कुत्रे पालन - काही गैरसमजुतींचे निराकरण

Submitted by अश्विनीमामी on 2 December, 2009 - 10:53

Disclaimer: This article is based on personal experience only. I am not a trainer or vet. But more of a Dog Whisperer.

मायबोलीवरील एक प्राणी मैत्रीण व पर्यावरणप्रेमी व्यक्ती म्हणुन खालील माहिती लिहीत आहे. खूप लोकांना कुत्रे तसेच इतर पाळीव प्राणी फारसे आवड्त नाहीत. आपल्या साहित्यातही कुत्रे/ पक्षी पाळणार्‍यांची गणना विक्षिप्त लोकांच्यात केली जाते किंवा बालीश आवड म्हणुन ह्या छंदाची बोळवण केली जाते. अर्थात वानुची गोष्ट व तसे सन्माननीय अपवाद आहेतच. कुत्र्यांबद्दल खालील गैरसमज प्रचलित आहेत.

१) कुत्रा चावला की रेबीज मग इन्जेक्षने नाहीतर हायड्रो फोबीया व मरणच.
हे घरात न पाळलेल्या/ रस्त्यावरील भट्क्या कुत्र्यांच्या बाबतीत खरे असु शकते. त्यांच्या बाबतीत चान्स घेउ नये. पण घरात पाळलेल्या कुत्र्यांचे जन्मल्यापासुनचे अतिशय कड्क इन्जेक्षन्स चे शेड्यूल असते ते काटेकोर पणे पाळले व नंतर दर वरषी बूस्टर डोस दिला तर त्रास नसतो.
http://www.who.int/mediacentre/factsheets/fs099/en/

प्रगत देशांमध्ये रेबीज वट्वाघुळे, जंगली प्राणी यांच्या चाव्यामुळे व्हायचा धोका जास्त असतो.
घरी पपी आणणार असल्यास प्राणीतज्ञांचा सल्ला जरुर घ्या.

२) कुत्रे पालन हा श्रीमंतांचा षोक/ शौक आहे. पॅरिस हिल्ट्न वगैरे जे खेळणी टाइप
कुत्रे घेउन हिंड्तात ते बघुन किन्वा राव बहादुर टाईप लोक भला मोठा अल्सेशिअन घेउन जाताना बघुन असा गैर समज होणे साहजिक आहे. पण छोट्या ब्रीडचे कुत्रे किंवा शेल्टर मधुन दत्तक घेतलेले कुत्रे तर
अतिशय कमी खर्चात येतात. त्यांचा पहिल्या वरषी व्हेट चा खर्च असतो.

३) त्यात काय? आणू की कुत्रा!
कुत्रा घरी आणणे हा लग्न/ मुल होउ देणे या पातळी वरचा महत्त्वाचा निर्णय आहे. मुले मोठी होतात पण कुत्र्याला कायम तुमच्या आधाराची गरज असते व तो दिला नाहीत तर ते दुक्खी होतात. हा निर्णय घाइत किन्वा चुकीच्या कारणांसाठी घेउ नये. घरातील सर्वांचा विचार घेउनच घरी पेट आणावे. जनरली कपल पैकी एकाला पेट्स आवड्तात व दुसर्‍याला आवड्त नाहीत. मुलांना आवड्तात पण कुत्र्यांचे जे काम रोज करावे लागते ते त्यांच्या ने होत नाही. व ज्याच्या वर ते काम पड्ते तो वैतागण्याची वेळ येते.

४) कुत्र्यांचे काम फार असते

कुत्र्यांचे जे मेन खाणे पेट फूड ते फार महाग नसते. कुत्रे अतिशय प्रमाणात खातात. मोठ्या ब्रीड ला अर्थातच जास्त खायला लागते पण ग्रेट डेन वगैरे घरी आणणारा माणुस नक्की त्याची सोय करणार. दुध वगैरे देणे आपल्या हातात आहे. बाकी औषधे, शांपू, बेल्ट व लीश हे महत्त्वाचे खर्च. पण ते आपल्या आयुष्यात जे आनंदाचे क्षण आणतात त्या मानाने तो खर्च जास्त वाट्त नाही. कुत्र्यांना फॅन्सी कपडे/ दागिने/ कॉस्च्युम्स वगैरे घालणे वेस्ट आहे. तो एक हौसेचा भाग आहे. त्याना ते आवड्त नाही. अपमान वाट्तो. त्यांना महागडे झोपायचे बेड्स व इतर वस्तु लागत नाहीत. जुने आराम दायक क्विल्ट/ पोते हिवाळ्यात व जमीन उन्हाळ्यात त्याना बास होते.
( भारतात तरी. परदेशात प्राणी तज्ञाचा सल्ला घ्यावा. )

५) कुत्रे पालन ही एक सुपरफिशिअल अ‍ॅक्टिविटी आहे.

कुत्रे तज्ञ असे म्हणतात की आयुष्यातील कोणती ही बदलाची प्रक्रीया सह्य करायची असेल तर कुत्रा पाळावा. जसे तारूण्यातुन मध्यमवयाकडे जाणे, मुले परदेशी/ बाहेरगावी गेल्याने एकदम येणारे रिकाम पण
मानसिक धक्क्यातुन सावरण्यासाठी आवश्यक असणारा वेळ घालविण्यासाठी. अपंगपण सहन करताना इ. थेरपी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलेले असते. त्यांच्या रूटीन बरोबर आपले रुटीन फिट करता येते.
http://en.wikipedia.org/wiki/Therapy_dog

http://news.nationalgeographic.com/news/2002/08/0808_020808_therapydogs....
या विषयावर सगळ्यात चान्गले काम दस्तुरखुद्द अमेरिकेतच झाले आहे व होते आहे. भारतात शहरातील व्हेट्स व समुपदेशकांना याची माहिती असते.

६) २४ तास बांधले तर बरे या मेल्या कुत्र्यांना!

महत्त्वाचे म्हणजे भारतात कुत्र्यांना बांधून घालायची सवय असते ते कुत्र्यांच्या द्रुष्टीकोनातून अतिशय घातक. एक तर हालचाल नाही. व स्वातंत्र्यावर घाला. असेच कुत्रे जास्त वाइट स्वभावाचे व चावरे भुंकरे होतात. आपल्या घरात त्यांना चान्गली वागणूक मिळाली तर ते वाइट स्वभावाचे होत नाहीत. बांधलेले
कुत्रे काळजी एकटे पण, भय याने ग्रस्त असतात व त्यातुन भुंकत असतात. कुत्रा हा अतिशय सोशल प्राणी आहे. त्याला मागे बांधून घालणे व मालकाने इग्नोअर करणे यासारखे दु:ख नाही.

७)कसली ती कुत्री? काय उपयोग कुत्री पाळून?

मालकावर प्रेम, आज्ञाधारक पणा घरातील सभासदांसाठी लॉयल्टी हे त्यांचे गुण अनन्यसाधारण आहेत.

८) माझ्या जीवनात मी कुत्र्याला लिमिटेड अ‍ॅक्सेस देइन.
कुत्र्यांना व्यायाम आवड्तो, खेळायला आवड्ते. याचा उपयोग करून आपण व मुले आपल्या बैठ्या जीवनातुन बाहेर पडून चालणे पळणे असे व्यायाम करू शकतो, जिम ला न जाता. कुत्र्यांमुळे आपल्या इतर नातेसंबंधांना पण एक वेगळे अस्तर मिळते. अर्थात हे सर्व कुत्राप्रेमींसाठी. कुत्रे आवड्तच नसतील तर त्यामुळे वाईट भांड्णे पण होउ शकतात. कुत्र्यांना जास्त वेळ व लक्ष दिले तर दुसर्‍या पार्टनर ला ते आवडेलच असे नाही. मला कुत्रे चालविताना काही लोक असे भेट्ले आहेत की जे कुत्र्यांपेक्षा टेरीटोरिअल असतात व त्यांना कुत्रा म्हणजे आपल्या वैयक्तिक स्पेस वर आक्रमण वाट्ते.

