शरद पवार

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

http://72.78.249.124/esakal/20091211/4905875610779262607.htm

शरद पवारांचे अनेक पैलू प्रकाशात येणे गरजेचे - श्रवण गर्ग
सकाळ वृत्तसेवा
Friday, December 11, 2009 AT 12:15 AM (IST)
Tags: national, sharad pawar, shravan garg, snn

नवी दिल्ली - शरद पवार हे राजकीय नेते म्हणून परिचित असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू पुरेशा प्रमाणात राष्ट्राच्या समोर आलेले नाहीत. ते राष्ट्राच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यांच्यातही राष्ट्रीय नेतृत्वाची क्षमता असल्याची बाब प्रकाशात येईल, असे मत "भास्कर'चे समूह संपादक श्रवण गर्ग यांनी आज येथे व्यक्त केले.
डॉ. जनार्दन वाघमारे लिखित "शरद पवार- ए प्रोफाइल इन लीडरशिप' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ते बोलत होते. वाघमारे यांनी "दूरदृष्टी व ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतीची क्षमता असलेला नेता' अशा शब्दांत पवार यांचा गौरव केला.

श्री. गर्ग आपल्या भाषणात म्हणाले, की पवार हे राजकारणी आहेत. ते राजकारणी म्हणूनच सर्वाधिक ओळखले जातात; परंतु शेतकरी, महिला, दलित समाज यासंबंधी त्यांनी केलेले काम पुरेशा प्रमाणात प्रकाशात आलेले नाही. आपल्या प्रथम मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. तो ते अमलात आणू शकले नव्हते. पण, 17 वर्षांनंतर त्यांनी तो अमलात आणला. ही बाब सोपी नव्हती. त्यास प्रचंड सामाजिक विरोध होता. परंतु, पवार यांनी तो विरोध पत्करूनही आपला निर्णय अमलात आणला. त्यासाठी त्यांना राजकीय किंमत चुकवावी लागली. सत्तेवरून जावे लागले; परंतु त्यांनी बांधिलकी पूर्ण केली.

देशातील आर्थिक सुधारणांचे जनकत्व डॉ. मनमोहनसिंग यांना दिले जाते. परंतु, त्याआधी 1988 मध्ये पवार यांनी केलेल्या भाषणात आर्थिक सुधारणांचे चित्र व आराखडा आढळून येतो, असा संदर्भ देऊन गर्ग म्हणाले, की आर्थिक सुधारणांचे समर्थन करतानाच पवार हे गरीब, शोषित, पीडितांच्या न्यायाची भाषाही करतात. हा काहीसा विरोधाभास त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळून येतो. महिला सबलीकरण आणि महिलांना समान न्याय देण्याच्या गोष्टी सध्या सुरू आहेत; परंतु पवारांनी या चर्चेपूर्वी कितीतरी वर्षे आधी ही बाब प्रत्यक्षात आणली. शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतानाच शेतकऱ्यांनी जागतिक स्पर्धेत उतरण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे, हेही पवार सांगतात, याचाही गर्ग यांनी उल्लेख केला.
पवार यांचे राष्ट्रीय पातळीवर अपेक्षित मूल्यांकन झाले नसल्याची बाबही गर्ग यांनी मांडली. पवारांच्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजू जाणूनबुजून मांडली गेली नाही आणि अंधारात राखली गेली का हा संशोधनाचा विषय आहे. परंतु, ही त्यांची बाजूही प्रकाशात आली पाहिजे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र सदनात झालेल्या या प्रकाशन समारंभात पुस्तकाचे प्रकाशक व शकुंतला प्रकाशनाचे प्रमुख संजय बनसोडे, दिल्ली मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांचीही भाषणे झाली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे माहिती संचालक गणेश रामदासी यांनी सूत्रसंचालन केले.

प्रकार: 

मला वातते श्री. शरद पवार यांचे बंधू यांनीहि एक पुस्तक लिहीले आहे, त्यात श्री. शरद पवारांच्या सामाजिक कार्याची महिती दिली आहे. ते कायम राजकारणी नव्हते, आधी सामाजिक कार्य करून मग राजकारणात पडले असे म्हणतात. पुण्यात लक्ष्मी रोडवरील पूर्वी जिथे भानुविलास थेटर होते त्यासमोर माझे एक मित्र साने यांचे दुकान आहे. ते श्री शरद पवार यांचे वर्गमित्र. त्यांना विचारले पाहिजे.

मला तरी शरद पवार या माणसाबद्दल राग आहे. बरेच काही करण्याची क्षमता आणि सत्ता असुनही केवळ व्यक्तिगत स्वार्थ पाहण्यापलिकडे या माणसाने दुसरे काहीच केले नाही असे माझे मत आहे. गरिब शोषित पिडित यांच्या न्यायाची भाषा करायची आणि प्रत्यक्षात न्याय द्यायची़ वेळ येते तेव्हा बोटचेपी भुमिका घ्यायची हा यांचा व्यक्तीविशेष... जी सगळी बडबड प्रत्यक्षात करतात त्याच्या अगदी उलट वागणे..

पुलोद आघाडिचे मुख्यमंत्री असतांना शेतकर्‍यांची काही थकीत कर्जेही माफ केली होती.

असल्या गोष्टींना मी मुख्यमंत्र्याचे चांगले कार्य म्हणुन अजिबात महत्व देत नाही. कर्जे माफ केली ती कोणाच्या खिश्यातुन? आणि थकित कर्जे असलेले शेतकरी कुठले होते? गरीब एक एकरवाला शेतकरी की श्रीमंत बागायतदार? उलट चांगला मुख्यमंत्री असता तर कर्जे घ्यायची आणि वर ती थकीत करायची वेळच आली नसती.