द टिंडर स्विन्डलर' - एका इस्रायली भामट्याची कहाणी.

Submitted by स्वेन on 19 February, 2022 - 22:55

द टिंडर स्विन्डलर' - एका इस्रायली भामट्याची कहाणी.

" बरेचसे ज्यू  बदमाश आहेत ." इस्त्रायल या देशाला ज्या व्यक्तीने महान बनविले त्या  डेव्हिड बेन गुरियन यांनी अरब-इस्त्रायली संघर्षादरम्यान  अरब घरांमधून ज्यू सैनिकांनी लाखो किमतीचे अमूल्य  पर्शियन फ्लोअर कार्पेट आणि अनेक मौल्यवान वस्तू   चोरून नेल्याचे  कळले तेंव्हा अशी टिप्पणी केली.  बेन गुरियन आज हयात असते  तर, इस्रायलचे रूपांतर फसवणुकीच्या केंद्रात झाले आहे हे पाहून त्यांना  आश्चर्य वाटले नसते. नेटफ्लिक्स वर प्रसारित होणाऱ्या  'द टिंडर स्विन्डलर' या चित्रपटात  अशाच एका , स्कॅन्डिनेव्हियन महिलांशी दोस्ती करून त्यांची जवळजवळ १०  दशलक्ष डॉलर्सची  फसवणूक करणार्‍या रब्बीचा मुलगा  असलेल्या शिमोन ह्यूत या  इस्रायली भामट्याची  कहाणी दाखवली आहे.

फसवणूक करण्याची  शिमोनची पद्धत म्हणजे जुनी जाणती  पॉन्झी स्कीमची  युक्ती , तथापि, शिमोनने  या पॉन्झी स्कीम मध्ये  सुधारणा केली. डेटिंग ऍप्लिकेशन टिंडरवर सायमन लेविए या नावाने खाते उघडून  आपण  जगातील सर्वात मौल्यवान हिरे विक्रेता  लेव्ह लेव्हीव्ह याचा  वारस असल्याचे नमूद केले. अशा प्रकारे काही स्त्रियांशी  ओळख झाल्यावर त्याने या महिलांचा, भेटवस्तू देऊन आणि आपल्या खाजगी विमानातून सफर घडवून,  विश्वास संपादन करायला सुरुवात केली . हे खाजगी विमान सर्वात पहिल्या बळी पडलेल्या महिलेच्या पैशातून भाड्याने घेतलेले होते. त्यानंतर  स्वतःला आपल्या  व्यावसायिक शत्रूंकडून धोका असल्याची शक्यता स्पष्ट  करून , स्वतःचे बँक खाते आणि  पैशांशी संबंधित नोंदी गोठवल्या असल्याची  बतावणी करत , तो ओळख झालेल्या  महिलांना,  त्या महिलेच्या  स्वतःच्या नावावर बँकेकडून कर्ज घेण्यास उद्युक्त करत असे. कर्ज फेडण्यास आपण सक्षम असून त्याची काळजी या महिलांनीं करू नये कारण नुकताच करोडो डॉलर्सचा एक  करार झालेला असून कर्जाच्या रकमेपेक्षाही कितीतरी जास्त रक्कम आपण परतावा देऊ असे त्याने या सर्व महिलांना सांगितले.

 या महिलांनी त्यांच्या स्वत:च्या नावाने  अर्ज करून  सुमारे ३०० ,००० डॉलर्स   पर्यंत  रकम  उचलावी  आणि   वेळोवेळी  या महिलांना त्यांची कर्जाची   मर्यादा वाढवून   घ्यावी  यासाठीही   त्याने विनंती केली.    एखाद्या महिलेकडून शक्य तितके पैसे गोळा केल्यानंतर, शिमोन  त्यातील काही रक्कम  नवीन ओळख झालेल्या तरुणीला फसवण्यासाठी वापरत असे.  एका देशातून दुसऱ्या देशात आणि एका महिलेकडून दुसऱ्या महिलेकडे असे करत असताना  स्वतःच्या   श्रीमंत जीवनशैलीचे प्रदर्शन करण्यात त्याने काहीच कसर सोडली नाही.  त्याच्या या जीवनशैलीमध्ये, वैयक्तिक लक्झरी जेट्स, उंची मद्य,  जागतिक प्रवास,  डिझायनर  कपडे अशा बऱ्याच भपकेबाज गोष्टींचा  समावेश होता. २०१९  मध्ये मात्र त्याचा हा खेळ संपुष्टात आला. एका  नॉर्वेजियन वृत्तपत्राने त्याला ग्रीसमध्ये बनावट व्हिसा वापरल्याबद्दल अटक करण्यासाठी पोलिसांना मदत केली. चौकशीत सर्व काही स्पष्ट झाले  . त्यानंतर त्याला इस्रायलला परत पाठवण्यात आले.  इस्राएल सरकारने त्याची जुजबी चौकशी केली आणि  केवळ पाच महिन्यांनंतर त्याची मुक्तता करण्यात आली. शिमोन  इस्रायलमध्ये आता बंधमुक्त  फिरत आहे.