९) मला घर अतिशय, फारच स्वच्छ लागते. मी हाउस प्राउड आहे. कुत्रा बाहेरच बरा!
कुत्रे छोट्या घरात पाळताना घरातील स्वच्छता टिकविणे अवघड गोष्ट आहे. कितीही ट्रेन केले तरी.
लहान पपीजचे दात शिवशिवतात. गाद्या, उश्या, क्विल्ट्स फाड्तात. चपला बूट व रबर स्लिपर्स पण!
ते कधी मधी ओकतात, कार्पेट घाण करतात. त्यांचे केस पड्तात. विचार करा! सोवळे ओवळे पाळणे अशक्यच कारण त्यांना चिकन/ बीफ खायला लागते. घरात हाड्के सांड्तात.

१०) कुत्रा अलग माझी फ्यामिली अलग.

मला अमेरिकन कुटुंबांची एक गोष्ट खूप आवड्ते म्हण्जे ते कुत्र्यांना पण एक घरचे सभासद मानतात.
घरे मोठी असल्या ने बहुतेक सोपे जात असेल. मुलांना वाढताना कुत्रे अतिशय चान्गले मित्र बनतात.
व म्हातार्‍यांना सोबत. मार्ली व मी पाहावा. वुफ वुफ.

गुलमोहर: 

साठी काही ट्रेनिंग ( भुंकू नये म्हणून) देतात का?>> माहीत नाही. घरच्या कुत्र्याचा तोच चार्म आहे ना. बेल वाजली की कुठुन असेल तिथून धावत पळत जाणे व भुंकणे. आमच्याकडे तर टीव्हीत कार्यक्रमात किंवा जाहिरातेत बेल वाजली तरी भुंकतात. तुम्हाला स्टफ टॉय किंवा रोबो डॉग पटेल आजिबात काहीच करत नाही.

कतार मध्ये डॉग शेल्टरमध्ये जाउन काही लोकांनी २९ कुत्रे गन ने मारुन टाकले> त्या गोड आत्म्यांना श्रद्धांजली. उपरवाला सब देखता है.

आमच्या इथे हल्ली कुत्रा फिरवताना छान छान रेनकोट घालतात. मला कुत्रा फार आवडतो. पण पाळायला नाही. रस्त्यातले, भटकंतीच्या वेळी बरोबर येणारे आवडतात. गरीब असतात बाहेरचे.

एकदा (लोहगडावरचे कोठार) गुहेत झोपलेलो आणि रात्री दहाला काही खुसपूस आवाज आला म्हणून उठलो तर एक कुत्रा काही पकडायला धावत होता. म्हणजे जो माझ्याबरोबर वर आला लोहगडवाडीतून तो तिथेच गुहेपाशी राखणीला बसलेला होता! मग दुसरे दिवशी सकाळी माझ्याबरोबरच खाली आला.

