कुत्रे पालन - काही गैरसमजुतींचे निराकरण

Submitted by अश्विनीमामी on 2 December, 2009 - 10:53

Disclaimer: This article is based on personal experience only. I am not a trainer or vet. But more of a Dog Whisperer.

मायबोलीवरील एक प्राणी मैत्रीण व पर्यावरणप्रेमी व्यक्ती म्हणुन खालील माहिती लिहीत आहे. खूप लोकांना कुत्रे तसेच इतर पाळीव प्राणी फारसे आवड्त नाहीत. आपल्या साहित्यातही कुत्रे/ पक्षी पाळणार्‍यांची गणना विक्षिप्त लोकांच्यात केली जाते किंवा बालीश आवड म्हणुन ह्या छंदाची बोळवण केली जाते. अर्थात वानुची गोष्ट व तसे सन्माननीय अपवाद आहेतच. कुत्र्यांबद्दल खालील गैरसमज प्रचलित आहेत.

१) कुत्रा चावला की रेबीज मग इन्जेक्षने नाहीतर हायड्रो फोबीया व मरणच.
हे घरात न पाळलेल्या/ रस्त्यावरील भट्क्या कुत्र्यांच्या बाबतीत खरे असु शकते. त्यांच्या बाबतीत चान्स घेउ नये. पण घरात पाळलेल्या कुत्र्यांचे जन्मल्यापासुनचे अतिशय कड्क इन्जेक्षन्स चे शेड्यूल असते ते काटेकोर पणे पाळले व नंतर दर वरषी बूस्टर डोस दिला तर त्रास नसतो.
http://www.who.int/mediacentre/factsheets/fs099/en/

प्रगत देशांमध्ये रेबीज वट्वाघुळे, जंगली प्राणी यांच्या चाव्यामुळे व्हायचा धोका जास्त असतो.
घरी पपी आणणार असल्यास प्राणीतज्ञांचा सल्ला जरुर घ्या.

२) कुत्रे पालन हा श्रीमंतांचा षोक/ शौक आहे. पॅरिस हिल्ट्न वगैरे जे खेळणी टाइप
कुत्रे घेउन हिंड्तात ते बघुन किन्वा राव बहादुर टाईप लोक भला मोठा अल्सेशिअन घेउन जाताना बघुन असा गैर समज होणे साहजिक आहे. पण छोट्या ब्रीडचे कुत्रे किंवा शेल्टर मधुन दत्तक घेतलेले कुत्रे तर
अतिशय कमी खर्चात येतात. त्यांचा पहिल्या वरषी व्हेट चा खर्च असतो.

३) त्यात काय? आणू की कुत्रा!
कुत्रा घरी आणणे हा लग्न/ मुल होउ देणे या पातळी वरचा महत्त्वाचा निर्णय आहे. मुले मोठी होतात पण कुत्र्याला कायम तुमच्या आधाराची गरज असते व तो दिला नाहीत तर ते दुक्खी होतात. हा निर्णय घाइत किन्वा चुकीच्या कारणांसाठी घेउ नये. घरातील सर्वांचा विचार घेउनच घरी पेट आणावे. जनरली कपल पैकी एकाला पेट्स आवड्तात व दुसर्‍याला आवड्त नाहीत. मुलांना आवड्तात पण कुत्र्यांचे जे काम रोज करावे लागते ते त्यांच्या ने होत नाही. व ज्याच्या वर ते काम पड्ते तो वैतागण्याची वेळ येते.

४) कुत्र्यांचे काम फार असते

कुत्र्यांचे जे मेन खाणे पेट फूड ते फार महाग नसते. कुत्रे अतिशय प्रमाणात खातात. मोठ्या ब्रीड ला अर्थातच जास्त खायला लागते पण ग्रेट डेन वगैरे घरी आणणारा माणुस नक्की त्याची सोय करणार. दुध वगैरे देणे आपल्या हातात आहे. बाकी औषधे, शांपू, बेल्ट व लीश हे महत्त्वाचे खर्च. पण ते आपल्या आयुष्यात जे आनंदाचे क्षण आणतात त्या मानाने तो खर्च जास्त वाट्त नाही. कुत्र्यांना फॅन्सी कपडे/ दागिने/ कॉस्च्युम्स वगैरे घालणे वेस्ट आहे. तो एक हौसेचा भाग आहे. त्याना ते आवड्त नाही. अपमान वाट्तो. त्यांना महागडे झोपायचे बेड्स व इतर वस्तु लागत नाहीत. जुने आराम दायक क्विल्ट/ पोते हिवाळ्यात व जमीन उन्हाळ्यात त्याना बास होते.
( भारतात तरी. परदेशात प्राणी तज्ञाचा सल्ला घ्यावा. )

