पाउले चालती - मराठी भाषा गौरव दिन उपक्रम २०२३

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 13 February, 2023 - 19:06

पाउले चालती....

आपल्या माय मराठीचे कौतुक करावे तेवढे थोडेच! जशी आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत ; तसेच दर बारा कोसांवर आपला महाराष्ट्र देखील रूप बदलतो. कुठे सह्याद्रीच्या कुशीत तो हिरवागार तर कुठे दूरदूर पर्यंत ओसाड!
आपला वारसा जपून ठेवलेली खेडी , गावे, नगरे , शहरे महाराष्ट्रभर आहेत.

चला तर मायबोलीवर साजर्‍या होत असलेल्या 'मराठी भाषा गौरव दिवस २०२३' च्या निमित्ताने आपण जागवूया मराठी मातीतल्या आठवणी !

उपक्रमाचे नाव- पाउले चालती...

१. आपल्या गावाबद्दल किंवा आपण स्वतः भेट दिलेल्या महाराष्ट्रातील गाव,शहर,स्थळ याबद्दल लिहिणे अपेक्षित आहे. गावाची सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक अशी खास ओळख असेल तर त्याबद्दल लिहा. गावाच्या तुमच्या आयुष्यातील, मनातील स्थानाविषयी लिहा.
२. लिखाण स्वतः केलेले हवे. पूर्वप्रकाशित नसावे.
३. ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा गौरव दिवस २०२३' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
४. शीर्षक -" मराठी भाषा गौरव दिन - पाउले चालती - तुमचे नाव /मायबोली सदस्यनाम" असे द्यावे
४. या उपक्रमातील धागे २५ फेब्रुवारी २०२३ ते १ मार्च २०२३ या दिवसांत काढावेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त उपक्रम आहेत सगळेच. हाही खूप आवडला.
अनगर असा शब्द आहे? की गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेला नवीन शब्द बहाल करण्यात आलेला आहे? Lol नेमका काय अर्थ आहे या शब्दाचा?

या उपक्रमातील सर्व धाग्यांच्या लिंक्स एकत्रित करून पहिल्या पानावर ठेवल्यास सहज सापडू शकतील

सूचनांबद्दल आभारी आहोत. सर्व उपक्रमांची एक एकत्रित घोषणा लवकरच करू, म्हणजे मग सर्व धाग्यांची यादी तिथे दिसेल.