आता नाहीच कशात राम

Submitted by अवल on 7 August, 2010 - 01:35

चकित झाला होतास तू
कधी नव्हे ते, "काही" मागीतले होते मी .
अगदी स्वयंवरापासून तोपर्यंत;
मी होतेच तृप्त.

अन त्या दिवशी मात्र
माझ्या डोळ्यातली इच्छा पाहून, समजून.
हरकून गेला होतास तू ;
अन मोहरले होते मी.

त्या कांचन मृगाचे निमित्त मात्र....
तू जाणले होतेस माझे डोहाळे.
अन धावला होतास
तू................

एरवी तुझ्यासारखा विचारी, समंजस, संयत;
ऋषींच्या यज्ञात त्रास देणार्‍या दानवांना
ओळखुन, पिटाळणारा तू;
मारिचाला ओळखू नाही शकलास !

कारण तुझ्या डोळ्यात होती स्वप्ने
माझ्या कुशीतल्या बाळाची.
अगदी तूच नाही लक्ष्मणानेही
ओळखली होती माझी जडावलेली पावले.

अन त्या दुष्ट रावणानेही
ओळखली होती माझी अवस्था.
म्हणूनच केली ना त्याने
माझी रवानगी अशोक वनात .

अन हे सगळे माहिती असूनही
तू त्या परिटाचे ऐकावेस बोलणं ?
करावास माझा त्याग ?
का ? का ? का?

हो झाली माझी चूक.
झाला मला मोह.
केला मी हट्ट.
कांचनमृगाचा.

पण त्या साठी
इतकी मोठी शिक्षा ?
निरोपही न घेता
धाडून दिलस रानात.

ज्या जानकीसाठी तू
उचललेस शिवधनुष्य.
तिलाच सोडून दिलस , एकटं
पेलायला, आईपणाचे शिवधनुष्य !

आताच तर नितांत,
सोबत हवी होती
भावी स्वप्न आताच तर
रंगवायची होती.

कोठे गेला तो माझा राम ?
कोठे हरवला माझा राम ?
कोठे शोधू तुला राम ?
आता नाहीच कशात राम............... !

गुलमोहर: 

शशांक असे शालजोडीतले मारू नाहीत Happy समाधी , जाणीव अशा कविता लिहिल्यावर तरी Wink हलके घे रे Happy
धन्यवाद मित्रांनो !

आता नाहीच कशात राम............... !

आहे ना ! कम्पुटरात One GB "RAM" !

छान!

आता नाहीच कशात राम............... !>>>>

मधुकरजी, एवढे खुश नका होवू लगेच.... असे म्हणतानाच आरतीताई रामाचं महत्व आणि त्याची आपल्या आयुष्यात असलेली गरज स्पष्ट करताहेत Happy
आरतीताई..खुप छान, आवडली.

खूप सुंदर.

आज सकाली तुमची माधवी ची ओळख वाचली अन मन बधीर झालय.

खुप छान कविता. आता नाहीच कशात राम... किती काही सांगून जातं हे वाक्य. तेही रामाला आपलं सर्वस्व मानणाऱ्या सीतेने सांगावं. याच कारणामुळे नेहमी मनात येतं आणि नकळत ; सोळा सहस्त्र पतीत स्त्रियांना आपलं नाव देणा-या कृष्णाचं पारडं मनात नेहमीच जड राहतं.

राम म्हणजे मूर्तिमंत त्याग आणि मर्यादा,,, कृष्ण तर स्वत: अमर्याद प्रेम ... दोन वेगळी टोकं, आपापल्या जागी पूजनीय ,, हेच खरं _/‌\_ .

वाचते Happy

Pages