५) कुत्रे पालन ही एक सुपरफिशिअल अ‍ॅक्टिविटी आहे.

कुत्रे तज्ञ असे म्हणतात की आयुष्यातील कोणती ही बदलाची प्रक्रीया सह्य करायची असेल तर कुत्रा पाळावा. जसे तारूण्यातुन मध्यमवयाकडे जाणे, मुले परदेशी/ बाहेरगावी गेल्याने एकदम येणारे रिकाम पण
मानसिक धक्क्यातुन सावरण्यासाठी आवश्यक असणारा वेळ घालविण्यासाठी. अपंगपण सहन करताना इ. थेरपी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलेले असते. त्यांच्या रूटीन बरोबर आपले रुटीन फिट करता येते.
http://en.wikipedia.org/wiki/Therapy_dog

http://news.nationalgeographic.com/news/2002/08/0808_020808_therapydogs....
या विषयावर सगळ्यात चान्गले काम दस्तुरखुद्द अमेरिकेतच झाले आहे व होते आहे. भारतात शहरातील व्हेट्स व समुपदेशकांना याची माहिती असते.

६) २४ तास बांधले तर बरे या मेल्या कुत्र्यांना!

महत्त्वाचे म्हणजे भारतात कुत्र्यांना बांधून घालायची सवय असते ते कुत्र्यांच्या द्रुष्टीकोनातून अतिशय घातक. एक तर हालचाल नाही. व स्वातंत्र्यावर घाला. असेच कुत्रे जास्त वाइट स्वभावाचे व चावरे भुंकरे होतात. आपल्या घरात त्यांना चान्गली वागणूक मिळाली तर ते वाइट स्वभावाचे होत नाहीत. बांधलेले
कुत्रे काळजी एकटे पण, भय याने ग्रस्त असतात व त्यातुन भुंकत असतात. कुत्रा हा अतिशय सोशल प्राणी आहे. त्याला मागे बांधून घालणे व मालकाने इग्नोअर करणे यासारखे दु:ख नाही.

७)कसली ती कुत्री? काय उपयोग कुत्री पाळून?

मालकावर प्रेम, आज्ञाधारक पणा घरातील सभासदांसाठी लॉयल्टी हे त्यांचे गुण अनन्यसाधारण आहेत.

८) माझ्या जीवनात मी कुत्र्याला लिमिटेड अ‍ॅक्सेस देइन.
कुत्र्यांना व्यायाम आवड्तो, खेळायला आवड्ते. याचा उपयोग करून आपण व मुले आपल्या बैठ्या जीवनातुन बाहेर पडून चालणे पळणे असे व्यायाम करू शकतो, जिम ला न जाता. कुत्र्यांमुळे आपल्या इतर नातेसंबंधांना पण एक वेगळे अस्तर मिळते. अर्थात हे सर्व कुत्राप्रेमींसाठी. कुत्रे आवड्तच नसतील तर त्यामुळे वाईट भांड्णे पण होउ शकतात. कुत्र्यांना जास्त वेळ व लक्ष दिले तर दुसर्‍या पार्टनर ला ते आवडेलच असे नाही. मला कुत्रे चालविताना काही लोक असे भेट्ले आहेत की जे कुत्र्यांपेक्षा टेरीटोरिअल असतात व त्यांना कुत्रा म्हणजे आपल्या वैयक्तिक स्पेस वर आक्रमण वाट्ते.

