कथाशंभरी-लक्ष्य-कविन

Submitted by कविन on 8 September, 2022 - 06:41

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय? तिने लगेच व्हॉट्स ॲपवर पिंग करत 'पॉपकॉर्नची' स्मायली आणि सोबत मायबोली धाग्याची लिंक पाठवली.
ताबडतोब 'दुसरीने' लॉगीन करत मायबोली उघडली. प्रतिसाद स्क्रोल करत दुसऱ्या विंडोत व्हॉट्सॲप वेबवर 'पहिलीला' एक 'ॲंग्री फेस' आणि 'तलवारबाजीची स्मायली' पाठवून दिले.

'दुसरी' आता आगीत उडी मारणार याची पहिलीला खात्री पटली.

'Chill. नको असलेले धागे अनुल्लेखानेच मारायचे असतात."

"अर्थात! रोमातले १०१ फायदे पाठ आहेत. अगदीच वाटल तर डुआय आहेत हाताशी ;-)"

हायफायची स्मायली देत दोघींनी रोमातून लक्ष्यावर दुर्बीण रोखली

Group content visibility: 
Use group defaults

भारी Happy
ए पण काय ग, आता छान जुनी माबो दिसतेय, भरपूर छान वाचायला मिळतय तर वाईट आठवणी नकोच Wink
मी मी आणि मी नाही, इतकं छान वाटतय सांगु Lol