पॉडकास्ट ते पुस्तक

Submitted by MandarKulkarni on 3 July, 2022 - 23:43
A cover of a book: 'Nivadak Vishwasamwaad'

‘विश्वसंवाद’ हा मराठीतला पहिला पॉडकास्ट मी सुरु केला, त्याला जून २०२२ मध्ये साडेपाच वर्ष पूर्ण होतायत. “काही आगळं-वेगळं, हट के काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पा” असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. जानेवारी २०१७ ते डिसेम्बर २०२१ या पाच वर्षांत ६२ एपिसोडस प्रसिद्ध झाले असून जुलै २०२२पासून पुन्हा नवीन एपिसोडस प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. मोबाईल फोनवरील Apple podcast, Stitcher अशा apps बरोबरच ‘विश्वसंवाद’ चा YouTube channel ही आहे, जिथे आजपर्यंतचे सगळे एपिसोडस ऐकता येतील: www.youtube.com/c/vishwasawaad

मराठीतला पहिला पॉडकास्ट असण्याबरोबरच ‘विश्वसंवाद’ आता अजून एक नवीन ‘पाहिलं’ पाऊल टाकतो आहे. या पॉडकास्टवरच्या मुलाखतींपैकी १३ निवडक मुलाखतींवर आधारित ‘निवडक विश्वसंवाद’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. ‘पॉडकास्ट ते पुस्तक’ अशा माध्यमांतराचा मराठी भाषेतला हा पहिलाच उपक्रम! पुण्याच्या ‘राजहंस’ या प्रतिष्ठित प्रकाशन-संस्थेतर्फे प्रकाशित होत असणाऱ्या या पुस्तकाला ‘महाराष्ट्र टाईम्स’चे माजी संपादक श्री. दिनकर गांगल यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. चोखंदळ वाचकांना हे पुस्तक नक्की आवडेल असा मला विश्वास आहे.

“निवडक विश्वसंवाद” हे पुस्तक सध्या ‘राजहंस’तर्फे सवलतीत घेता येणार आहे. त्यासाठी ही लिंक वापरावी:
https://rzp.io/l/vishwasamwaad

त्याचबरोबर हे पुस्तक राजहंस पुस्तक पेठ, बुकगंगा, आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्याकडेही उपलब्ध आहे आणि अमेझॉनवरूनही ते मागवता येणार आहे.

या पुस्तकाच्या निमित्तानं पॉडकास्टींगचं क्षेत्र, माझा पॉडकास्टींगचा प्रवास, या पुस्तकाच्या निंर्मितीचा अनुभव हे सगळं लिहावं असं वाटलं आणि इथं ती अनुभव-मालिका लिहिण्याचा विचार आहे. इथल्या मंडळींच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

भाग-१: जुलै ३, २०२२

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults