चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हो ना. तेव्हा तो गावी लागला आणि त्यांचं नाव पाहून गेलो.
त्यात एक गाणं आहे त्यात "याच्या बेंबीला लावू का थुका" म्हणते ते पाहुन किळस वाटली .
त्यांचे आधीचे चित्रपट बघायचे आहेत.
यादी बद्दल धन्यवाद भरत. यातले काही मी पहिल्या लॉकडाऊन मध्ये शोधले होते पण सापडले नाहीत, परत शोधेन.

ज्या चित्रपटाची कुणीच टिंगल टवाळी करू शकणार नाही अशा चित्रपटाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतातल्या पहिल्या वहिल्या सुपरहिरोचा संपूर्ण वैज्ञानिक दृष्टीकोण असलेला चित्रपट नववर्षारंभाच्या मुहूर्तावर उपलब्ध करून देत आहोत. आभार मानण्याची औपचारिकता पार पाडण्याची काहीही गरज नाही. मुद्दामून रिव्ह्यू लिहीण्याची गरज वाटली नाही. कारण पाहताना मनात ज्या भावना उचंबळून येतात त्या आपल्या सर्वांच्या सारख्याच असणार आहेत.
https://www.youtube.com/watch?v=usorqHDhUdE

पानी मे सीप जैसे प्यासी हर आत्मा, बूंद छुपी किस बादल मे - कोई जाने ना
ओह रे ताल मिले नदी के जल मे
नदी मिले सागर मे सागर मिले कौनसे जल मे - कोई जाने ना

यु ट्युब वर अनोखी रात सिनेमा पाहीला. आदर्शवादी स्क्रिप्ट आहे. आवडला. ओह रे ताल मिले - गाण्याकरता केवळ पाहीला. पण आवडला.
--------------------------
काल थिएटर मध्ये 'अवटार द वे ऑफ वॉटर पाहीला. मस्त सिनेमॅटोग्राफी. सुंदर ग्राफिक्स.

जया जया जया जया हे मस्त मुवि आहे। >>> हे "जया" आहे की "जय जय जय जय हे" - राष्ट्रगीतात आहे तसे?

नेफिवर डबल एक्सएल का काहीतरी नाव असलेला पिक्चर कोणी बघितला का? मी सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी चा एक सीन पाहिला. इंटरेस्टिंग वाटतोय. मराठीत तो एक 'वजनदार' आला होता त्याच्याशी काही साम्य आहे का कोणास ठाउक.

मी बघितला आहे डबल एक्सेल, बरा आहे. सुरवातीला चांगला आहे. शेवटी बोअर होतो. ट्रेलर मधे वाटतो तितका धमाल नाही. हिरो फार लेम वाटतात. त्यांची बॉडी इश्यू अवेअरनेस चमत्कारासारखी अचानक होते, आधी चिडक्या उदास वाटणाऱ्या वजनदार मुली अचानक आनंदी, यशस्वी पऱ्या होतात. त्यांनी निरोगी रहाण्यापेक्षा आम्ही एकेकटी सहा लार्ज पिझ्झा स्लाइस खाऊ शकतो, तुम्ही आम्हाला समजून घेतलं पाहिजे हा संदेशही एकदा दिला आहे. मला हुमाचे काम आवडले, तिची व्यक्तिरेखा स्थिर वाटली. सोनाक्षीची विशेष वाटली नाही, विस्कळीत वाटली.

पहिल्या वहिल्या सुपरहिरोचा संपूर्ण वैज्ञानिक दृष्टीकोण असलेला चित्रपट नववर्षारंभाच्या मुहूर्तावर उपलब्ध करून देत आहोत >>> धन्यवाद Happy

थोडासा पाहिला. धरमचे याच शब्दांचे एक गाणे होते. मला वाटले तोच पिक्चर आहे. पण हा वेगळा दिसतो. भारतीय रेल्वेवर मार्मिक टिप्पणी यात आहे. एका मुलाला बरोबर न नेता त्याची टीम निघते. मग तो एका रेल्वेबरोबर धावताना दिसतो. ती गाडी नक्की किती दिवस लेट आहे माहीत नाही पण ते लोक पोहोचल्यावर सगळेच ८-१० वर्षांनी मोठे झालेले दिसतात, आणि त्यातले एक दोन जण शक्ती कपूर व पुनीत इस्सार झालेले असतात Happy

