पाककृती स्पर्धा क्र २ - कड'धान्य' 'धान्य' पे लिखा है....

Submitted by संयोजक on 23 August, 2022 - 17:10

kadhadhanya-Final.jpg

ओळखलं असणारच चाणाक्ष माबोकरांनी...दुसरा खूपच सोपा पण तुमच्या पाककलेला आव्हान देणारा विषय आहे, कडधान्ये वापरून बनवलेला तिखट पदार्थ

कडधान्य आपल्या भारतीयांच्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र आजच्या 'फास्ट फूड'च्या युगात घरातूनच काय तर हॉटेलमधल्या पदार्थातून सुद्धा कडधान्याची हकालपट्टी झाली आहे. कडधान्याच्या अभावामुळे मानवाच्या स्वास्थ्यावर विपरित परिणाम होतांना दिसत आहे. कडधान्यातील आणखी एक विशेष गुण म्हणजे ते जास्त शिजविल्यानंतर देखील त्याच्यातील पोषकतत्वे कायम राहतात. तसेच त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व व चोथा(फायबर) असतात.

चला तर मग या कडधान्यांना हाताशी धरून बनवा चविष्ट पदार्थ

नियम-
१- पदार्थ तिखट हवा
२- कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त कितीही कडधान्ये वापरु शकता
३-कडधान्ये ओली,कोरडी, मोड आलेली,पीठ किंवा तुमच्या आवडीप्रमाणे वापरता येतील
४-पदार्थात कडधान्य चे प्रमाण 50% हुन जास्त हवे
५-साहित्य, पदार्थ बनवताना ची एखादी स्टेप,आणि पूर्ण झालेला पदार्थ अशी किमान 3 प्रकाशचित्रे देणे आवश्यक आहे
६-धाग्याचे नाव पाककृती स्पर्धा-२ - कडधान्यांपासून तिखट पदार्थ - मायबोली आयडी - खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.

गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users