चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षयकुमारचा रामसेतू : पोस्टर प्रकाशित

पोस्टर नॅशनल ट्रेझर मुव्हीची कॉपी वाटते

आणि त्यात हिरोच्या हातात मशाल आहे आणि हिरोईनच्या हातात टॉर्च

आता टॉर्च असताना ह्यांना मशाल का लागते ?

Proud

आणि त्यात हिरोच्या हातात मशाल आहे आणि हिरोईनच्या हातात टॉर्च
आता टॉर्च असताना ह्यांना मशाल का लागते ?
>>> दोन वेगवेगळ्या दिशेला जाण्यासाठी...

रामसेतू नावाच्या पोस्टरमध्ये राम किंवा सेतू दोन्ही संबंधी एकही गोष्ट नाही. ते मागे जे चिन्ह घेतलेलं आहे ते सुद्धा ईजिप्शियन किंवा इल्युमिनातीचं असल्यासारखं आहे.

अशा खोदाखोदी कामात मशाल किंवा कंदील लागतोच

आधी तो दोरीने सोडतात , मग साप वगैरे पळून जातात , शिवाय विषारी गॅस असेल तर कंदील मशाल विझते.

ज्वालाग्रही वायू असेल तर वायू जळून जातो.

मग आत जातात म्हणे.

मायबोलीवर असे एक संशोधक आहेत ना ?

बिडी पेटवायला टॉर्च कामाचा नाही>>>'जिगर माँ पडी आग' असेल तर कशाचीच गरज नाही....

शरलॉक होम्स बघितला, विशेष आवडला नाही. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने चांगले काम केलेय, पण सुसूत्रता नाही.
बच्चन पांडे अतिशय टुकार आहे.
स्माईल प्लीज , मुक्ता बर्वे व ललित प्रभाकर ..चांगला आहे.
मोहल्ला अस्सी बघितला, पहिला एक तास चांगला वाटला, नंतर तेच तेच वाटले. रवी किशन कधी नव्हे ते बरा वाटला, नाहीतर चुकीच्या शब्दावर जोर देऊन संवाद म्हणत असल्याने अनॉयिंग वाटायचा. काशीची अँटी टुरीझम जाहीरात वाटते असे वाचले, थोडं खरंय.

'जिगर माँ पडी आग' असेल तर कशाचीच गरज नाही....
>>> तसं तर जॅकलिन च्या ज्वानीची मशालच काफी आहे... सेतू च्या भयाण राती...

आता टॉर्च असताना ह्यांना मशाल का लागते ?>> हौ काय प्रश्न झाला?
हिरवीनले मच्छर काटत नसतील काय? शालगील तर पांघरुन यायाचं ना.

असं कसं चालेल ? असा टॉप हा adventure सिनेमांचा युनिफॉर्म आहे. डास असो, उकाडा असो, थंडी असो, टॅंक टॉप आणि जॅकेट पाहिजेच. पुढे जॅकेट फाटले किंवा चोरीला जाणे किंवा कमरेला गुंडाळले जाणे हे हि तितकेच महत्वाचे.

शालगील तर पांघरुन यायाचं ना.
>>> तर जॅकलिन ला कोण बघायला येणार? ऍक्टिंग तर तिला जमत नाही... ग्लॅमर आणि क्युटनेस मुळेच आहे... कशाला तिच्या पोटावर शाल देताय...

जिगर माँ पडी आग' असेल तर कशाचीच गरज नाही....
>>>>
हे पडी आहे का.. मी आजवर जिगर मा बडी आग है गायचो..

येनीवेज, म्हणजे टॉर्चवालीच्या जिगर मध्ये आग आहे असे तर दिग्दर्शकाला सुचवायचे नसेल?

ते मायबोली वाचून, विजेरी आणि मशाल असे दोन्ही टॉर्च घेऊन , बहुतेक कोणतं मूल तुमचं नाही याचा शोध लावायला निघाले असावेत.

