तर कोण व्हायला आवडेल?

Submitted by भांडखोर on 22 May, 2022 - 10:22

समजा.
- हे शक्य नाही, याला काय आधार, हे अशास्त्रीय आहे वगैरे सगळे बाजूला ठेवून -
समजा की पुनर्जन्म आहे. ऐच्छिक आहे. पुनर्जन्म घ्यायचा की नाही हे ऐच्छिक आहे आणि घ्यायचा असल्यास पुढचा जन्म कुठल्या जागी, कुठल्या घरात घ्यायचा हे तुम्हाला ठरवता येईल.

तर तुम्ही पुनर्जन्म घ्याल का? नसल्यास का नाही?
घ्यायचा असल्यास तुम्हाला कुठे म्हणजे कुठल्या देशात, राज्यात, शहरात, गावात घ्यायला आवडेल? कुठल्या प्रकारच्या घरात घ्यायला आवडेल? स्त्री जन्म घ्यायला आवडेल की पुरुष जन्म?
या जन्मी अशी काही चूक केली किंवा काही राहून गेले, जे पुढल्या जन्मी दुरुस्त करायला आवडेल?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्लंडमध्ये, जन्म घेउन अस्खलित इंग्रजी अभिमानाने बोलता यावे. तेथिल संस्कृतीची ओळख व्हावी.

खूप पर्यटन व्हावे. पण ते आनंदाचे, जबरदस्तीने अथवा मनाविरुद्ध नको.

हातून समाजाची काहीतरी सेवा घडावी. उदाहरणार्थ लशी शोधणारे शास्त्रज्ञ, विविध इंजिनीअर्स, डॉक्टर्स यांच्याविषयी फार आदर व कुतूहल वाटते. तसे काहीतरी बनता यावे.

चांगली इच्छा सामो.
आईची लेकनी सुद्धा चांगले लिहिले होते. पण वैयक्तिक बाब असल्याने नंतर पोस्ट काढली असेल, समजू शकतो.

पुनर्जन्म नको.
या जन्मातच मनुष्यप्राणी म्हणजे काय हे व्यवस्थित समजले आहे.
अजून काय पाहिजे ?

पण आग्रहच असेल तर….
झाड व्हायला आवडेल Happy

झाडांना सजीव केवळ पुस्तकात म्हटले जाते. व्यवहारात मात्र त्यांच्या जीवाला किंमत नसते. त्यांना कापून मारून खाण्यात मांसाहारासारखे पाप समजले जात नाही Happy

मला सुपर duper पॉवर हवी.
ह्या जगातील.
सर्व ढोंगी,स्वार्थी,लोकांवर अन्याय करणारे ह्यांचा विनाश करायचा आहे
हे सर्व नष्ट झाले तर जगात माणसाची संख्या काहीच लाख राहील.
आणि ही पृथ्वी मोकळा श्वास घेईल.
निसर्ग आनंदाने फुलून जाईल.

झाडांना सजीव केवळ पुस्तकात म्हटले जाते. व्यवहारात मात्र त्यांच्या जीवाला किंमत नसते. त्यांना कापून मारून खाण्यात मांसाहारासारखे पाप समजले जात नाही

अडाणी पणाच कहर आहे माणसाचे जीवन च झाडे,सुष्म जीव,विषाणू,जिवाणू, ह्यांच्या वर अवलंबून आहे.
माणूस हा पृथ्वी लं लागलेले बांडगुळ आहे.
त्याचा निसर्ग चक्रात काही उपयोग नाही.
माणूस नष्ट झाला तरी काही फरक पडणार नाही पण झाडे,अगदी मुंगी नष्ट झाली तरी खूप मोठा फरक पडेल.

हेमंतराव तुमची सुपर डूपर पावरची इच्छा लगेच पूर्ण होईल, याच जनमात. बस अशा एका घरातून पावशेर फुटाणे घेऊन या ज्या घरात एकही स्वार्थी व्यक्ती नाही, कोणी कसलेही ढोंग केले नाही, कोणावर अन्याय केला नाही.

