चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला माहितीये कोण ती पण सांगता येत नाहीये. एका हिंदी मालिकेत होती ज्यात शरद पोंक्षे होते. मराठीत तर नेहमी असते. नवरा निर्माता आहे.

मृणाल देव कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे यांचा संयुक्त उपक्रम.
तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात
मृणाल देशपांडे घ्या या.
https://www.instagram.com/p/Cb19qtIq5Wb/

मृणाल देशपांडे पूर्वी सह्याद्रीवर 'चालता बोलता'ची होस्ट होती बहुतेक. त्यातल्या त्यात नवीन (४-५ वर्ष जुनी) रुद्रम मालिका कुणी पाहिली असेल तर त्यात ती किरण करमरकरची बायको असल्याचं आठवतं आहे. चुभू दे

मृणाल देशपांडे कोण?कुलकर्णी माहीत आहे
आणि ती हा हा हा हा कुंकू वाली मृण्मयी देशपांडे माहीत आहे.अजून कोणी आहे का?(मी गुगल केलं तर सगळीकडे मृण्मयीच आली)

>> पितृऋणच्या संदर्भात सांगायचं तर या सिनेमात सचिन खेडेकरच्या बायकोचा रोल केली आहे ती. वर शांत माणूस यांनी दिलेल्या लिंक मधील बाई.

त्यांचे आणि सचीन खेडेकर चे एकत्र सीन्स आले की कधी एकदा ही स्क्रीनवरून कटतेय असं झालं इतक्या नकोश्या वाटू लागल्या आहेत या.

ती आणि समिधा गुरू बहिणी आहेत. मृणाल त्या आक्काबाईच्या (पुढचं पाऊल) सिरीयलमध्ये होती का.

रुद्रम मध्ये मला आठवत नाहीये.

पितृऋण मध्ये माझं फार लक्ष तिच्याकडे गेलं नाही.

हापूस मधे होत्या.
चालता बोलता होस्ट बरोबर आहे. पण नाव वेगळे होते बहुतेक तेव्हा.

रुद्रम मध्ये किरणची बायको दाखवली होती हेच आठवत नाहीये. मृणाल खूप वर्षांपासून काम करत आहे पण नक्की कशात होती ते लक्षात नाही. हो, हापूसमध्ये सुभाची बायको होती. देशपांडे माहेरचे आडनाव आहे. समिधा तिची बहीण आहे हे माहिती नव्हते. सुप्रिया पाठारे आणि अर्चना नेवरेकर बहिणी आहेत हेही तूनळीच्या कृपेने कळले.

काय की! किंवा दुसऱ्या कुठल्या सिरियलमध्ये आहे का? तो शैलेश दातारही असू शकतो. माझा की क आणि शै दा मध्ये गोंधळ होतो. त्याचा निगेटिव्ह रोल होता आणि मृणाल त्याची बायको की प्रेयसी की रखेल काहीतरी झाली होती. फारच हायझेनबर्गी (आय डी नव्हे, खरा हायझेनबर्ग) वागणं होतंय माझ्याकडून!

अग्निहोत्र सिझन २ असावा रुद्रम नसेल तर.

हायझेंबर्ग या माणसाच्या नावाने प्रसिद्ध अन्सर्टंटी प्रिन्सिपल आहे. माझ्या वरच्या कमेंटमध्ये फारच अनिश्चितता भरली आहे, म्हणून तसं म्हणालो.

हर्षदा खानविलकर as आक्कासाहेब हिच्या ' पुढचं पाऊल ' या शिरेलित आक्कासाहेबची जाऊ होती मृणाल देशपांडे as देवकी. त्यात बिग बॉस फेम रडी जुई गडकरी आणि अस्ताद काळे मेन लिड होते. तिथे बघितलं असेल पब्लिकने कधीतरी येताजाता. चिक्कार वर्ष सुरू होती ती शिरेल.

