B.Des बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by Ashwini_९९९ on 6 January, 2023 - 09:45

B.Des करण्यासाठी ११ वी आणि १२ वी सायन्स घेणं कम्पल्सरी आहे का? प्रॉडक्ट designing किंवा ग्राफिक डिझायनिंग मध्ये करिअर करायचं आहे. Designing madhe जायचं हे फिक्स आहे.
सायन्स अजिबातच झेपत नाहीये... त्या क्षेत्रातलं कोणी असेल तर प्लिज माहिती द्या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा भाऊ व त्याचे मित्र शिकवतात हा कोर्स. अर्थात ते आयआयटी मुंबईचे मास्टर ऑफ डिझाईन चे माजी विद्यार्थी आहेत.
मेसेज केल्यास त्यांचा दूरध्वनी देवू शकतो मी.

National Institute of Fashion Technology, National Institute of Design आणी IIT प्रॉडक्ट designing मध्ये जाण्यासाठी सायन्स घेण्याची गरज नाही. राहायला कुठे आहे आणि कितवीत आहे.
चांगल्या कॉलेज मध्ये जाण्यासाठी बर्यापैकी तयारी करावी लागते.

औध , चिंचवड मध्ये चांगल्या कॉलेज मध्ये अ‍ॅडमिशन साठी क्लासेस असतात त्यात ते तयारी करुन घेतात. हे क्लासेस एप्रिल मध्ये (१० वीची परिक्षा झाल्यावर ) चालु होतात. त्यासाठी विचारले होते.
१२ वी च्या मध्यावर ह्या सगळ्या कॉलेज च्या प्रवेश प्रक्रिया चालु होतात. पुण्यात लोणी मध्ये पण खाजगी कॉलेज आहे.

सध्या माझ्या ओळखीतली किमान ५ मुलं B. Des च्या entrance ची तयारी करत आहेत. त्यामुळे बरेच दिवस हा प्रश्न डोक्यात आहे, की खरच ह्या क्षेत्रात खूप संधी आहेत का? आणि इतर कोणता designing चा course केला जसे की commercial art, fine art, graphic designing तर मिळणार्‍या संधी आणि B. Des करून मिळणार्‍या संधी यांत बरीच तफावत असते का?
माझ्या भावाने सुमार १५ वर्षांपूर्वी BFA हा course केला. त्याच्या वर्गातल्या अनेक मुलांना product designing, UI designing मधे संधी मिळाली. मग आताच हा B. Des course नक्की कसा वेगळा आहे?

एकूणच डिझाईन चे कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे बहूतेक. माझ्या ओळखीत सुद्धा असे कोर्स करणारे किंवा करू इच्छिणारे बरेच विद्यार्थी दिसत आहेत. NID च्या प्रवेश परीक्षेसाठी दहावी अकरावी पासून क्लासेस लावून तयारी करतात मुले असे ऐकण्यात आले आहे.

डिझाईन एज्युकेशन फेस्टिवल पुण्यात ४ आणि ५ फेब्रुवारीला होणार आहे. भांडारकर इन्स्टिट्यूट . दिवसभर. बऱ्याच संस्था येतील आणि चर्चा सत्रे आहेत अशी आजची बातमी. तुम्हाला उपयोग होऊ शकतो.

@punekarp
जाऊन आलो डिझाईन फेस्टिवल ला..छान माहिती मिळाली...बऱ्याच शंका दूर झाल्या...
पुन्हा एकदा धन्यवाद...

बी डेस करण्यासाठी सायन्सची गरज नाही. माझी मुलगी यावर्षी १२वी ला आहे आणि बी डेस च्या एन्ट्रन्स देत आहे. तुम्हाला अजूनही काही माहिती हवी असेल तर विचारपूस मधे मेसेज करा..

@ मनीष..धन्यवाद..
विचारपूस मध्ये msg केला आहे. प्लिज चेक करा.