मराठी भाषा दिवस २०२३ - संयोजक हवेत

Submitted by Admin-team on 30 January, 2023 - 12:35

कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५,२०२१ चा अपवाद वगळता गेली ११ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.

मराठी भाषा दिवस हा उपक्रम मायबोलीवर साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाचे छोटे रूप मानायला हरकत नाही. फरक इतकाच की गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी आणि त्याच्या आगचेमागचे काही दिवस असा एकूण मिळून ३ किंवा ५ दिवस किंवा त्या त्या वेळेच्या संयोजकांनी ठरवल्यानुसार पार पाडला जातो. आणि हा उपक्रम करताना मुख्य भर मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रम/ स्पर्धा करण्यावर असतो हे गेल्या वर्षांतले उपक्रम पाहिलेत तर लक्षात येईल. या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन संयोजकांनी करायचे असते.

१. संयोजनात भाग घेऊ इच्छिणार्‍यांची नावे बघून अ‍ॅडमिन संयोजक निवडतील आणि मायबोलीवर त्यांचा क्लोज्ड युजर ग्रूप तयार करतील. या ग्रूपमधे उपक्रमाचा कालावधी आणि स्वरूप ठरवणे आणि उपक्रमाशी संबंधित इतर चर्चा करता येते.
२. उपक्रमाचे स्वरूप यामधे मायबोलीकरांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, पाहुण्यांकडून/ मायबोलीकरांकडून लेखन मागवणे इत्यादी ठरवावे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्यास त्या योग्य प्रकारे मिळवणे.
३. या सर्व कार्यक्रम/ स्पर्धांची जाहिरात मायबोलीवरील गप्पांच्या बाफवर करणे.
४. प्रत्यक्ष उपक्रम राबवणे.
५. उपक्रमाचा समारोप आणि निकाल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद किल्ली आणि तेजो.

आपल्याला अजून काही सदस्य हवे आहेत संयोजक मंडळासाठी. तर मायबोलीकरांनो, लवकर नांव नोंदवा.

उपक्रमा करीता हार्दिक शुभेच्छा.
पण
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे. १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
===मराठी भाषा गौरव दिन - विकिपीडिया

हो बरोबर केशवकूल. मागच्या वर्षी हे लक्षात आल्यावर उपक्रमाचं नाव बदललं होतं. कृपया ह्या वर्षी आधीपासूनच म भा गौ दि नाव दिल्यास उत्तम.

ह्या वर्षीही अनुभवी + नवे असे दोन्ही उत्साही संयोजनेच्छुक दिसत आहेत. त्यामुळे उपक्रम उत्तमच होईल ह्यात शंका नाही. सर्वांना खूप शुभेच्छा.

हो हर्पा आणि केकू , मी रात्रीच कायप्पावर बोलून दुरूस्ती सुचवली आहे !

अजून आम्हाला हॅरी पॉटरचा invisibility cloak मिळालेला नाही. तोपर्यंत कुणाला काही उपक्रम, खेळ किंवा अजून काही सुचले तर गप्पांच्या धाग्यांवर आवर्जून सुचवावे. नोंदी घेतल्या जातील. सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. Happy

१. मराठी भूतंखेतांची अमराठी भूताखेतांकडून गळचेपी
२. अमेरिकन इंग्रजी भाषिकांवर मराठी इंग्रजांकडून आक्रमण
३. दुकानदाराशी मराठीतच बोला
४. कोसला ला आॉस्कर का नाही?
अशा विषयांच्या प्रतिक्षेत

<अ‍ॅडमीन टीम, यंदा संयोजक मंडळास काही जास्तीची मदत लागल्यास मी करायला तयार आहे> - मी सुद्धा तयार आहे. किल्लीताईंना अचानक आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचे मानसिक बळ मिळो.