला वस्तु सारखे दान करुन टाकले.

गीतेतलं ‘मा फलेषु कदाचन’ तसंच विष्णुसहस्रनामाची सुरुवात हे माधवीला कुठल्या रेडिओवर ऐकू आलं असेल हे लक्षात येत नाही. दोन्ही महाभारतात फार नंतर, युद्धाच्या वेळी येतात ना?

"साऽऽ , ध़ऽ ध़ऽ सा, धसारेग सारेगऽऽ पऽ, धऽऽ पऽ, रे ग सा रे, ग धऽ सा.." >> हे आवडलं. लेख वाचताना बॅकग्राऊंड म्युझिकचं नोटेशन ही आयडिया भारी आहे! बासरीच्या आवाजात इमॅजिन करता आलं. चिनी आणि बौद्ध पारंपरिक संगीतात आढळला जाणारा हा राग असल्यामुळे भूप बर्‍यापैकी जुना असावा.

मला ह्या कथेसाठी संस्कृतप्रचुर भाषा असणं आवडलं. ती भाषा त्या काळातली तशीच्या तशी नसली तरी निदान आपल्याला १००-एक वर्षे मागे घेऊन जाते. तेवढीच भूतकाळाशी जवळिक. फक्त त्यातल्या काही त्रुटी सुधारल्या पाहिजेत. फलेशु - फलेषु, शिवाय त्या वाक्याचा ऐतिहासिक संदर्भ आणि अ‍ॅनॅक्रोनिझम बघावा. अग्निशाळेतून येणारे मंत्रसुद्धा. तिथे कदाचित वैदिक सूक्ते, अग्निमीळे पुरोहितम् वगैरे जास्त चपखल वाटेल. बाकी वरती काही जणांनी म्हटल्याप्रमाणे कौमार्य आणि तारुण्य हे शब्द समानार्थी वापरणं बरोबर नाही, जर कौमार्य हे वयाशी संबंधित नसेल तर. काहीवेळा बाल्य - कौमार्य - तारुण्य - वार्धक्य असे वयाशी संबंधित शब्द येतात तिथे एकवेळ चाललं असतं. पण या कथेत कौमार्य त्या अर्थाने (कुमारवयीन अवस्था या अर्थाने) अपेक्षित नाही ना; त्यामुळे कौमार्य इज नॉट इक्वल टू तारुण्य.

SharmilaR.. धन्यवाद!

ऋन्मेष..
वाचताय.. धन्यवाद!
कौमार्य परत मिळते म्हणजे टेक्निकली नक्की काय होते>> नाही सांगू शकत पण तर्क केला तर असं म्हणता येईल की.. प्रसूतीनंतर स्त्रीच्या शरीरात जे बदल होतात ते अनुष्ठानानंतर पूर्ववत होतील असं अपेक्षित असावं.

सामो..
आवडते आहे.. धन्यवाद!
लेखिकेच्या कानात चिमणी येऊन सांगणारे का>>
वाचून खूप हसले..

भरत..
कथानक पुराणकाळातले आहे आणि निवेदन प्रथमपुरुषी असल्याने शैली तशी ठेवावी लागली. तरीही भाषा सोपी करण्याचा प्रयत्न केलाय..

कौमार्यभंगानंतर प्रत्येक वेळी अनुष्ठान करून मला माझं यौवन, तारुण्य परत मिळवता येत होतं.<<
तारुण्य आणि कौमार्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी>>
..असल्या तरी तिला चिरतारुण्याचंही वरदान आहे. कौमार्यभंगानंतर गर्भधारणा, प्रसूती अपेक्षित आहे (आता मी इथे तसा उल्लेख केलेला नाही पण पुढे कथेच्या ओघात येणार आहे) आणि त्यामुळे तिच्या शरीरात होणारे बदल हे तिला प्रौढत्वाकडे नेणारे असतील.
ते तिला अनुष्ठान करून पूर्ववत करता येतील असं म्हणायचं आहे. धन्यवाद!

मधुरा कुलकर्णी..
To be or not be.. yes दोन्ही
इतके कष्ट घेऊन लिहिल्यानंतर, पहिल्यांदा इतकी छान प्रतिक्रिया मिळाली.
माझ्या मनाला समाधानाची, शांततेची अनुभूती दिलीत.. मनापासून आभार!

नीलिमा.. हो खरं आहे. धन्यवाद!

स्वाती आंबोळे..
तुम्ही वाचताय यातच आनंद आहे. धन्यवाद!

फलेषु.. करतेय
मला छोटी गोष्ट मांडायची असल्याने त्या वाक्याचा ऐतिहासिक संबंध वगैरे गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत मान्य. हे घटना घडून गेल्यानंतर आत्मकथन आहे ते तिने पृथ्वीवरचा सगळा विध्वंस पाहून स्वर्गातून केलेलं आहे. असं समजूया.. गंमत करतेय.