कुमार सर झाड होण्याची इच्छा आवडली.
मला पण एक मोठा डेरेदार वृक्ष व्हायला आवडेल.
पक्षी बागडताहेत, कधी माकडांची टोळी येऊन फळे खाते,
पोरं पारंब्याना लटकताहेत. सावलीत लोक वनभोजन करताहेत.
मुसळधार पावसात कधी चिंब भिजून ओथंबून जायचं. अहाहा.

क्वाइला हेलोकॉप्टरच्या पायलटने आवर्जुन माउंटन गोट्सचं जवळुन दर्शन घडवलं होतं. त्याच्या कामेंटरीत बोलुन गेला कि पुढच्या जन्मात त्याला तिथला माउंटन गोट व्हायचंय. कां, तर तिथे बारा महिने चारा, हवं तिथे उंधडा, कुठेहि-कुठल्याहि प्रेडेटरची भिती नाहि, सापसुद्धा नाहित. अगदि चिंतामुक्त जिवन.. मी मनातल्या मनांत म्हणालो - व्हेअर डु आय साय्न अप... Proud

मला स्त्री म्हणूनच परत जन्म घ्यायला आवडेल. आणि पेंटर किंवा सिंगर व्हायला आवडेल. हौशी नाहीतर तर जबरदस्त कला येणारी. सध्यातरी आपल्याला या गोष्टी येत नाही म्हणून वैषम्य वाटते.(कधीकधी)..

आणि एक ! पुढच्या जन्मीही माझी मुलेच परत माझ्या पोटी यावीत.

हो सध्या इतर काही नवरे व त्यांच्या बायकांचे issues पाहिले कि वाटते हाच नवरा परत चालेल. आताचा वर्कोहोलिक आहे हा मला दोष वाटतो. पण तसेही परफेक्ट कोण असते म्हणा. आपल्याला नेहमी सपोर्ट करणारा आहे ना मग बास.

अरे वा आरती. म्हणजे वैषम्य वाटणाऱ्या एक दोन गोष्टी वगळता तुम्ही परिपूर्ण व समाधानी जीवन जगत आहात.
अभिनंदन.

नाही भांडखोर.. परिपूर्ण जीवन नाहीच आहे. पण ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत व ज्यागोष्टींवर आपले फारसे नियंत्रण नाही त्यावर फारसे regrets करत बसत नाही. त्यामुळे समाधानी आहे. हो एक regret आहे आई डॉक्टर हो म्हणत होती पण मी हट्टाने इंजिनीरिंगला गेले. आत वाटते तो पर्याय आईने माझ्या व्यक्तिमत्वाचा विचार करून सुचवला होता व योग्य होता. कदाचित पुढच्या जन्मी डॉक्टरही व्हायला आवडेल.

@च्रप्स
व्हिडिओ लिंकबद्दल धन्यवाद.
काय अफाट धडाडीचे व्यक्तीमत्त्व आहे डॉ.शारदा बापट यांचे, मुलाखत ऐकून थक्क झालो.

वाह च्रप्सजी, हम थोडे आ_मदनी में बिझी क्या हो गए, आप तो लिंक्स देने लगे.... बढिया लिंक है! माई, कलाकार नसाल, समाधानी असाल तर 'हायतेचबर्गं' आयडी घ्या कसं!!!! Light 1

मला भांडकुदळ चावी व्हायला आवडेल. सगळ्या कुलुपांशी माझे भांडण झाले तर कुठलेच कुलूप उघडणार नाही. मज्जाच मज्जा ! नाही का ? सगळ्यांची गुपीतं कुलूपबंद ! बसतील शोधत चावी कुठेय, चावी कुठेय ? चावी तर सोफ्यावर ऐसपैस हात पाय पसरून बसेल पण कुणीही काहीही बोलणार नाही, कारण मी भांडकुदळ असेन ना ? Lol