खेळ : धमाल गाणी

Submitted by संयोजक on 30 August, 2022 - 20:31

मायबोलीकरहो, जसा आपल्यासर्वांमध्ये एक गायक दडलेला असतो आणि जेव्हा कोणी पहात नसते तेव्हा तो बाहेर पडतो. तसेच एक कविमनही प्रत्येकात दडलेले असते. तर आज त्या कविमनाला प्रतिभेच्या गगनी, मुक्त भरारी घेउ द्या .चला तर माबोकर - कवि, नवकवि, उदयोन्मुख कवि, होतकरु कवि, हौशेगवशे कवि आणि अन्य सर्वही, होउन जाऊ द्यात धमाल. आपल्या प्रतिभेच्या धुंवाधार प्रपातामध्ये सर्वांना दंग होउ द्यात. .

आजचा धमाल विषय आहे - मराठी गाण्यांच्या २ ओळी व मग त्यांना जोडून स्वरचित २ ओळी

उदाहरणार्थ -

आनंदी आनंद गडे!
इकडे, तिकडे, चोहिंकडे.
तळणात टाकले मेदूवडे,
झारीतून निघाले बटाटेवडे
-----------------
त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का
सत्यभामा परोपरीने विचारतसे पारिजातका
माधवासंगे कटात तूही सामिल झालास का

तर मोकाट सुटू द्या तुमच्यातला कवी आणि चालू करा गाणी लिहायला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy एकदा 'नो स्मोकींग झोन' मध्ये बिडी ओढल्यावर चिरूटाला काय लाजायचं Wink करा की पोस्ट मानवदादा - एक नियम मोडला काय नि दोन मोडले काय...

नाही जरी सरी तरी
भिजते अंग जोमाने
बेसिनचा पाईप फुटला
आता तरी ये त्वरेने
थातूर मातूर कारणे नको
गोंधळ माजला घरात

कटकट जातेय डोक्यात
धडधड वाढते उरात

अप्सरा आली
पाणीपुरीतून खाली !

रामय्या वास्तवया, मैने दिल तुझको दिया
शाम को वापस लिया

सो गया ये जहाँ सो गया आसमा
सो गायी ये सारी बकारीया, सो गाये हे कुत्ते.. भो भो

Happy शाळा कॉलेज मधल्या गमती

सगळी गाणी मस्त.

इथेच हिंदी आणि मराठी गाणी आलीयत होय! म्हणूनच धमाल गाणी २ धाग्यावर एकही पोस्ट नाहिये.

बाई गं ! कसं करमत नाही गं !
घाव उरी बसला, फोन तिचा आला!
गणपती गौरी आल्या घरा, वाट लागे माझी त्यांचे करता..
मी मुळीच येणार नाही गं
बाई गं! बाई गं कसं करमत नाही !
भांडी संगती, कपडे बोलाविती, नजर भिरभिरणारी
कळ उठते उरी, पाहुणे दारी, घडी विस्कटलेली
फुलविते कळी, दुसरी मिळो कुणी, मी झुरणारी
विसरते तरी आठव करु देई कामे ही सारी
काटा येई सरकन अंगावरी
निरोप हा ऐकून बाईचा कानी
मी मला हरवून बसले जशी
फिटल्या ह्या सणवाराच्या हौशी..
घाव उरी बसला, फोन तिचा आला,,,,,,,
बाई गं ! लवकर परतून ये ई गं ! बाई गं !

Pages