अग्नी शाळेतून येणारे मंत्र सुद्धा खूप जुने वापरले नाहीत. गालवला विष्णूभक्त गरुडाने मदत केली होती असा संदर्भ आहे म्हणून विष्णुपुराण चालेल असं समजून लिहिलंय.

कौमार्य आणि तारुण्य हे शब्द समानार्थी वापरलेले नाहीत. तिला चिरतारुण्याचंही वरदान होतं.
छान, सविस्तर प्रतिक्रियेसाठी आभारी आहे..

हरचंद पालव..
फलेषु.. करतेय
मला छोटी गोष्ट मांडायची असल्याने त्या वाक्याचा ऐतिहासिक संबंध वगैरे गोष्टी मी लक्षात घेतल्या नाहीत मान्य आहे. हे घटना घडून गेल्यानंतरचं आत्मकथन आहे ते तिने पृथ्वीवरचा सगळा विध्वंस पाहून स्वर्गातून केलेलं आहे. असं समजूया.. गंमत करतेय.

अग्नी शाळेतून येणारे मंत्र सुद्धा खूप जुने वापरले नाहीत. गालवला विष्णूभक्त गरुडाने मदत केली होती असा संदर्भ आहे म्हणून विष्णुसहस्त्रनाम चालेल असं समजून लिहिलंय.

कौमार्य आणि तारुण्य हे शब्द समानार्थी वापरलेले नाहीत. तिला चिरतारुण्याचंही वरदान होतं.
छान, सविस्तर प्रतिक्रियेसाठी आभारी आहे..

बोध्या यदुने परशुराम| साध्यदेव प्रल्हाद अकाम ||१६||
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तु (दत्त) उपदेश केला होता.

यापैकी 'यदु' हा ययातीचा मुलगा.
तेव्हा महाभारत दत्तात्रेयांच्या अवतारा आधी घडले की नंतर ते पहावे लागेल.

हो मानसी, तो प्रतिसाद आधी वाचला होता.

तिने नंतर स्वतःची कथा सांगताना त्यानंतरचे संदर्भ वापरलेत - हे assumption आहे. त्यामुळे सामोचाही प्रश्न सुटेल.

हरचंद पालव..
बदल करायला माझी काही हरकत नाही. मी कोणी फार मोठी लेखिका नाही. त्यामुळे मी सगळं अभ्यासपूर्ण लिहिलंय असा माझा दावा नाही. पण ते नापासाचं पास करुन घेल्यासारखं वाटतं..

Lol

वाईट वाटून घेऊ नका. लिहीत रहा. तो काळ इमॅजिन करून संवाद लिहिणं किंवा त्या व्यक्तींचे विचार काय असतील याची कल्पना करणं ही सोपी गोष्ट नाही, हे ठाऊक आहे.

हर्पा +१
मानसी छान लिहीताय तुम्ही. थोडा उन्नीस बीस चलता है!

कौमार्य आणि तारुण्य हे शब्द समानार्थी वापरलेले नाहीत. तिला चिरतारुण्याचंही वरदान होतं.
>>>>>

हो कर्रेक्टाय. मी वाचताना तोच अर्थ घेतला.
कारण कौमार्यासोबत चिरतारुण्याचे वरदान गरजेचे आहेच.
अन्यथा सत्तर वर्षाच्या कौमार्य जपलेल्या बाईपेक्षा पस्तीस वर्षांची कौमार्य गमावलेली बाई केव्हाही सरसच ठरेल.

हरचंद पालव..
खरंतर पौराणिक काळातलं मी हे पहिल्यांदाच लिहितेय. एक छोटीशी हिंदी कविता वाचली होती लॉकडाऊनच्या काळात. माधवीचं मनोगत या प्रकारची होती. आता ती मला सापडली नाही. नंतर कधीतरी एका लेखात तिचा उल्लेख वाचला. त्यावेळी जे मनात आलं ते लिहून ठेवलं होतं. तेच एडिट करून घेतलंय.

मी गुगल वर उगाच फार शोधाशोध करत नाही. ते कौमार्यचं क्रौमार्य सुद्धा असंच झालं. तेव्हा चुकून क्रौमार्य लिहिलं होतं. आणि आता एवढी चर्चा चालली होती तरी तो एका अक्षरातला फरक माझ्या लक्षात आलाच नाही. मला वाटलं सगळ्यांना तसं शीर्षक देण्यात आक्षेप आहे. अमितव यांनी ते दोन शब्द वेगळे लिहून दाखवले तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मी तो बदल केला.

प्रोत्साहित करण्यासाठी खूप खूप आभार!

धन्यवाद सामो मी आता आता लिहायला शिकतेय. माझं वाचन सुद्धा अजून फार नाही. लिहिलेलं आवडून घेताय यासाठी आभारी आहे

ऋन्मेष.. सही पकडे है. हा हा हा

नाही सामो.. ती कविता गालववर तिचं प्रेम होतं. अशा अर्थाची होती आणि अगदी छोटी होती पंधरा-वीस ओळींची..
त्यामुळे मला कहानीत ट्वीस्ट सापडला.

Pages