चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंगूबाई नेफ्लिवर आलाय. शेवटी शेवटी कंटाळा आला.
आलियाने काम छान केलंय. भन्साळींच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा नेटका पण अपीलच होत नाही. गाणी खास नाहीत.

वैधानिक इशारा - इथे वाचून कुणी माबोवर मापं काढण्यासाठी बघावा या विचारात असाल तर अशा पिक्चर्सचं माप निघत नसतं. ते या पलिकडे गेलेले असतात. >>> Lol टोटली. या पिक्चर्सची काय खिल्ली उडवणार. हे पिक्चर स्वतःला इतके सिरीयसली घेत नाहीत. खिल्ली उडवायला बेस्ट म्हणजे सिरीयसपणाचा आव आणून भंकस करणारे पिक्चर्स.

बाकी हे नाव पूर्वी वाचले तेव्हापासून कुतूहल होते की नक्की काय आहे पिक्चर Happy

गंगूबाई वर या आधी कुणी लिहीले आहे का ?
गंगूबाई काठियावाडी वेगळ्या विषयावर आहे म्हणून त्याला थोडं झुकतं माप देण्याचा प्रयत्न केला तरी चित्रपट म्हणून खूप कमी पडल्याचं जाणवतं. गंगूबाई हा डॉक्युमेण्टरीच्या अंगाने जाणारा आहे. एकीकडे आपण कुणाच्या जीवनावरच्या चित्रपटात वास्तवाचा लवलेशही नसतो म्हणून ओरडतो, मग डॉक्युमेण्टरी म्हणून ओरड तरी का करावी ? तर सिनेमॅटिक लिबर्टी इथेही आहे. जर डॉक्युमेण्टरीप्रमाणेच हाताळणी करायची असेल तर सरळच खर्‍या गंगूबाईशी प्रामाणिक रहायचं.
जे आपण पाहिलं त्यात चित्रपट काढण्यासारखं काय होतं असाही प्रश्न पडतो. वेश्यांसाठी गंगूबाईने काम केलं हा भाग अजिबात पोहोचत नाही. भन्साळींचं संगीत उसन उधारी चे वाटते. १२ वर्षांनी गंगू आपल्या आईला फोन करते हा प्रसंग तरी भावनाप्रधान व्हायला होता.
भन्साळींनी फक्त सेट्स आणि वातावरणनिर्मितीवर भर दिलाय. संवाद सपक आहेत. वेश्यावस्ती नसती तर सभ्य समाजातल्या महिला सेफ नसत्या हे हजारदा उगाळून झालेलं वाक्य इथे टाळ्याखाऊ म्हणून दाखवलं आहे. नेहरूंना गंगू भेटून येते हा प्रसंग कळसाध्याय असायला हवा होता. पण तो ही सपक आहे.
मेलो ड्रामा नकोच पण काही काही प्रसंगात प्रेक्षकाला भावूक व्हायला आवडतं. असा कोणताही अनुभव हा चित्रपट देत नाही. जितका दिग्दर्शक वेश्यांच्या समस्यांपासून तटस्थ आहे, त्यापेक्षा दहापट प्रेक्षक राहतो.
हम लोग मधली बडकी यात घरवाली झाली आहे. ती अजिबात बघवत नाही.

सिनेमा सिनेमा शी अगदी सहमत!
याअधिचे भन्साळीचे सिनेमे आभासी , दिखावुपणावर भर देणारे असले तरी कुठल्यातरी प्रसन्गात आपण कनेक्ट होतो, काहितरी तरी आवडुन जात यात हे सगळ इतक अलिप्त,खोट, तकलादु अस दिसुन येत.
कास्टिन्ग मधे फक्त छाया कदम आणी विजय राझच काम त्यातल्या त्यात आवडल,
आलिया प्रचन्ड मिसफिट आहे या रोलमधे, सलिभने असा मुव्हि बनवण्याआधी किमान एकदा तरी मन्डि, सलाम बॉम्बे हे मुव्हिज पाहायला हवे होते.
हम लोग मधली बडकी यात घरवाली झाली आहे. ती अजिबात बघवत नाही.>>> सिमा पाहावा का? हो फार विचित्र मेकप कॅमेरा अ‍ॅन्गल वापरलेत
एरवी अनेक मा टाइप रोल मधे छान काम केलेय तिने.

मला ते बडकी नावच आवडत नाही . पहिले हमलोग पाहिले आहे तेव्हा पासून. बधाई दो मध्ये पण आहे सीमा पहा नको वा.

मे महिना

हिंदी भुलभुलैया 2
मराठी अदृश्य

ट्रेलर बघून मला असे का वाटले की दोघांची स्टोरी सेम असेल ?

गंगूबाई चालू केला काल. एकदम बोर पिक्चर. रटाळ काहीतरी चालू आहे, काही सरकतच नाही पुढे. बंद केला मग.
सीमा पहावा मला आवडते. इथे पण चांगलंच काम केलं आहे. बाकी आलिया माधुरी ठीक आहेत दिसायला, पण सुंदर म्हणजे जरा अतीच झालं.

बाकी आलिया माधुरी ठीक आहेत दिसायला, पण सुंदर म्हणजे जरा अतीच झालं. >>> फर्स्ट क्लास शाळेतल्या फर्स्ट क्लास स्टुडंटससाठी "वेगळी.. वेगळी" बॅच असेल Lol

सीमा पहावा कोण आहे? मार्केट मध्ये नवीन आहे का?

आलिया माधुरी ठीक आहेत दिसायला, पण सुंदर म्हणजे जरा अतीच झालं.
->>> दोघी दिसायला थोड्याफार सेम दिसतात.. फ्रुटी ऍड मध्ये आलिया आहे का जवानीतली माधुरी असे कंफ्युझन होऊ शकते ...

