कोणाकोणाला कॉलेजमध्ये फिशपॉन्ड मिळाला, हात वर करा बघू. बरं नसेल मिळाला पण कोणी कोणी फिशपॉन्ड दिला? फिशपॉन्डच्या दिवशी तर सर्वांच्या छातीत धाकधूकयुक्त उत्कंठा असायचीच. होय की नाही? आपल्याला मिळेल का बरं फिशपॉन्ड? मिळाला तर कसा असेल? जरी मिळाला नाही तरी इतरांना मिळालेले फिशपॉन्डस ऐकूनही मनमें लड्डू फुटण्याचे मोरपिशी, धुंद, अलवार दिवस होते ते. तेव्हा स्टेजवरती, एका खोक्यात सर्व चिठ्ठ्या असत. स्टेजवरील निवेदक, एक एक चिठ्ठी सावकाश, वाचत जाई. मिळालेल्या व्यक्तीच्या नावाचा पुकारा होइ व नंतर बर्याच पॉझनंतर, ...... फिशपॉन्ड वाचला जात असे. तोपर्यंत त्या व्यक्तीचा श्वास वरचा वर, खालचा खाली रहात असे.. आमच्या ग्रुपमधील, एका सुंदर मुलीला मिळालेला फिशपाँड ऐका बरं का मंडळी -
"धरती है लाल, आज अंबर है लाल, उडने दे गोरी गालोंका गुलाल
मत लाज का आज घूँघट निकाल, दे दिल की धड़कन पे धिनक धिनक ताल"
आहाहा! तो फिशपॉन्ड जाहीर काय झाला, वातावरण एकदम दिलनशीन होउन गेले. टाळ्यांचा नुसता कडकडाट, शिट्या. आणि आमच्या मैत्रिणीला लाजेने दे माय, धरणी ठाय! बरं कोणी दिला ते गुलदस्त्यात.
तर लेखनाचा विषय आहे 'कॉलेजचे मोरपिशी दिवस.' तुमचे कॉलेजचे दिवस, तेव्हाचा मित्रमैत्रिणीचा ग्रुप, त्या काळची स्वप्ने, महत्वाकांक्षा, आणि मुख्य म्हणजे मजेशीर कहाण्या, तुमचे अनुभव.
१) ही फक्त मायबोलीकरांसाठीच स्पर्धा आहे.
२) प्रवेशिकेला "कॉलेजचे ते मोरपिशी दिवस" - मायबोली आयडी - खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
ईथे आता काय लिहावे जे
ईथे आता काय लिहावे जे मायबोलीवर आजवर लिहिले नाही हा प्रश्नच आहे
वाचायला मजा येणार पण फार...
कारण बरेच काही रिलेट होणार आहे
छान ! एकदम मऊ मुलायम विषय
छान !
एकदम मऊ मुलायम विषय
कुणी टाकला असेल अंदाज असतो...
लास्ट इयरला दिला तर मग मात्र
लास्ट इयरला दिला तर मग मात्र जरा पंचाईत आहे....
>>>
या फिशपाँड घेणाऱ्या छान छान पोरी लास्ट ईयरपर्यंत सिंगल राहणे अवघडच असते तसे.. आणि राहीलीच तर ती कोणालाच नाही गावणार हे समजून जावे.
फ्रेशर पार्टी याचसाठी असते.. पहिल्या वर्षापासूनच सारे सिनिअर कामाला लागतात.
त्याच्या लास्ट इयरला रे.....
त्याच्या लास्ट इयरला रे..... असला इंव्हाईटींग फिशपाँड देऊन पुढे किस्से घडवायला काहीच वेळ हाती नाही म्हणजे लैच मॅरेज मट्रीयल!!
लास्ट ईयरला प्रेमात पडू नये
लास्ट ईयरला प्रेमात पडू नये यार.. नाही पटली तर लय त्रास होतो कॉलेज सोडताना.. आधीच मित्र दुरावणार हा त्रास काय कमी असतो
यावरच काहीतरी लिहावं म्हणतो आता...