ही  नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आकर्षक आणि उत्तम प्रकारे तयार केलेला असताना, तो हयुतच्या वर्तनाचे संदर्भ अस्पष्ट ठेवतो.  ऑनलाइन डेटिंगचे बायकांना असणारे धोके आणि नंतर बळी पडलेल्या एका स्त्रीची (आयलिन कोलमन)  सूडकथा याच्याशी शिमोनची फसवी कारकीर्द जोडली गेली  आहे. यातल्या महिला काही अंशी आपणही अशी भव्य जीवनशैली जगावी अशा   इच्छेमुळे हयुतच्या तावडीत सापडल्या. हयातने आपल्या किशोरवयातच  फसवणुकीची केलेली  सुरुवात ,त्याच्यावर पडलेला सांस्कृतिक प्रभाव याबाबत  कमीत कमी उल्लेख आहे आणि विशेषत: स्कॅन्डिनेव्हियन महिलांनाच लक्ष्य का केले आहे याचा उल्लेख नाही. हा चित्रपट पाहिल्यानंतर आणि इस्रायली फसवणुकीचे अनेक किस्से ऐकल्या वाचल्यानंतर   इस्रायली भामट्यांच्या   जागतिक आर्थिक गैरवर्तनाला प्रतिसाद म्हणून त्यांना  धिक्कारणे अपेक्षितच आहे. चित्रपटातील   शिमोन हयुतमध्ये,  एका  महिलेने ( सिसिलिया श्रोडर) त्याला शक्य तितके पैसे दिले आहेत हे लक्षात आल्यानंतर झालेला बदल द टिंडर स्विंडलरचा एक मनोरंजक पैलू असू शकतो. पैसे मिळाल्यावर तो तिला धुडकावून लावतो. इस्राएल मधील सर्वच लोक फसवणुकीच्या धंद्यात असतील असे अजिबात नाही. उलट मोसाद सारख्या गुप्तचर यंत्रणा राबवणारे लोक तल्लख आणि हुशार असणार यात काय संशय. शिमोन सारखे भामटे सर्वच देशात असतात. परंतु शिमोन प्रमाणे बदल इस्राएलचे सर्वच भामटे करू शकतात तर चोरावर मोर कोण होऊ शकतो, का हा एक महत्वाचा मुद्दा उरतो.
..........

Group content visibility: 
Use group defaults

एका नॉर्वेजियन वृत्तपत्राने त्याला ग्रीसमध्ये बनावट व्हिसा वापरल्याबद्दल अटक केली>>>>>>>>>>>>

वृत्तपत्राने अटक केली ????

हेच लिहिणार होतो
मलाही ते कळलं नाही
पोलिसांनी असेल चुकून वृत्तपत्र लिहलं असेल

बरेचसे ज्यू बदमाश आहेत ." इस्त्रायल या देशाला ज्या व्यक्तीने महान बनविले त्या स्वतः ज्यू असणाऱ्या डेव्हिड बेन गुरियन यांनी अरब-इस्त्रायली संघर्षादरम्यान अरब घरांमधून ज्यू सैनिकांनी लाखो किमतीचे अमूल्य पर्शियन फ्लोअर कार्पेट आणि अनेक मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे कळले तेंव्हा अशी टिप्पणी केली. >> असे लिहीत लिहीतच ज्यु बदमाश फसवे अशी इमेज तयार होत जाते व त्याचे पुढे कट्टर अँटि सेमिटिक विचारात रुपां
तरण होउ श कते. धार्मिक ध्रुवी करणा ची ही सुरुवात असू शकते सुजाण वाचकांनी हे जनरलायझेशन आहे व ह्यातील सुप्त आणिक उघड अँटि सेमिटिझम लक्षात घ्यावा.

टिंड र स्विं डलर चांगली आहे डॉकु में टरी. तरुणींनी नक्की बघावी. पण अश्या केसेस भारतात सुद्धा नियमित घडत आहेत व रिपोर्ट केल्या जातात. ऑन लाइन शादी साइट वर फेक प्रोफाइल घेउन अनेक तरुणी डिवोर्सी ंना फसवले जाते. ह्यात गुन्हेगार परदेशात डॉक्ट्र किवा तत्सम असतो व मुलीस / बाईस प्रेमात पाड तो मग लग्ना परेन्त बाबी येतात. मग तो तिला महाग गिफ्ट पाठिवली आहे असा मेसेज करतो.

मग काही दिवसांनी एक बाई भारतीय कस्टम्स मधून फोन करते व तुमची गिफ्ट अडकली आहे ह्या ह्या ब्यांकेत पैसे भरा ते ही किती चार लाख बारा लाख असे. बाय्कांनी कर्जे ग घेउन ४०- ४५ लाख परेन्त पैसे अनेकानेक अकाउंत मध्ये भरले आहेत. मग बाप्याची आयडी व बाईचा फोन सायलेंत होतो.

हा फ्रॉड अनेक वेळा झालेला आहे पण बायका बळी पडतातच.

हे जे गुन्हे आहेत हे सर्रास सर्व देशांत घडतात. एका व्यक्तीने गुन्हे करणे, देशात संघटीत गुन्हेगारी असणे हे सार्वत्रिक आहे. यात एकाच देशाला टारगेट करणे झेपले नाही.

हर्षद मेहता, नीरव मोदी, विजय मल्ल्या या आणि अशा अनेक मंडळींनी गुन्हा केला म्हणून भारत हा गुन्हेगारांचा देश अशी प्रतिमा उभी केली तर चालेल का? ज्यु गुन्हेगारानं बसलेल्या व्यक्तींमधे ज्यु व्यक्तीही असतील की. जागतिक फायनान्स क्षेत्रात ज्यु अग्रेसर आहेत.

असो. या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

त्याहून आक्षेपार्ह म्हणजे 'इस्राएली' या नॅशनॅलिटी ऐवजी ऐवजी 'ज्यु' हा धर्मवाचक शब्द सगळीकडे वापरला आहे.
अमेरिकेत सध्या भारतीय फ्रॉडस्टर्सनीही धुमाकूळ माजवला आहे. इथे एक अमेरिकन लिहितो आहे अशी कल्पना करून 'टिंडर स्विंडलर' ऐवजी 'जमतारा' आणि' 'ज्यू' ऐवजी 'हिंदू' शब्द घालून वाचा म्हणजे यातला भोंगळपणा लक्षात येईल.