पाळीव कुत्रा हा विषय निघाला की अनेक प्रसंग डोळ्या समोर येतात.
ग्रँड रोड ते मलबार हील असा रोजचा पायी प्रवास करायचो ऑफिस मध्ये जाताना.
Via हँगिंग गार्डन.
अनेक स्वभावाचे कुत्रा पालक तेव्हा रोज दिसायचे.
1)ज्यांनी कुत्रा फिरवून आण्यान साठी नोकर ठेवले आहेत असे
जास्त करून ह्या मुलीचं असायच्या.
एका हातात मोबाईल कानाला लावलेला दुसऱ्या हातात कुत्र्याची रस्सी.
ती आपल्याच धुंदीत.
कुत्र्या कडे बिलकुल लक्ष नाही.
ते रस्त्यावर ,फूटपाथ वर संडास करत आहे ह्या काही देणेघेणे.
२) स्वतः मालक ह्यांचे कुत्र्यावर लक्ष असते पण त्यांनी संडास वैगेरे केली तरी ह्यांचे ह्यांना काहीच सोयर सुतक नाही.
३)ही जमात पण मालक च पण खरे कुत्रा प्रेमी.
पूर्ण लक्ष ह्यांचे कुत्र्यावर.
त्याला कुठे थांबायचे असेल तर हे थांबणार.
जोर जबरदस्ती नाही.
कुत्र्याने रस्त्यात संडास केली तर हातात ग्लोव्हज चढवून ते उचलणार.
सोबत आणलेल्या प्लास्टिक पिशवीत ठेवणार.
आणि कचऱ्याच्या पेटीत च टाकणार.
दोन पारशी श्रीमंत मुली मला रोज दिसायच्या चौपाटीवर.
त्यांना ही सवय होती.
खूप आदर वाटायचा त्यांचा.

तुच्छ कटाक्ष शी शी दूर हो म्हणून हेटाळणी पूर्वक बोलणे>> ही माझी अत्यंत आवडीची गोष्ट आहे. फरक एवढाच की असे केवळ आणि केवळ माणसासोबतच वागतो Wink

Filmy
बरोबर..कुत्र्याचे मालक च नीट जबाबदारी नी वागत नाहीत त्यांची हौस आणि बाकी लोकांना त्रास हा प्रकार सर्रास घडतो

मला वाटते सगळ्या श्वानप्रेमी जनतेने पक्षी अश्विनीमावशी, आशुचॅम्प वगैरेंनी श्री हेमंत ह्यांना एक प्रतिज्ञापत्र (मराठीत हापीडेव्हीट) लिहून द्यावे ज्यात

१. आम्ही डॉग/ श्वान वगैरे न म्हणता कुत्रं असंच म्हणू
२. आम्ही कुत्र्याला डॉग फूड चिकन इत्यादी स्पेशली न घालता रोजच्या भाज्या आमट्या, सणावाराला पुरणपोळी अन रविवार ते रविवार आम्ही चोखुन फेकलेली चिकन/ मटनची हाडकंच तितकी देऊ (अंडी अजिबात देणार नाही)
३. कुत्र्यांना पट्टे हार्नेस वगैरे न घालता हार्डवेयरच्या दुकानात मिळणाऱ्या लोखंडी साखळ्याच घालू, किंवा त्याहून बेस्ट कुत्रे बिनापट्टा (नागडेच ?) पोसू
४. कुत्र्याला विदेशी नावे किंवा हॉलिवूड सिनेमातील नावे न देता टिप्या, राज्या, खंड्या ही ग्रामीण नावे देऊ तसेच सिनेमाची नावे द्यायची असल्यास बॉलीवूड प्रणित हिरा ठाकूर, राज मल्होत्रा, राहुल इत्यादी नावेच देऊ

५. वरील पूर्ण अटींचे पूर्ण पालन करून आम्ही श्वानप्रेमी न राहता "कुत्रे पालक" होऊ असे आम्ही लिहून देतो कारण आमचे भांडवलशाही श्वानपालन चूक अन तुमचे समाजवादी कुत्रेपालन उत्तम हे आम्ही शरण येऊन मान्य करतोय

असे लिहून द्या, तोवर काही ते ऐकायचे नाहीत हो देवा महाराजा !