९) मला घर अतिशय, फारच स्वच्छ लागते. मी हाउस प्राउड आहे. कुत्रा बाहेरच बरा!
कुत्रे छोट्या घरात पाळताना घरातील स्वच्छता टिकविणे अवघड गोष्ट आहे. कितीही ट्रेन केले तरी.
लहान पपीजचे दात शिवशिवतात. गाद्या, उश्या, क्विल्ट्स फाड्तात. चपला बूट व रबर स्लिपर्स पण!
ते कधी मधी ओकतात, कार्पेट घाण करतात. त्यांचे केस पड्तात. विचार करा! सोवळे ओवळे पाळणे अशक्यच कारण त्यांना चिकन/ बीफ खायला लागते. घरात हाड्के सांड्तात.

१०) कुत्रा अलग माझी फ्यामिली अलग.

मला अमेरिकन कुटुंबांची एक गोष्ट खूप आवड्ते म्हण्जे ते कुत्र्यांना पण एक घरचे सभासद मानतात.
घरे मोठी असल्या ने बहुतेक सोपे जात असेल. मुलांना वाढताना कुत्रे अतिशय चान्गले मित्र बनतात.
व म्हातार्‍यांना सोबत. मार्ली व मी पाहावा. वुफ वुफ.

गुलमोहर: 

आमचं कुत्रं येडं आहे. मुलांचे लाड करायला लागलो कि गुर गुर पासून भुंकायच्या वेगवेगळ्या ताना घेत. काचेवर पंजा मारतं. आणि दार उघडलं कि आत येऊन मुलांचे कपडे ओढून उतरायला लावतं.
बायको जेवायला बसली कि तिलाही तसंच गाणं ऐकवतं. बाकि कुणी खात असेल तर नाही करत तसं.
बाकी पुलंचं अभिवाचन नुकतेच ऐकले असल्याने आवरतो.

रोजचा पेपर उघडला तर एकतरी बातमी असते माणसाने माणसाला भोसकले, मारले, हिंसक हल्ला केला, खून केला
आणि कारणे बरेचदा भेळीत कांदा घातला नाही म्हणून, लवकर जेवायला दिले नाही म्हणून, पाणी दिलेच नाही म्हणून आणि अशीच चित्रविचित्र
हे फक्त मराठी पेपर मध्ये येणाऱ्या बातम्या तेही पुण्यात
अन्यत्र अजूनही असतील, आणि न छापल्या गेलल्या कित्येक केसेस असतील पोलीस दप्तरी

त्यामुळे हल्ला करणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे असेच म्हणावं वाटतंय

आणि कारणे बरेचदा भेळीत कांदा घातला नाही म्हणून, लवकर जेवायला दिले नाही म्हणून, पाणी दिलेच नाही म्हणून आणि अशीच चित्रविचित्र>>नाही हे फक्त हिमनगाचे टोक म्हणता येईल,त्या आधी बरेच काही घडलेल असतं, आणि भेळेचा कांदा,पाणी फक्त निमित्त ठरतं स्फोट व्हायला,अर्थात मी त्याच समर्थन बिलकुल करत नाहीये पण मग pets च्या बाबत पण असंच होत असणार का?माणसांसारखं जुने राग धरून ठेवत असतील का,खरं तर ती शक्यता कमीच आहे पण मग इतकं प्रेम करणाऱ्या मालकावर अचानक इतका राग का येत असेल?

एक फॅमिली बघण्यात आली. मुलीची हौस म्हणून कुत्रा त्यांनी पाळाला.नी ते पिल्लू लहान होते तेव्हा मुलीचं लग्न झाले.
नवरा जॉब ल wife घरी
त्या कुत्रा मुळे कुठेच जात येत नाही वाहन
वापरता येत नाही हॉटेल मध्ये जाता येत नाही
आता

नाही हे फक्त हिमनगाचे टोक म्हणता येईल,त्या आधी बरेच काही घडलेल असतं, आणि भेळेचा कांदा,पाणी फक्त निमित्त ठरतं स्फोट व्हायला,अर्थात मी त्याच समर्थन बिलकुल करत नाहीये पण मग pets च्या बाबत पण असंच होत असणार का?>>>

Exactly
आपल्याला फक्त दिसतंय की भुभ्याला खायला प्यायला देत होते
पण बहुतांश लोकांची हीच समजूत असते की अजून काय करायला हवं की रोजच्या रोज खायला प्यायला दिलं की झालं
पण जसा माणसांच्या मध्ये फरक असतो तसा त्यांच्यातही असतो
सतत बांधून घालणे, पुरेसा व्यायाम न मिळून अंगातली एनर्जी रिलीज न होणे, सोशल इन्ट्रॅक्टशन न होणे यामुळेही ते चिडखोर होऊ शकतात आणि एखादा क्षण त्यांना ट्रिगर करू शकतो

त्यामुळे कुत्रा पाळणे हे मुल संभाळण्याइतके महत्वाचे समजले गेलं पाहिजे

हे बरोबर.
मोठे स्वतंत्र घर असून आणि सभोवताली मोकळी जागा असेल तर कुत्रा , मांजर, पाणघोडा ठेवावा. त्यांना भरपूर जागा लागते.

नोकरी करणारे,लहान घर असणारे ह्या लोकांनी कुत्र पाळू नये .
बिल्डिंग मध्ये राहणारे ह्यांनी पण पाळू नये.भांडणाचे अनेक प्रसंग येतात
मोठी शेती आहे,मोठे फार्म हाऊस आहे.त्यांनी ते पाळावे
शहरात जे उद्योग पती आहेत.स्वतःचे बंगलो आहेत नोकर चाकर आहेत त्यांनी पाळावेत

मी उद्योगपती नाही आणि आमच्याकडे नोकर पण नाहीय
पण आमचा बंगला आहे आणि मागे पुढे खेळायला भरपूर जागा आहे

आणि आम्ही लॅब पाळला आहे

बंगला म्हणजे स्वतंत्र जागा.आणि हेच महत्वाचे आहे त्या जागेचे तुम्ही मालक .
Buliding मध्ये फक्त फ्लॅट चे मालक असतो.
आणि त्या मुळे अनेक प्रश्न उभे राहतात

आपण कोण जागेचे मालक ? हे तर सगळे भास आहेत. जागा आपण निर्माण करत नाही.
आपल्याला काय हक्क जागेचे व्यवहार करण्याचा ? त्यावर सर्व प्राणीमात्रांचा हक्क आहे.
तो आपण मारला आहे. सोसायटीच्या जागेवर फक्त मनुष्यप्राण्याचाच हक्क नाही.
"त्या"च्या सर्व लेकरांचा हक्क आहे. त्याच्यासाठी सर्व प्राणीमात्र समान आहेत.
आपण कोण नियम बनवणारे ?
नाहीतर आपण नियम बनवून पृथ्वीच्या भोवती सूर्याला फिरायला लावले असते.

हे अध्यात्म झाले ह्या असल्या विरक्ती मुळेच महारष्ट्र मागे राहिला.
जागेवर मालकी हक्क ज्याच्या कडे शक्ती त्याचा असतो.
चीन चंद्रावर हक्क सांगेल आणि बाकी सर्व देशांना हाकलून देईल चंद्र भूमी वरून अशी भीती अमेरिकेला पण वाटत आहे.

सगळ्या धाग्यांची वाट लावायलाच हवी का ?? Sad
जरा वेगळी,अनुभवातून आलेली माहिती मिळतेय,वेगवेगळे पैलू समजतायेत तर झालं तुमचं सुरू

हेमंत सर, हे सगळे तुमचेच प्रतिसाद आहेत. त्यांचे संकलित सार लिहीले आहे. भास वगैरे.

आदू , कुणाला उद्देशून प्रतिसाद दिला आहे ? मला असेल तर माझी एण्ट्री बरीचशी माहिती इथे आल्यानंतर झालेली आहे मायबोलीवर असे हजारो धागे आहेत जिथे ८०% विषयाला धरून प्रतिसाद येतात तर २०% प्रतिसाद विरंगुळा असूनही त्यामुळे धाग्याला बाधा येत नाही. हे प्रमाण उलटे होते तेव्हांच असे आक्षेप येत असतात. असे झाले असेल तर कृपया निदर्शनास आणून द्यावे ही नम्र विनंती,