युट्युबवर एक दोन असे चॅनल्स सापडले आहेत जे दीड दोन तासांच्या हॉलिवूड मुव्हीज 15-20-25 मिनिटात शॉर्ट करून हिंदी कॉमेंट्रीसह एक्स्प्लेन करतात. अर्ध्याएक तासात '12 फीट अंडर', 'अलरावबी स्कुल फॉर गर्ल्स' आणि 'लुक अवे' असे तीन मुव्हीज बघून झाले Happy

रनवे 34 आणि हिरोपंती 2 दोन्ही सिनेमांनी 6 व्या दिवशी फक्त 21 करोड पर्यंत कमाई केली , सध्यातरी लॉस मध्ये दिसत आहे कारण दोन्हींचे बजेट प्रत्येकी 70 करोड आहे .
के जी एफ मात्र अजूनही तुफान उधळत आहे ( मला तरी नाही आवडला ) .
बॉलिवूडवाल्यानी खरंच आता गंभीरपणे विचार करायला हवा . पब्लिक कोणासाठी थांबणार नाही , जिकडे एंटरटेनमेंट तिकडे वळणार !

मुव्हीज एक्सपलेंड मलापण आवडतात

पिक्चर शुक्रवारी 12 ला रिलीज झाला की त्याच दिवशी दुपारी 4 वाजता असे 2,4 लोक उगवतात

Proud

रनवे सिनेमा कितपत गर्दी खेचणारा आहे कल्पना नाही.
हिरोपंती हिट झाला असता तर आश्चर्य वाटले असते. निरर्थक मारामारी सिनेमा असेल तर सिनेमाचा लीड तितका कॅरीस्मॅटिक हवा- यश, सलमान खान, अल्लू अर्जुन इत्यादी. टायगर श्रॉफ तसा नाही वाटत. त्याचे डान्स आणि स्टंटचे स्किल अगदी भारी असले तरी अभिनयात खूपच कच्चा आहे. सिनेमा अत्यंत भयाण आहे असे रिव्ह्यू आले ते वेगळे.
इथे माझी आवडती रिव्ह्यूवर काय म्हणते बघा हिरोपंती 2 वर- (विनोदी)
https://youtu.be/14MERwrI5BA
ब्रम्हास्त्र, लाल सिंघ चढ्ढा, आयुष्यमानचा पुढचा नॉर्थ ईस्ट वरचा सिनेमा येऊदेत- खरी टेस्ट तिथे होईल.

चालता बोलता वरून आठवलं त्याचा अंशुमन विचारे पण होस्ट होता कधी काळी, तर तो एका मार्केट मध्ये फिरत होता, लोकांना प्रश्न विचारत होता. एक प्रश्न होता 'शनी देवाच्या वडिलांचं नाव काय ?' तर एकाने बहुदा सनी देओल अस ऐकलं आणि चक्क धर्मेंद्र अस उत्तर दिलं. Proud फुल्ल टी पी प्रोग्रॅम Proud

शर्माजी नमकीन पाहिला.तशी टिपिकल गोष्ट आहे.पण ऋषी कपूर ला बघून मस्त वाटलं.परेश रावल ला एरवी रिप्लेसमेंट म्हणून बघून धक्का बसला असता पण रणवीर कपूर ने सुरुवातीलाच सांगितल्याने रोल मध्ये परेश रावल पण नीट मिक्स झाले डोक्यात.
ऋषी कपूर एकदम क्युट.वाटाणा शिजलेला दाबून बघतानाचा सीन तर एकदम पटलाच.
जुही आणि ऋषी कपूर बघून बोल राधा बोल आठवलाच.
शिबा चढ्ढा, जुही चावला आणि सर्व महिला मंडळ एकदम भारी.
शेवटी बिहाइंड द सीन्स मध्ये ऋषी कपूर बघून नाही नाही म्हणत डोळे पाणावलेच.

मला "खरा" म्हणाजे ब्रेकिंग बॅड वाला हायझेनबर्ग वाटला >>> Happy मै - हे म्हणजे "वाघ. खरा वाघ. सर्कसमदी राहतो. कवा कवा जंगलमदी पण असतो" तसे झाले Happy

Pages