अगाथा क्रिस्तीचे मस्त मूवीज आहेत. पण बघण्यासाठी जुगाड करावा लागतोय.
अगाथा अ‍ॅण्ड कर्स ऑफ इश्तार मिळालाय एक. चांगला वाटतोय. इश्तार म्हणजे हस्तर तर नाही ?

इश्तार ही अकेडियन देवता
नरम सिन या अकेडियन किंगची फेवरेट.
कर्स ऑफ इश्तार ही फेमस टॅब्लेट आहे. नरम सिंन स्वतःला इश्तारच्या जागी अगादे या शहराचा देव घोषित करुन स्वतःचे
म्ण्मंदिर बांधतो. त्याच्या मुलाच्या काळात अकेडियन साम्राज्य संपुष्टात येते.
ही ऐतिहासिक घटना( इसापुर्व २२५० घडलेली )मध्ये सुमेरियन लोकंनी ज्या टॅब्लेटवर लिहिली ( इसापुर्व २००० ) ती ब्रिटिश म्युझियम मधली टॅब्लेट कर्स ऑफ इश्तार म्हणुन प्रसिद्ध आहे. याला कर्स ऑफ अगादे पण म्हणतात.

मला आवडते सीमा पहावा, खूप नैसर्गिक अभिनय करते. तिने 'रामप्रसाद की तेरहवी' सुद्धा दिग्दर्शित केलाय, 'बाला' मधे भूमीची मिशीवाली आत्या भूमीपेक्षा रिअल वाटते , 'बरेली की बर्फी'मधे मुलीच्या काळजीत 'रात रात घुमती है, लडकी है चुडैल थोडी न है", म्हणणारी शिक्षिका आहे, शिवाय शुभमंगल मधला,' अलिबाबा के लिये गुफा का दरवाजा खुलता है, चालीस चोरों के लिये नही' वगैरे संवांदांनी धमाल उडवून दिली आहे.

गंगुबाई काही बघणार नाही, सध्या डोक्याला ताप नकोय. त्यात कुंटणखान्याची मावशी म्हणून लाऊड मेकप, उग्र क्लोजप्स केले असावेत. अशी पार्श्वभूमी असणारे सिनेमे सोसत नाहीत. बहुतेक 'कलंक' पासून भन्साळी प्रकारातून सुद्धा आऊटग्रो झालेय.

सिनेमा सिनेमा छान प्रतिसाद. Happy

गंगुबाई सारखे चित्रपट कसे चालतील हेच कळत नाही. सामान्य लोकांना खरच कितपत इंटरेस्ट असेल अशा विषयात ? आणि आत्तापर्यंत या विषयावर कित्ती सिनेमे निघाले असतील.

सडक, बागी यासारखे वेश्यावस्तीत अडकलेल्या हिरोईनचे पिक्चर सुपरहिट होते. पण जळजळीत वास्तव बघण्यात लोकांना फार रस नसेल हे देखील खरे आहे. म्हणून त्यावर आलिया वगैरेचा फिल्मी तडका दिलाय. कारण हा चित्रपट कमर्शिअल आहे. कुठले वास्तव वगैरे लोकांपर्यंत पोहोचवायला काढला नाही.

ईट फॉलोज

खतरनाक सिनेमा. आवडला!
जे नावाची टिनेज मुलगी तिच्या नवीन बॉयफ्रेंड सोबत सेक्स करते- आणि त्यानंतर तिला त्याच्याकडून समजते, कि त्याच्याकडून एक शाप आता तिच्याकडे ट्रान्सफर झाला असतो. एक बहुरूपी मारेकरी तिच्या मागे लागणार असतो- जो फक्त तिलाच दिसेल, आणि कोणत्याही रुपात येऊ शकेल. तिचा प्राण घेतल्यावर तो मारेकरी पुढील व्यक्तीकडे- म्हणजे त्या बॉयफ्रेंड कडे वळेल- असेच पुढे पुढे. त्या बॉयफ्रेंडला सुद्धा असाच कोणाकडून तरी प्रसाद मिळाला असतो.

तो मारेकरी अगदी हळू असतो- पण सातत्यपूर्ण असतो. त्याची लक्ष्याकडे वाटचाल २४*७ चालू असते. त्याला मारणे किंवा नष्ट करणे शक्य नसते.

जे कडे पर्याय आहेत- पळत राहणे, किंवा शाप ट्रान्सफर करणे- आणि ट्रान्सफर्ड व्यक्ती जास्तीत जास्त वेळ जगेल अशी अपेक्षा करणे.

हॉरर, थ्रिलर- चांगले कॉकटेल आहे.

नेटफ्लिक्स वर आहे- पण जिओ ब्लॉकड आहे भारतात. VPN वापरा किंवा पेशन्स असेल तर 123movies वापरा.

माझंही असंच झालं, मला आधी वाटलं सीमा नावाचा नवा सिनेमा आहे का जो सगळ्यांना पाहायचाय, ज्यात आलिया आणि माधुरी दि पण आहेत म्हणून मी सीमा मुव्ही असं शोधत बसले Lol

गंगुबाई सारखे चित्रपट कसे चालतील हेच कळत नाही. सामान्य लोकांना खरच कितपत इंटरेस्ट असेल अशा विषयात ? आणि आत्तापर्यंत या विषयावर कित्ती सिनेमे निघाले असतील.
Submitted by सीमा on 28 April, 20

Male audience ला डोळ्यासमोर ठेवून गंगुबाई, बाजीराव मस्तानी, किंवा आता येणारा चंद्रमुखी यासारखे चित्रपट काढले जातात आणि ते चालतात.

Pages