हाहाहा हाहाहा.
सध्या हास्यक्लब बंद आहेत म्हणून इथेच हसून घेतो.
---------
डॉग/ श्वान वगैरे न म्हणता कुत्रं असंच म्हणू
तसे हापिडेविटमध्ये लिहा हो,पण इथे लेखात dog, dog food असे इंग्रजीत लिहा. म्हणजे गूगलचा रोबोट ते वाचून /सेन्सून/ हुंगून तशा जाहिराती पाठवेल. आता डेकरेशन लाइटच्या जाहिराती आहेत दहा हजार ते चार लाख किंमतींची झुंबरे आहेत. पण तुमच्या lovely dog साठी एलइडी लाइट कमरपट्टा येईल. दरवर्षी एवढा तरी खर्च करायला नको का for dog's wardrobe ?
आपल्या माबोचे उत्पन्न वाढेल.

कुत्र्याने रस्त्यात संडास केली तर हातात ग्लोव्हज चढवून ते उचलणार.
सोबत आणलेल्या प्लास्टिक पिशवीत ठेवणार.

अशा डिस्पझबल पिशव्यांचा धंधा करण्याचे पोटेन्शल दिसले नाही का कुणाला? मागे बांधण्याच्या दोऱ्यासह.

हेतू लक्षात घ्या.सार्वजनिक जागेत घाण करणे हे पटत नाही .
प्लास्टिक ऐवजी दुसरा योग्य पर्याय देशात उपलब्ध नाही

अशा डिस्पझबल पिशव्यांचा धंधा करण्याचे पोटेन्शल दिसले नाही का कुणाला?>>>

आहे की, विकतच मिळतात
आणि पुप क्लेकटर पण मिळते ऍमेझॉन ला
आमच्या ओड्या ला मी लोकांच्या दारात फिरवत नाही त्यामुळे अद्याप गरज वाटली नाही ते पुप घ्यायची
फिरायला जातो तेव्हा वर्तमानपत्र ठेवतो सोबत

व्ह

. आम्ही डॉग/ श्वान वगैरे न म्हणता कुत्रं असंच म्हणू>> कुत्रेच म्हणतो. आणि प्रत्येकाला छान नावे पण देतो.
२. आम्ही कुत्र्याला डॉग फूड चिकन इत्यादी स्पेशली न घालता रोजच्या भाज्या आमट्या, सणावाराला पुरणपोळी अन रविवार ते रविवार आम्ही चोखुन फेकलेली चिकन/ मटनची हाडकंच तितकी देऊ (अंडी अजिबात देणार नाही)>> चिकन ची हाडे देणे बरोब्बर नाहीच आतड्यात अडकतात ती. पोट खराब असले तर ( कुत्र्याचे व कुत्र्याला) दहीभात/ तूप भात देतो. माझे कुत्रे चिकन फ्राइड राइस आवडीने खाते व्हेज पुलाव मागवला तर त्यातले पनीर मागून घेते. पोळी बनवताना मी तिला एक बारकी बनवते व तूप लावोन जमिनीवर ठेवुन निघून जाते. ती कधेतरी सापडल्यावर हे आरामात पळवोन आणते. पण कुत्र्याचे वय आजार गरजा लक्षात घेउन बनवलेले डॉग फूड देणे श्रेयस्कर.
३. कुत्र्यांना पट्टे हार्नेस वगैरे न घालता हार्डवेयरच्या दुकानात मिळणाऱ्या लोखंडी साखळ्याच घालू, किंवा त्याहून बेस्ट कुत्रे बिनापट्टा (नागडेच ?) पोसू>> लोखंडी साखळ्या नी मानेला दुखापत होईल ना. व तो काही कैदी नाही. घरचा लाडका मेंबर आहे. विनापट्टा कुत्र्यांशी मी कायम मैत्री ठेवुन असते ते नीटच वागतात. पट्टे घालायची पद्धत हुमन्स साठी आहे.
४. कुत्र्याला विदेशी नावे किंवा हॉलिवूड सिनेमातील नावे न देता टिप्या, राज्या, खंड्या ही ग्रामीण नावे देऊ तसेच सिनेमाची नावे द्यायची असल्यास बॉलीवूड प्रणित हिरा ठाकूर, राज मल्होत्रा, राहुल इत्यादी नावेच देऊ>> मी पिस्तुल्या बंड्या ही नावे ऐकलेली आहेत. एक नाव असले तरी हजार तरी लाडाची नावे अस्तातच. आमची पूपी प्रिन्सेस आहे.

