माझा स्वभाव नाही

Submitted by किरण कुमार on 11 July, 2022 - 04:45

रांगेत चालण्याचा मजला सराव नाही
शिस्तीत वागण्याचा माझा स्वभाव नाही

हा जन्म काढीला बघ शेतात राबताना
मालास मात्र त्याच्या हलका उठाव नाही

वाड्यात सावकारी चाले पिढ्या पिढ्यांची
त्यांच्या कुटीपुढे बघ, यांचा निभाव नाही

कित्येक पाहिले मी मुर्दाड लोक येथे
माझ्या मनाप्रमाणे कुठलाच गाव नाही

एका पराभवाने हारु नकोस मित्रा
प्यादे पटावरी घे कुठला दबाव नाही

केला यमासवे मी सौदा कधीच सस्ता
पाहून घेतले की यादीत नाव नाही

ज्यांच्या घरात आता आरास काजव्यांची
सुर्यास सांगती ते 'किरणा'स वाव नाही

- किरण कुमार

Group content visibility: 
Use group defaults

छान

छानच लिहिले आहेत एकेक शेर.

एक दुरुस्ती सुचवू इच्छितो. 'आजन्म काढीला बघ शेतात राबताना' ह्या ओळीत आजन्म हा शब्द नाम नाही, विशेषण आहे. त्याचा अर्थ 'जन्मापासून' असा होतो. मग ह्या वाक्यात नाम नाही. त्यामुळे जन्मापासून काय काढला ते कळत नाही. की तुम्हाला 'हा जन्म काढिला बघ शेतात राबताना' असं म्हणायचं आहे?

कित्येक पाहिले मी मुर्दाड लोक येथे
माझ्या मनाप्रमाणे कुठलाच गाव नाही

ज्यांच्या घरात आता आरास काजव्यांची
सुर्यास सांगती ते 'किरणा'स वाव नाही

हे दोन शेर बेहद आवडले

सर्वांचे मनापसून धन्यवाद ,

मा. हरचंद पालव , आपल्या सुचनेबद्द्ल खूप आभार . अपेक्षीत बदल करतो आहे. गझल लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे.

मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेसाठी

विषय : "ते मौन बोलके होते"

शिर्षक : समजून भाळले मी

रस्त्यात भेटल्यावर मुद्दाम टाळले मी
ते मौन बोलके हे समजून भाळले मी

आली नभास तेव्हा होती किती झळाळी
बेहोश चांदण्यांना हासून माळले मी

वेड्या मनाप्रमाणे घडले कधीच नाही
सारेच भ्रम तेव्हा ठरवून पाळले मी

गंधात मोद होता प्रत्येक पाकळीच्या
रानातल्या फुलांचे का वर्ण चाळले मी

बागेतल्या कळ्यांना भिजवून टाकताना
अनमोल हेच अश्रू कित्येक ढाळले मी

माझेच बिंब हलले डोहात पाहताना
चुंबून त्या खड्याला टाकून ढवळले मी

संदेश खूप होते अतृप्त काळजाचे
पत्रात नेमके ते संवाद गाळले मी

ती एक रात्र वेडी लक्षात का तुलाही
हरपून भान माझे स्पर्शात उजळले मी

आला जरी अता तू स्वप्नात पेटवाया
देहास थंड माझ्या केंव्हाच जाळले मी

सांकेतिक कोड क्र .