मदत हवी आहे : घर मालकाने डेपोसिट परत देत नाही.

Submitted by इंद्रा on 8 October, 2018 - 04:46

मदत हवी आहे : घर मालकाने डेपोसिट परत देत नाही.

माझा नवरा पुण्यात बदली झाल्याने वडगाव शेरी येते फुल्ल फुर्निशेड फ्लॅट मध्ये राहत होता. ऑगस्ट २०१६ ते सेप्टम्बर २०१८, पर्यन्त राहत होता. यात २०१७ माह्ये करार रिन्यू केला होता, दुसर्यांदा करार मे २०१८ संपला पण गुड विल वर ठरले कि आम्ही सेप्टम्बर पर्यंत राहून ३० सेप्टम्बर ला घर खाली करायचे. आम्ही यात स्वतःहून सांगितले कि मे ते सेप्टम्बर आम्ही वाढीव भाडे देऊ. ते आम्ही ३० सेप्टम्बर पर्यंत दिले. मालक भारतात नसल्याने ओक्टोम्बर मध्ये आमच्या कडून किल्ली घेऊन ताबा देण्याचे ठरले. यामध्ये सेपेम्बर पर्यंत सर्व बिल्स (वीज पाणी गॅस इंटरकॉम सर्व पायमेन्ट पूर्ण केले आणि व्हॅटप्प वर सॉफ्टकॉपिय पाठवली ). काळ भेटल्या नंतर मालक म्हणाले कि ९८००० डेपोईस्ट पैकी ९०००० परत देतो. कारण तुमचे बिल्स पेडनिंग आहेत. त्यावर वर सांगितल्या प्रमाणे सॉफ्ट कॉपी दिली. आम्ही असे म्हटलं कि पूर्ण पैसे द्या. त्यावर मालकाने घर पाहणे सुरु केले . त्यात दोन ठिकाणी त्यांना लीकेage दिसले त्यावर त्यांनी संगितले कि तुम्ही फ्लॅट मैण्टिन केला नाही सो , आम्ही काही अमाऊंट कापून घेत आहोत.

आम्ही वापरात असेलेल्या वस्तू सिंगल दार फ्रिज , २ एअर कंडिशनर्स ,aqua गौर्ड, गॅस, ओव्हन सर्व चालू आणि मैण्टिन कंडिशन मध्ये होते.
त्याच्या कडे जुन्या निल कामाच्या खुर्च्या होत्या त्या रिप्लेस करून नवीन सेट दिला , सेंटर टेबल तुटले होते ते ती नवीन आणि जास्त किमतीचे दिले.

यात आमच्या कडून एक चुकले कि २०१६ मध्ये आम्ही फ्लॅट चा ताबा घाईत घेतला, फ्लॅट च्या तेंव्हाच्या कंडिशन चे फोटो घेतले नाहीत. सर्व गुड विल वर झाले. यांत नवऱ्याने काळ आवाज चढल्यावर मालक म्हणाली कि पैसे देते , मग बँक डिटेल्स दिले. पण अजून तिचा रिप्लाय नाही, त्याचे भाडे नेहेमी ३ तारखेला दिले. घरात गैर वप्पर केला नाही. मालकाने सोसायटी चे मैण्टिनान्स थकवल्याने (७८०००) आंम्हाला सोसायटी सर्विसेस मिळत नव्हत्या( कार्पेन्टर , प्लंबर, इलेक्टरसान इतकं..) पण आम्ही बाहेरून काम करून घेतले. मालकाला काही सांगितले नाही.

हे सर्व पुण्यात घडले, आता नवरा म्हणतो बघू. काय करावे वाट पाहावी कि लीगल नोटीस द्यावी. पुनेकर वकिल मायबोलि करनि मदत करवि.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे सध्या अश्विनी लोकांना डिपोझिट गमविण याचा सिझन चालू आहे वाट्ते. मी पण सेमच परिस्थितीत आहे. आमचा घर मालक तर मोदी!!!
भाडे एक तर्फी वाढवले, अ‍ॅग्रीमेंट दिले नाही. मग मला त्याच बिल्डिंगीत कमी भाड्यात चांगला फ्लॅट मिळाला व सोडा यचे म्हटले तर सेम नाटक तुम्ही घर घाण केले. पेंट करून द्या, माझा तोटा होईल ब्ला ब्ला. काल बँक डीटेल दिले आहेत. बहुदा ट्रान्सफर करेल पैसे. नाहीतर चूना लग गया.

माझ्या मते कंझुमर कोर्टात केस दाखल करता येते. सर्व पुरावे दाखवावे लागतील. ती एक वेगळीच प्रोसीजर आहे. मी अजून वाटच बघते आहे.

मागच्या सरकार ने भाडेकरार रजिस्टर्ड करणे बंधनकारक केले होते. जर केला नसेल तर घरमालकाला दोषी ठरवण्यात येईल व भाडेकरूच्या प्रमाणे निकाल देण्यात येईल असे वृत्तपत्रात आले होते. (न्यायालयात असे होत नाही पण..)

घरमालकाने रजिस्टर्ड करार केला नसेल तर त्याच्या विरोधात हा मुद्दा होईल बहुधा. मी काही वकील नाही. गुगळून पाहू शकता.

पुण्यातल्या flat owners ला पुर्ण depositकधीच परत देववत नाही. त्यांच्या कडून काढून घ्यावे लागते. तुमची बाजू पूर्ण बरोबर असताना तोटा सहन करू नका. माघार घेऊ नका.

नवऱ्याने काळ आवाज चढल्यावर मालक म्हणाली कि पैसे देते>>> हाच उपाय परत करून पहा.जागेला कुलूप घाला.तिने संपूर्ण पैसे दिल्याखेरीज ताबा देऊ नका.