इतर कुठले धागे भरकटवले असतील तरीही कृपया मला अवश्य कळवावे. उगीच सरांप्रमाणे किंवा त्यांच्या अनेक हितचिंतक आयड्यांप्रमाणे आरोप न केले तर आभारी राहीन. Happy

कोणताही कुत्रा मांजर माकड जर पाळले असेल तर त्याची अल्टिमेट जबाबदारी मालकावरच आहे. तो अजाण प्राणी. आपल्याकडे इतकी शक्ती आहे ह्याचे ही पूर्ण ज्ञान त्यास नसते. कुत्रे मिसबिहेव केले तर मालकाशी वाद घ्यावा व लीगल सिस्टिम आहेत त्याद्वारे निराकरण करावे. कुत्रा मांजर इतर प्राणी जगतास नाके मुर ड्णे हे अज्ञान मूलक आहे.

वर हेमंत म्हणतात तसे काही ब्रीड छोट्या घरांसाठी सुटेबल नसतात. त्यांना रोज भरपूर व्यायाम शिस्त, उत्तम खाणे लागते. हे टेरिटोरिअल असतात. हे त्यांच्या जीन्स मध्येच असते. ट्रेनिन्ग केले तरी ते रक्तातले गूण बदलत नाहीत. कुत्रा बिचारा प्रयत्न करत राहतो. ढाण्या ब्रीड पासून दूर राहिलेलेच बरे पण पूर्ण स्पेशीज ला दोषी ठरवनॅ अज्ञान मूलक आहे.

कुत्रा मी पाळला होता कोणत्या जातीचा हे माहीत नाही .पण खूप strong आणि शहाणा पण होता .दहावीत असताना .
गावात एक कुत्री व्याली होती त्या मध्ये एक पिल्लू खूप मस्त होते ते उचलून आणले.
कुत्र्याची पिल्ल तेव्हा ही संपत्ती नव्हती .

मी रोज त्यानं बघायचो डोळे उघडले की घेवून आलो.
काळे आणि सफेद स्पॉट होते.
कपाळावर मस्त पांढरा स्पॉट होता.
शेपटी थोडी केसाळ होती. कान उभे नव्हते.
कोणती जात माहीत नाही.
खूप प्रेमाने त्याला वाढवले.उंच आणि लांब सडक असा तो झाला पूर्ण वाढ झाल्यावर.
सडपातळ पण मजबूत.आणि आक्रमक पण होता.
घरात कोणी ओळख नसणार आला की धावून जायचं.
त्याचीच भीती वाटायची.
रानात गुर घेवून जायचो तेव्हा सतत बरोबर असायचा.
रात्री शेतात पाणी देण्यास जायचो तेव्हा तो खूप सावध असायचा आणि कोणत्या ही क्षणी धोका दिसला की आक्रमण करायला तयार असायचा.भीती त्याला कधी वाटलीच नाही.बघावं तेव्हा आक्रमक
.दहा पंधरा फूट पुढे जावून. काही धोका तर नाहीना ह्याच अंदाज तो घेत असे.
अजिबात सोडून एकड तिकडे जाणार नाही काम पूर्ण होईपर्यंत.
बॉडीगार्ड च होता माझा.
शेवटी तो आजारी पडला ,अन्न सोडले.तो पिसाळला असे dr नी निदान केले.
मग तर तो घरातील व्यक्ती ना जवळ येवून द्यायचा नाही.
पण त्या अवस्थेत पण मी त्याच्या तोंडात हात घातला तरी कधी चावला नाही.
शेवटी आजार मध्ये तो मेला.
खूप दुःख झाले आणि खूप दिवस त्याची आठवण येत राहिली.
आज पण येते.

Flat madhye फक्त कुत्र पाळणे .
का तर तो सिम्बॉल आहे.म्हणून.
माझा ह्याला पूर्ण विरोध आहे.
मोकळी जागा नसेल तर कुत्र ,मांजर किंवा कोणताच प्राणी पाळणे हा खूप गंभीर गुन्हा समजला जावा.
ह्या मताचा मी आहे.
कुत्रा हा प्राणी पाळायचा असेल तर त्याला नैसर्गिक वातावरण आणि नैसर्गिक अन्न. मिळणे गरजेचे आहे.
जाहिरात बाजी मार्केटिंग फंडा.
म्हणजे त्यांचे खाद्य.
काय असते त्या मध्ये.
दुधाची भुकटी,
आणि असेच काही तरी पदार्थ.

माणसाच्या बिनडोक पणाच खरेच राग येतो.
जाहिराती विविध झुल घेवून केलेल्या.माणूस त्याचा बळी पडतो.
कुत्र्याला shooes.
निसर्ग नी त्यांना मजबूत पंजे दिले आहेत तुमचे shooes घालणे त्या प्राण्यावर क्रूर अन्याय आहे.
त्यांना स्वेटर किंवा पांघरून.
महामूर्ख पना निसर्गाने अतिउच्च दर्जाचे दान त्यांना केसातून दिले आहे.
त्यांना फिरायला खूप मोकळी जागा हवी.
साखळी नको.
मनसोक्त फिरण्यासाठी.
त्यांचे खाद्य.
हा तर भयंकर प्रकार आहे.
जाहिराती आणि फालतू प्रतिष्ठा,जाहिराती मुळे
बुद्धिहीन. माणसं त्यांना काही ही खाद्य देतात.

कुत्रा एक भित्रा प्राणी आहे. मालकाच्या जागेत किंवा मालक बरोबर असला तरच शूरपणा दाखवतो. हे शिकारी केनेथ अँडरसन सांगून गेलाय.

कुत्री aakarmak असतात.
डुक्कर किंवा बाकी त्याच्या खाद्य चे शिकार ते छान करतात
मालक बरोबर असेल तर ते बिन्धास्त असतात

अनुकरण करणे हा भारतीय लोकांचा सर्वात वाईट गुण आहे..
फाटकी पँट कोणी घातली की सर्व फाटकी पँट घालतील.
कुत्रा ,मांजर पाळणे ह्याची craze निर्माण झाली की कुवत असू नसू सर्व भारतीय कुत्रा पाळतील.
विदेशी जाती पेक्षा स्वदेशी जाती कधी ही उत्तम पण लोकांचे बघून विदेशी जाती चे कुत्रे पाळतील.

फॅशन म्हणून कुत्रा पाळणे हा प्रकार जवळून बघितला आहे.
बाकी आयुष्यात गाई,म्हैस,बैल ,कुत्र ,मांजर सर्व घरात होती.
सशक्त आणि निरोगी.
ना कृत्रिम पना ना हजार नखरे.
नैसर्गिक सवयी नुसार त्यांना जीवन जगणे ह्याचे पूर्ण स्वतंत्र.
बाजूला एकाने कुत्रा पाळला आहे.
काय ते pet खाद्य,काय ते कपडे,काय ते अनैसर्गिक पालन पोषण.
तीन मजले चढले की तो कुत्रा कासावीस होतो.
थकून जातो.
कीव येते लोकांची.

हे मंत सरांची मते मला पण आवड्तात पण काय आहे सहि ष्णुता हा एक गुण आहे. जगात आपल्या पेक्षा वेगळ्या विचारांचे भावनिक मानसिक गरजा असलेले लोक / प्राणी / झाडे असतात. त्यांना तसे जगायचा हक्क असतो. व समाजाचे सोसायटीचे नियम पाळले तर तसे जगता यायला हवे. ( पक्षी कुत्र्याचे शरीर धर्मउचलून व्यवस्थित डिस्पोज ऑफ करणे. ) मी वरील धाग्यात नियम लिहिले आहेत. पण भूतदया, सोबतीची गरज व जस्ट प्रेम व बाँ डिंग असू शकते ही शक्यता ध्यानात असू द्यावी.

कुत्रा व त्याचा मालक समोर आला की तुच्छ कटाक्ष शी शी दूर हो म्हणून हेटाळणी पूर्वक बोलणे हे बरोबर नाही. पण मी आता लोकांशी एंगेज करणे सोडले आहे त्यामुळे ही पोस्ट कुत्रे मांजरांच्या वतीनेच समजावी.

पोस्टमन आला की कुत्र्याचा गैरसमज होऊन बेंबीच्या देठापासून भुंकतो. यासाठी काही ट्रेनिंग ( भुंकू नये म्हणून) देतात का?

Pages