मॅटर्निटी रजेबाबत मदत हवी आहे.

Submitted by अभया_००७ on 17 April, 2023 - 20:52

हा धागा मैत्रिणीसाठी काढत आहे . खरंतर मैत्रिणीची बहीण , पण माझी हिच्याशी जास्त मैत्री.
तर एका भारतीय कंपनीत अकाउंटंट आहे , कंपनी IT मधली नाहीये . हि पाच वर्षांपासून तिथे आहे .
तर ती सध्या प्रेग्नन्ट आहे , आठवा महिना सुरु आहे . कंपनीने मॅटर्निटी साठी सरळ सरळ नाही म्हटलंय . अगदी बेताची परिस्थिती नसली तरी मध्यमवर्गीय आहे . नोकरी गरजेची आहे .
कंपनीच्या कोणत्याही पॉलिसीमध्ये मॅटर्निटी साठी काहीही नाहीये, म्हणजे देतील / नाही देणार असं काहीच नाही .
मॅटर्निटी रजेचा कायदा काय आहे? कंपनीला अशी रजा देणं अनिवार्य नाही का ?
ग्राउंड लेवलला हि खरी परिस्थिती आहे कि अशा कंपन्या सुट्टी देत नाहीत . कोणीही तक्रार करत नाहीत .
काही करता येईल का ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<< कंपनीने मॅटर्निटी साठी सरळ सरळ नाही म्हटलंय. >>

कायदा काय आहे माहीत नाही, पण मॅटर्निटीची सुट्टी नाकारणे हा शुद्ध हलकटपणा आहे. अगदीच नाही तर काही दिवसतरी बिनपगारी सुट्टी देता येईल.

The Maternity Benefits Act of 2017 increased the maternity leave period to 26 weeks. अशी माहिती आंतरजालावर मिळाली, खात्री करून घेणे.

धन्यवाद उपाशी बोका !
मी तिला गूगल करूनच माहिती दिली. पण वकील , कायदेशीर प्रक्रिया करणे तिला सध्या शक्य होणार नाही . भारतात मॅटर्निटी रजा अनिवार्य आहे असंच गूगल सांगतो , पण नाहीच दिली तर कोर्ट कचेरीशिवाय पर्याय नाही का किंवा अजून काही करता येईल का अशी ठोस माहिती मला तरी कुठेही मिळत नाहीये .

अशा परिस्थितीत वकील, कोर्ट, कायदेशीर भाषा नको असे वाटते. बॉसला बाबापुता करून थोडी सुट्टी तरी दे, किमान बिनपगारी दे अशी विनंती केलेली बरी. एकदा बाळंतपण सुखरूप झाले की मग कायदेशीर मार्ग बघता येईल. महिलांना मदत करणाऱ्या काही संस्थापण असतील, त्यांची मदत घेता येईल. (असे माझे वैयक्तिक मत आहे.)

तुमच्या मैत्रिणीने तोंडी रजा मागितली की रितसर अर्ज करून? रितसर अर्ज करून त्याचा रिस्पॉन्स कंपनीला मागायला लावा.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड नसलेल्या कंपनीत एका ठराविक संख्ये पेक्षा जास्त डोकी असतील तरच maternity रजा अनिवार्य आहे

तुमच्या मैत्रिणीने तोंडी रजा मागितली की रितसर अर्ज करून? रितसर अर्ज करून त्याचा रिस्पॉन्स कंपनीला मागायला लावा.>> रजेबाबत तोंडी सांगण्यात आलं तेव्हा तिने मेल करून त्यांचं उत्तर त्यात लिहिलंय . तरी तिला हे सांगून ठेवते .

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड नसलेल्या कंपनीत एका ठराविक संख्ये पेक्षा जास्त डोकी असतील तरच maternity रजा अनिवार्य आहे>> हे सगळे क्रायटेरिया कंपनी पास करते .

१० व्यक्तींपेक्षा कमी डोकी असतील तर कायदा लागू होत नाही. १० पेक्षा जास्तं असल्यास कंपनीला कायद्यानुसार वागणे बंधनकारक असावे. रजेचा अर्ज करताना एच आर ला कॉपी केले तर उत्तम!

पण मॅटर्निटीची सुट्टी नाकारणे हा शुद्ध हलकटपणा आहे>> + १.

वर सुचविल्या प्रमाणे आधी रीतसर अर्ज करायला सांगा डॉक्टरांचे सर्टिफिकेट, इतर मेडिक रिपोर्ट जोडुन.

ESIC contribution कंपनी पगारातून काटूनभरते का? 3 महिने ESIC हा पूर्ण पगार देते.

ESIC contribution कंपनी पगारातून काटूनभरते का? >>> होय. कर्मचार्याच्या पगारातून ESIC contribution दरमहा जाते. जर मासिक पगार २१००० रु. पेक्षा कमी असेल .

ESIC मधे नाव नोदणी करावी. कंपनीला बिनपगारी सुट्टी देण्याची विनंती करावी. ESIC मॅटर्निटी तसेच पगाराची माफक भरपाई नक्कि देते.

https://majlislaw.com/
ही एक NGO आहे. ती अत्यन्त कमी शुल्कात किंवा बिनाशुल्क कायद्याची मदत करते. कदाचित तुमच्या मैत्रिणीला मदत होऊ शकते

छन्दिफन्दि धन्यवाद तिला कळवते . ती अकाउंट मध्ये आहे , तिला ESIC वगैरे माहित होतं , कंपनी पेड रजा नाही म्हणत असली तरी बाकीचं PF अकाउंट वगैरे काय करणार असे प्रश्न विचारल्यावर जरा ते गोंधळलेत . ई-मेल करून सगळं documentation करून ठेवलंय.
सर्वाना धन्यवाद .