तोडिता फ़ुले मी सहज पाहिला जाता
गदिमा गीत रामायण
तोडिता फ़ुले ती रोज दिसे मज शांता ,
नियमीत सकाळी फ़िरायला मी जाता ।
किती प्रेमाने झाड आम्ही लावावे
खत पाणी घालुन निगुतीने जगवावे
वाढता बघुनि त्या आनंदित अन व्हावे
येताच फ़ुले पण हिचीच चाले सत्ता । १
तोडण्या फ़ुले ही फ़िरे गावभर बाई
काठी वा छत्रीने ओरबाडुनी घेई
आपुलीच समजुनी " देवासाठी " नेई
घाबरती झाडे येताना ती दिसता । २
उंचावुन टाचा, उडया मारमारून
वाकवुनी फ़ांद्या, पाने चुरगाळून
किती मुक्या कळ्यांच्या माना मुरगाळून
बघ राख तूच ही आमुची बाग अनंता । ३
" वटसावित्रीला " तोडुनी फ़ांदी आणी
दसर्याला " सोने " लुटुनी पिशवीभरुनी
दिवाळीत सारे झेंडू भुंडे करुनी
गुरुवारी घाली हार करुनी ही दत्ता । ४
दिसतात पदोपदी धन्य फ़ूलतोडे हे
संभावित चोरची म्हणता ते नच साहे
आम्ही अगतिक म्हणतो, 'देव वरुनी पाहे'
सांगणार यांना कोण बरे हे आता ? । ५
पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता
अरे व्वा , वनस्पतीचं मनोगत
अरे व्वा , वनस्पतीचं मनोगत छान वर्णन केलतं .
सुरेख!!!
सुरेख!!!
आवडलं.
आवडलं.
मस्तच झालंय विडंबन.
मस्तच झालंय विडंबन.
आवडलं
आवडलं
atishay chhan......
atishay chhan......
मस्तच
मस्तच
सुंदर
सुंदर
मस्त .
मस्त .
भारीच एकदम,!!!!
भारीच एकदम,!!!!
भारी आहे
भारी आहे
छान
छान
वा वा वा !!! अमोल
वा वा वा !!!
अमोल केळकर
---------------------------
मला इथे भेटा
आवडलं
आवडलं
विडंबन आवडले... वेगळा विषय
विडंबन आवडले...
वेगळा विषय आहे... खरेच ही पुण्यातली एक समस्याच आहे