कोंढव्यातील एकाने असेच डिपॉझिट द्यायला टाळाटाळ केल्यावर माझ्या एका कलीगने त्याच्याशी सहज बोलत बोलत्,तो कोंढव्यातील एका राजकीय संघटनेच्या माणसाला ओळखत असल्याचे दाखवून दिल्यानंतर घरमालकाने संपूर्ण पैसे द्यायची तयारी दाखवली.

हो अमा , या आठवड्यला वाट पाहावी असे वाटते. किरणउद्दीन लगेच लीगल काही करावे असे वाटत नाही. २१ दिवसाच्या आत जर पैसे परत मिळाले नाहीत तर केस करता येते असे गुगळ सांगतो, आमची राजकीय ओळख नाही. त्याने अवघड आहे, आता तरी शुक्रवार पर्यंत वाट बघावी असे वाटते, नवरा कर्णाचा अवतार असल्याने तो हे पैसे बुडीत धरतो आहे. आजून एक सांगावेसे वाटते मुंबई मध्ये स्वतःच घर होण्या आधी २ ठिकाणि रेंट वर राहिलो, पण असा अनुभव नाही. बोहोरी आणि मराठी फॅमिलीच्या घरात राहिलो पण काही प्रॉब्लेम नाही , आजून रेलेशन्स चांगले होते. आणि डेपोसिट पण वेळेवर मिळाले . इच्छा नसताना पण तुलना होते

फक्त 8च हजार गेलेत, सोडून द्या. तसे पण एका महिन्याचे भाडे कोणीपन कापतोच मिनिमम . तुमचा घरमालक देवमाणूस दिसतोय. आमचे दीड महिन्याचे भाडे कापले आणि आम्हाला रंग पण लावून द्यावा लागला. मला आत्तापर्यंत एकदाच पुर्ण deposit परत मिळालंय. 2005 साली त्यानंतर कधीही नाही.

प्रत्येकच वेळी पुणे वि. मुंबई अशी तुलना करुन पुण्याला नावे ठेवायलाच हवीतच का?

मुंबईतले घरमालक कसे असतात ते इथे पाहा :-

https://youtu.be/Yb-GaXOYysM?t=970

घरमालक अरेरावी करत असतात, काही विचारायला गेले की आरडाओरडा करून रुम खाली करायला सांगतात , आजच माझं आणि माझ्या घरमालकिनच वाजलं .

तसे पण एका महिन्याचे भाडे कोणीपन कापतोच मिनिमम . तुमचा घरमालक देवमाणूस दिसतोय.
>> Lol...
आमच्या भाडेकरू ne पण ह्या महिन्यात घर सोडले.
आम्ही एकही पैसा ना कापता पैसे परत केले.
काही फर्निचर खराब झालय.. घर कलर करावे लागतेय.
पण te अनेक वर्षे रहात आहेत. तर नॉर्मल वियर - टियर होणार ना!
त्या नी एकवागार्ड दुरुस्तीचे दिलेले 2500 मागच्या महिन्यात, आम्ही ते ही परत केले इमाने इतबारे..

आम्ही आणि भाड्याने दिलेला फ्लॅट पुण्यातच आहे.. Happy

लोकहो हा धागा बराच जुना आहे, मुंबई आणि पुणे तुलना करण्याचा हेतू नाही पण लोक कसे वागतात हे सान्गायचे होते . असो त्यानंतर लगेच २-३ दिवसात त्या बाईने पूर्ण ९८००० परत दिले . पण तिचा तो फ्लॅट बरेच दिवस कदाचित १ वर्ष रिकामा होता.

आम्ही पण सर्वच भाडेकरूंचे डिपॉझिट परत केले आहे. जरी नंतर आम्हाला किरकोळ दुरूस्ती खर्च किंवा पेंटींग करावे लागले तरी. कोणाचाही १ रु. ही कापला नाही. फक्त काही भाडेकरूंचे शेवटचे गॅस किंवा विजेचे बील नंतर भरायचे होते. तेवढे पैसे त्यांच्या कडून घेतले. त्यांनीही ते लगेच दिले.

अपार्ट्मेन्ट घेताना अमेरीकेत एक चेक्लिस्ट असते - सर्व अ‍ॅमेनिटीज लिस्टेड असतात. ज्या चालत नाहीत त्या आपण टिकमार्क करुन, कमेन्ट्मध्ये काय बरोबर नाही - ते लिहायचे. ती एक कॉपी आपल्यापाशी , एक त्यांच्यापाशी असते.
घर सोडताना, आपली चेक्लिस्ट पडताळायची की हा फॉल्ट आधीपासून होता की आपल्या वावर - वापरण्यातून निर्माण झालेला आहे.

पुर्वी माहेरी बैठ्या चाळीत रहायचो (डोंबिवली) आणि नंतर तिथेच बिल्डींग झाली, हा सर्व मामला डिपॉझिटचाच होता. भावाने स्वतःचा फ्लॅट घेतल्याने, बाबांनी ती जागा सोडली तेव्हा घरमालकांनी पाच हजार कापून बाकीचे दिलेले, वीस वर्ष झाली या गोष्टीला.

आम्ही श्रीरामपुरला होतो तेव्हा डीपॉझिट घेतलं नव्हतं, भाडं थोडं जास्त आणि आगाऊ द्यायचं एवढीच अट होती. लाईट्बिल मात्र ते दोनशेच देणार कारण त्यांना तेवढंच दोनशे ते अडीचशे यायचं, ते आम्ही कबुल केलं कारण आमच्याकडे वॉशिंग मशीन होतं. घरमालक खाली आणि आम्ही वरच्या मजल्यावर रहायचो. तीन वर्षानंतर आम्ही स्वतः हून भाडं वाढवून दिलं.