त्यांची बॉडी इश्यू अवेअरनेस चमत्कारासारखी अचानक होते >>> Lol

ओके थँक्स. तुकड्यातुकड्यांत बघेन बहुधा Happy

मला हुमाचे काम आवडले, तिची व्यक्तिरेखा स्थिर वाटली. >>> एक मिनीट मला ही पन वाटली. मग नंतर लक्षात आले की नाहीये Happy

मी आत्ताच बघत होतो. त्या परदेशात गेल्यावर सामानाची अदलाबदल होते हा हाय पॉईंट आणि त्यावर पुढचा चित्रपट असेल असं दिसू लागल्यावर माझे पेशन्स संपून बंद केला. बाकी अजूनतरी वजनदारपणावर मुद्दाम सीच्वेशन तयार करून तीर मारणेच चालू आहे. ते फार पुरातन आणि लेम वाटतंय.

भारतीय रेल्वेवर मार्मिक टिप्पणी यात आहे. एका मुलाला बरोबर न नेता त्याची टीम निघते. मग तो एका रेल्वेबरोबर धावताना दिसतो. ती गाडी नक्की किती दिवस लेट आहे माहीत नाही पण ते लोक पोहोचल्यावर सगळेच ८-१० वर्षांनी मोठे झालेले दिसतात, >>> Lol

धरम पाजींचे हेच गाणे ना ? व्हिडीओ उपलब्ध नाही बहुतेक या गाण्याचा.
https://youtu.be/JftojVXDwL4?t=50

धर्मेंद्र सुपरहिरो मोड मधले अजून अएक गाणे
https://www.youtube.com/watch?v=pf2PET_0p4I

गोविंदा आणि किमी काटकर अनुक्रमे सुपरमॅन आणि स्पायडरवूमन असलेले गाणे
https://www.youtube.com/watch?v=yY-3hlxn2oU

ते दिव्य बालक अशोक कुमारला सापडते तेव्हां अशोककुमारचे जे वय असते तेच बालक मोठा झाल्यावर सुद्धा असते. दोन्ही लूक मधे अजिबात फरक नाही. अशोक कुमार यांच्याकडे अँटी एजिंग फॉर्म्युला असावा किंवा ते परग्रहावरून आलेले असावेत.

त्या दिव्य बालकास ज्या काचेच्या टोपलीत ठेवून अवकाशात सोडतात तिच्यात एक थर्माकोलचा ट्रे असतो आणि त्याला चंदेरी कागद लावताना पडलेल्या चुण्या स्पष्ट दिसतात. त्या काचेच्या टोपलीला पण तो (सिगारेटच्या पाकिटात असतो तो कागद, बहुतेक आख्ख्या युनिटला सिगारेटची पाकीटे फेकू नका असा आदेश दिलेला असावा) कागद लावताना चुण्या पडलेल्या दिसतात. त्या टोपलीचा आकार कोरोनाच्या विषाणूसारखा आहे. हा चित्रपट १९७८ साली बनला आहे (रिलीज झाला कि नाही माहिती नाही). पण १९७८ सालीच कोरोनाचा विषाणू अवकाशातून पृथ्वीवर येणार आहे हा इशारा देण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या लक्षात आला नाही हे नागरिकांचे दुर्दैव !

संवादलिखाणातला साधेपणा आणि वास्तवाचे भान यामुळे भलताच इम्प्रेस झालो. या प्रसंगातले संवाद वाचा.

" अरे डॅडी, आप कब आये ?"
" हुं हुं हुं बेटा, मै आज ही आर्मी से रिटायर हुआ और अभी अभी पहुंचा हूं "
" ये तो अच्छी बात है डॅडी, अब मै आपके साथ रह पाऊंगा "
" हा हा हा हा. बेटा , आज मेरे रिटारमेंट की पार्टी देनी है, तुम ऐसा करो जाकर पार्टी का इंतजाम करो "
" अभी जाता हूं डॅडी, देखना ऐसी धूम मचाऊंगा कि आप देखते ही रह जायेंगे"

या संवादातून आपल्याला समजते कि आर्मीत अचानक रिटायर करून सरप्राईज देण्याची जी पद्धत आहे त्यामुळे आर्मीच्या अधिकार्‍यांवर अचानक पार्टी देण्याचा प्रसंग नेहमीच ओढवत असतो. पण काही आर्मीचे अधिकारी नशीबवान असतात. त्यांची मुलं शॉर्ट नोटीस वर पार्टी थ्रो करण्यात वाकबगार असतात. एव्हढ्यासाठीच मुलं मोठी झाली कि त्यांच्या पार्ट्या, नाईट आउट वगैरेंवर बंधने आणू नयेत. कुठला अनुभव कुठे कामी येईल हे सांगता येत नाही.
खरोखर असे संदेश देणारे काळाच्या पुढच्या सिनेमे आपल्याकडे यशस्वी का होत नाहीत यावर एक धागा निघायला हवा. कमीत कमी ख्रिस्तोफर रीव्हचा सुपारीमॅन इंग्रजीच्या समस्येमुळे समजला नसेल तर त्याचे भाषांतर समजण्यासाठी तरी अशा चित्रपटांची गरज असतेच. त्या वेळी जर आपण करंटेपणा केला नसता तर त्याच वेळी आपण हॉलीवूडला टक्कर दिली असती. आज त्यांचे हिंदीत डब्ड सिनेमे हिट होताना पाहण्याची आणि हिंदी सिनेमांना रिकामे थिएटर हे बघण्याची पाळी आली नसती. Sad

रघू धागा काढून डिट्टेल वारी पिसे काढा ना लापि. कोनता आहे हा सिनेमा?
सर्व धागे करास्नि नव वर्शाच्या हार्दिक शुभेच्छा. मी काल पहिला नाइव्झ आउट बघितला.

क्रिस इवान्स आहे. जेम्स बॉड आहे एक खतरनाक कायकी अ‍ॅक्सेंत मध्ये. दोन छानसे कुत्रे आहेत. त्या घरात अनावश्यक सामान किती आहे. ८५ वर्शाचा म्हातारा व त्याची आई राहतात तर ते धडपडायची शक्यता किती वाढते. इतके पुतळे बाव्हल्या आहेत की माणूस कोन व भावली कोन ते समजतच नाही बरेच वेळा. हिरवीण गोड आहे. पण सारखी ओकते!! आय कांट हेंडल दॅट.

कथेतले घर आम्च्या मर्ज ड्रागन गेम मधल्या हॅलोविन इवें ट मधील लेव्हल सिक्क्ष घरासारखे दिसते. इतकेच कायते.

Topgun पाहिला. मस्तच आहे. शेवटी क्लिशे आहेतच. पण बघायला मजा आली. थिएटरमध्ये बघायला हवा होता.
Tom च्या चेहर्यावर वय दिसतं. पण ते योग्यच आहे. बारमध्ये मुलं त्याला uncle म्हणतात ते मजेशीर वाटतं.
मला पहिल्या भागातील Goose सोडून कोणीच आठवत नव्हते , पण फरक पडला नाही. पहिला भाग नाही बघितला तरी हा समजेलच.

"वेड" पाहिला. हलका फुलका छान आहे. संगीत, छायाचित्रण आणि सर्वांचा अभिनय जमून आलाय. (जेनेलियाच्या मराठी उच्चार कडे दुर्लक्ष करा) अशोक सराफ फार दिवसांनी पडद्यावर दिसले. नक्की पाहा.

धरम पाजींचे हेच गाणे ना ? व्हिडीओ उपलब्ध नाही बहुतेक या गाण्याचा. >>> हो हेच ते गाणे Happy धन्यवाद

बाकी ते अचानक रिटायरमेण्ट, अ‍ॅण्टि एजिंग फॉर्म्युला सगळे धमाल Lol

रघू आचार्य Lol
अशोक कुमार यांच्याकडे अँटी एजिंग फॉर्म्युला असावा किंवा ते परग्रहावरून आलेले असावेत.>>>मिस्टर इंडिया मधेही घड्याळ देणारे तेच ना , सर्व सुपरहिरोचे 'एन्शियंट वन' Lol

फारएण्ड, फेफ, अस्मिता - धन्यवाद.

गोविंदा नाम मेरा ठीकठाक आहे. अधून मधून चक्क कंटाळा आला. हा रोल विकी कौशल टाईप नव्हता पण त्याने उत्तम जमवलाय. बहुधा गोविंदाच्या शैलीत वरूण धवन साठी लिहीला असावा. विकी कौशल असे सिनेमे करू शकतो हे समजले. रणवीर सिंगला मिळणारे प्रोजेक्ट्स त्याला दिले तर निर्माता आणि प्रेक्षक दोघेही फायद्यात राहतील.