@ अस्मिता शेरलॉक होम्सचा दुसरा सिनेमा ना? पहिला, ज्यात लॉर्ड ब्लॅकवूडची गोष्ट आहे तो मला आवडतो. दुसरा विस्कळीत आहे. तो नाही आवडला. (ज्यात मॉरिआर्टी जास्त वेळा दिसतो, होम्सचा भाऊही बराच दिसतो तो)

फॅन्टास्टिक बीस्ट्स - सीक्रेट्स ऑफ डंबलडोर.
अडीच तासचा प्रचंड मोठा आहे, हॅपॉ मधले काही इतके मोठे असूनही अजुन हवा होता असे वाटतात. पण हा प्रिक्वेल अगदीच कंटाळवाणा झाला आहे. काही ग्राफच नाहीये स्टोरीला आणि जे घडतं ते असं अघळपघळ संथ काही घडत असतं, क्रिस्प काही नाहीच. ग्रिंडलवॉल्ड आणि डंबलडोरचे लहानपणचं काही दाखवतील, डंडो ग्रिंडलवॉल्डच्या मागे का गेला त्याचं काही दाखवतील.... तर एका वाक्यात गुंडाळलं ते. पण अरिआना कशी मेली हे चक्रम सारखं एक्सप्लेन करत बसलेत.. का? ते तर माहितीच आहे की. आणि ते सांगायचंच असेल तर तो प्रसंग जिवंत करतील.. पण नाही! डंडो पुस्तकातला पॅरेग्राफ वाचुन दाखवल्यागत सांगतो ते. पिक्चर आहे हा. स्क्रिनवर दाखवलेलं चालतं. डायलॉगची गरज नसते प्रत्येक वेळी.
अ‍ॅबरफोर्थ आणि डंडो मधलं रिलेशन अजुन हवं होतं. ग्रिंडलवॉल्ड का वाईट आहे? ते ही दिसत नाही. आपण धरुन चालायचं की तो वाईट आहे.
डंडो आणि ग्रिंडलवॉल्डची फाईटही अशक्य मॅटर ऑफ फॅक्ट कंटाळवाणी आहे. टोटल अंडररव्हेल्मिंग!

होय!
न्यूट स्क्रमांडर आणि कोवलस्की यांचा कथेमध्ये शून्य रोल आहे.

हरीण पुढचा नेता निवडत असते हि संकल्पना टुकार आहे.
आणि गंमत म्हणजे, ग्रीन्डलवाल्ड एवढा सगळा डिटेलवार इलेक्शन फ्रॉड करतो, जो अगदी फूसकन उघडकीला येतो. आणि, त्या फ्रॉड व्हायच्या आधी लोक त्याला सपोर्ट करत असतातच कि! म्हणजे जर फ्रॉड केला नसता आणि जरा चांगलं कॅम्पेन केलं असत तर जिंकला असता.

डम्बी आणि ग्रीन्डी यांच्यातला अनब्रेकेबल पॅक्ट का काय असतो, तो तोडण्याचे कारण अगदी टेक्निकल काहीही घेतले आहे.

ग्रीन्डलवाल्ड चे मोटिव्हेशन पहिल्या/दुसऱ्या सिनेमात दाखवले आहे की त्याने भविष्य बघितले असते- मगलूनचे दुसरे विश्व युद्ध, अणुबॉंब ईई. ते होऊ नये म्हणून तो सगळ्या मग्लूना टाचेखाली आणणार असतो. ह्यातला टाचेखाली आणण्याचा भाग वाईट आहे, पण युद्ध आणि अणुबॉंब थांबवणे यापैकी काही करायला पाहिजे ना? इंग्लड चाच आहे ना दम्बलडोर ? मग काय देशप्रेम, देशवासी मगलूनबद्दल कणव नाही ?

एकूण, जेके रोलिंग बाई लेखिका चांगल्या आहेत पण पटकथा लेखन त्यांनी प्रोफेशनल माणसाकडे सोपवावे.

Pages