५. वरील पूर्ण अटींचे पूर्ण पालन करून आम्ही श्वानप्रेमी न राहता "कुत्रे पालक" होऊ असे आम्ही लिहून देतो कारण आमचे भांडवलशाही श्वानपालन चूक अन तुमचे समाजवादी कुत्रेपालन उत्तम हे आम्ही शरण येऊन मान्य करतोय>> शेपटी हलवून धन्यवाद.

एकदा मुंबईला , मुंबईचा पाऊस पडत होता म्हणजे धो धो धो धो. कुर्ल्याच्या खादीला भरती आलेली व एक कुत्री पिलावळ घेउन आमच्या बिल्डीगच्या आश्रयाला आलेली. त्यात माझ्याकडे, दूध फाटले. मग काय ते सगळे पनीर तिला खायला घातले. बिचारी पिल्लांना पाजणार कशी अन त्यांचे रक्षण करणार कशी.
पण तदुपरान्त ती इतकी निष्ठावान झाली. मी दिसले रे दिसले की शेपूट हलविणे वगैरे.

मी रिटायर झाले. आता पशु पक्षी प्राणि मित्र संस्था काढायचे डोक्यात आहे. माझे एक जुने फेसबुक पेज आहे. क्लॉज अँड पॉज म्हणून तेच नाव घ्यायचे ठरवले आहे. अजून काय लागते त्याचा शोध चालू आहे. बी एम सीत रजिस्ट्रेशन करावे लागेल बहुतेक. सध्या पिशवीत अन्न, पाणी, जुजबी औषधे कुत्र्यांसाठीचे वेट वाइप्स घेउन फिरत आहे. प्लस ट्रीट्स. भटक्या कुत्र्यांना कधी कोनी ट्रीट्स देत नाही. त्यामुळे त्यांना दिले की फार आनंद होतो व निवांत जागा शोधुन खात बसतात.

सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी व जीझस ख्राइस्ट ह्यांचे चित्र आमच्या व्हेट कडे लावले ले बघितले आहे. सेंट फ्रान्सिस प्राण्यांचा संत मानला जातो.
तसेच आपले एकनाथ महाराज व दत्त गुरू - मागे गाय व पुढे चार कुत्रे - ह्यांचे स्मरण करून पाउल टाकले आहे. येथील रोट री क्लब जॉइन करुन त्यांच्या कम्युनिटी सर्विस भागातून जास्त चांगली जनसेवा व प्राणी सेवा करता येइल. ते करणार आहे. प्राण्यांचे स्टरिलायझेशन कसे करवुन घ्यायचे ते विचारून घेणार आहे. तसेच प्राणी अँब्युलन्स व्हेटस चा डेटा गोळा करत आहे.

गायीला चारा वाल्या गायांची पण काळजी वाट्ते त्या सुखात आहेत ना ते चेक करणार आहे. त्या मालकांशी न भांडता त्यांचे प्रश्न समजावुन घ्यायचे आहेत. गो शाळा शी संपर्क साधायचा आहे. किती काय काय जमते ते बघू.

पेज अपडेट करते फेस बुक वर.

शुभेच्छा अमा!
एकदम मोठा पसारा करण्यापेक्षा एकेक करायला घ्या. तुमच्या भागात आधीच या बाबत काम करणार्‍या संस्था, व्यक्ती असतील तर त्यांच्या बरोबर काम करता येईल. फेसबुकवर मिळतील.
स्वतःची काळजी प्रथम घ्या.

अमा तुम्हाला अनेक शुभेच्छा! छान इनिशिएटिव आहे, तुमचे पेज नक्कीच फॉलो करेन. काही नविन अपडेट , माहिती असेल तर इथेही देत रहा जमेल तेव्हा.

Pages