दक्षिणेत अशा शैलीच्या चित्रपटांची एक वेगळी (आता राजसडक) वाट आहे. मधले तपशील गाळून ते शेवटी सांगणे म्हणजे सस्पेन्सचा भास होतो. कहानी मधे ही शैली सर्वात जास्त प्रभावी पद्धतीने आली आहे, कारण कहानीचा प्लॉट सुद्धा विलक्षण होता.
सफाईदार शैली सोबतच घाट ही उत्तम असल्याने कहानी -१ अफलातून झाला. कहानी २ मधे शैली आणि कथेचा घाट किंचित कमी पडल्याने ती मजा आली नाही.

दक्षिणेच्या चित्रपटात आता सफाईदार शैलीवर भर देतात. कथा एकदम सुमार असते. गोविंदा नाम मेरा ची कथा सुमार च्या थोडीशी वर आहे. जर सरधोपट मार्गाने आला असता तर या कथेत काहीही दम नाही. अशा पद्धतीचे गेल्या वर्ष दीड वर्षात (किंवा जास्त काळ झाला असेल) डब्ड सिनेमेच वीस एक पाहिलेत. एखाद दुसर्‍याची कथा आणि घाट छान होती पण ते दुर्दैवाने संथ होते. मामुट्टीचा एक होता. दोन्हीचा मेळ जमला तर हमखास मनोरंजन आहे हे नक्की.

संवादलिखाणातला साधेपणा >>> यावरून आणखी एक संवाद आठवला. अशोक कुमारच्या बायकोला कोणाचातरी फोन येतो. तेव्हा ती सांगते "इनको झाडोंको पानी देनेकी आदत है" हिंदीत झाडाला झाड म्हणताना आधी ऐकले नव्ह्ते. कदाचित कोणत्यातरी बोलीत म्हणत असावेत.

पुनीत इस्सारला लहानपणीच इतकी पॉवर मिळते म्हंटल्यावर त्याने या पिक्चरच्या आधीच ती कुली मधली बुक्की मारली म्हणून बरे झाले Happy

मल्यालम मुव्हीज वेगळेच असतात>>>> +१०००

Chola (shadow of water)
मल्याळम प्राईमवर.
एक स्कूलगर्ल प्रियकरासोबत एका दिवसाच्या ट्रिपसाठी जवळच्या शहरात जाते.सोबत प्रियकराचा बॉस पण असतो.दिवसभर फिरून झाल्यावर परतीच्या प्रवासात स्ट्रेन्ज गोष्टी घडतात..निसर्ग द्रुश्ये अप्रतिम.. प्रतिकात्मक आहेत नायिकेच्या मनस्थिती नुसार....ग्रेट इंडियन किचनवाली नायिका आणि जोजू जॉर्ज आणि तो प्रियकर तिघंच आहेत सिनेमात....डार्क सिनेमा..

Hope कन्नड प्राईमवर.
प्रत्येक गवर्नमेंट ऑफिसरच्या करियरमधे येणारे प्रसंग.. राजकारण्यांचा हस्तक्षेप.. स्वतः च्या हक्कासाठी वर्ष वर्ष कोर्टाच्या घालाव्या लागणार्या फेर्या... यावर भाष्य करणारा सिनेमा.

मी म्हटलं ना, प्राईम वर सॉंग ह्ये क्यो सर्च केल्यावर फक्त यंग शेल्डन चे 6 सिझन आले. (अरे हां आता परत पाहिलं.बिग बँग थिअरी चे सर्व एपिसोड आणि थँक गॉड पिक्चर पण आलाय रिझल्ट मध्ये. या सगळ्यांच्या उच्चारात सेम आघात आहेत.पण सॉंग ह्ये क्यो सर्च केल्यावर राम सेतू का यावा रिझल्ट मध्ये हे गूढ मात्र उलगडणार नाही आजन्म.)
प्राईम बहुधा 'साऊंडस लाईक' पद्धत वापरत असावे Happy

"A random sugession for you "
च्या जागी "Because you watched ..." असे शीर्षक कोणी कॉपी पेस्ट केले त्याला भेटायला हवे.
त्यांच्या कडे algo लिहिण्यास कोणी ठेवले असेल असे वाटत नाही.

नेटफ्लिक्स इतक बारिक लक्ष ठेवुन असत एकदम गुजराथी माणसासारख...हे पाहिल ना आता हे पाहाच, अहो हे आवडल ना मग हेही आवडेलच अस करुन पटवत राहतात.
त्याउलट प्राइम एक्दम पुणेरी दुकानादारासारखे... एकतर त्यावर निट काहीच सापडत नाहीवर वर आहे ते घ्या म्हणून भलतच काहितरी गळ्यात मारायच्या मागे.
मला प्राइम वर नविन काही आलय हे इथे वाचुनच कळत.

Pages