कॉलेजचे ते मोरपिशी दिवस !! (२) Iron Man Prerana Kulkarni

Submitted by छन्दिफन्दि on 16 September, 2022 - 16:51
#littlemoments #collegedays #collegehumor

इंजिनीरिंगला पहिल्या वर्षाला Smithy workshop (लोखंड काम किंवा लोहार काम म्हणूया ) असायच.

तर आम्हाला प्रत्येकी सहा ते आठ इंच उंचीचा आणि दोन एक इंच व्यासाचा एक लोखंडी रॉड दिला. " ये मेहेंगा रहात है ! दुसरा नाही मिलेगा " सरानी बजावून सांगितलं. मग सरानी फायनल आकार कसा हवा ते दाखवलं. एखाद्या बत्त्या सारखा एका बाजूने गोल तर दुसऱ्या बाजूने निमुळता चपटा होत जाणारा.

त्याची कृती पण दाखवली. तो रॉड प्रचंड गरम अशा भट्टीत टाकायचा. तो लाल झाला कि बाहेर कसघायचा. आणि गरम असताना बरोबर एका बाजूला मोठ्या हातोड्याने मारायचे. तापत्या लोखंडावर घणाचे घाव बसले कि त्याचा आकार बदलतो.

आम्हाला हे सगळं अगदी नवं होतं. काही मुलांना तर भारीच उत्साह संचारला.

झालं गरम भट्टीत एका पाठोपाठ रॉड पडले. आमच्या ग्रुप मधल्या एकाच्या तर भारीच अंगात आले .

"मै करता हू ! मै करता हू !"

त्याने घेतला तो बलदंड हातोडा, घेतला रॉड .खाणकन मारला. "खचाक" एका झटक्यात shape आला. सगळे कौतुकं बघायला लागले.

लगेच "अभि दुसरा लाव ", दुसरा मारला . "अभी तिसरा " तिसरा पण झटक्यासरशी झाला. त्या गरम भट्टी शेजारी घामटा निघालेला , पण हा अगदी आनंदाने निथळत होता. आता त्याला भलताच चेव चढलेला. चौथा माझा होता. खाणकन हातोडा मारला. "टणण" खूप मोठा आवाज झाला.

आवाजाने सगळे गोळा झाले , सर पळतच आले.

ह्या आमच्या आयर्न मॅन ने इतक्या जोरात हाणले कि त्या लोखंडाचे पार दोन तुकडे झाले, "सिरिअसली दोन तुकडे... तेही लोखंडाचे "

आम्ही हतबुद्ध होऊन बघतच राहिलो.

विजयी हसू कुठच्या कुठे मावळले आणि "अभि सर क्या करेंगे " ह्या विचाराने iorn मॅन ची गॉगल गाय झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहेत आठवणी. हे काम मी पण केलेलं आठवतंय. आमच्या इथे लाकडाला रंधा मारणे, ब्लॅक स्मीथी वगैरे कामं असली की मुलांना फार कष्ट पडत, पण मुलींचे जॉब्स सरच करून देत. काही मुलं मुलींना इंप्रेस करण्याच्या नादात येक्ष्ट्रा जोर लावत आणि अशीच फजिती होत असे.

दणकट मोरमिशी >> Lol

कसले दणकट मोरमिशी दिवस!<<<< Lol Lol Lol Lol Lol Lol

हो आम्हाला पण कारपेंटरी वगैरे होतं, पण हे लोखंडाचे दोन तुकडे झाल्यामुळे पक्क लक्षात राहिलं , एकदम धमाल दिवस होते Biggrin Biggrin Biggrin

कसले दणकट मोरमिशी दिवस!>>>> Lol
काही मुलं मुलींना इंप्रेस करण्याच्या नादात>>> मदत हो मदत होती ती ! Wink Proud