लता दीदी- एक आठवण

Submitted by उदय विरकुड on 16 February, 2022 - 10:01
Latadidi-speech

१९९७ च्या बॉस्टन बीएमएम अधिवेशनाच्या प्रमुख पाहुण्या हा मान, लता मंगेशकर ह्यानी स्विकारल्याचा आम्हा सगळ्यांना खुप आनंद होता. त्यांच्या सह सगळे मंगेशकर (आशा ताई सोडुन) असणार असे कळले. त्यांनच्या साठी airport पासुन limousine, security, इत्यादी जय्यत तयारी आम्ही केली होती. त्यांना रहायला convention center लागूनच हॉटेलचा Presidential Suite राखीव होता.

Convention च्या कार्यक्रमांची सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्याकडे असल्याने मला दीदींना भेटण्याची संधी मिळणार होती. एक दिवस आधी आम्हाला दीदींना भेटुन कार्यक्रमाची रुपरेशा द्यायची वेळ आली. मी व माझा सहकारी hotel lobby ला पोचलो व आम्ही आल्याची वर्दी दिली. Lift वर जात अस्ताना मनांत थोडी धाकदुक होतीच. Presidential Suite ची bell दाबली. दीदींच्या assistant नी दारं उघडल.

आतल दृश्य माझ्या कल्पनेहुंन खुप वेगळ होत. अगदी घरगुती वातावरण. त्या प्रशस्त living room मधे सगळे मंगेशकर गप्पा मारत बसले होते. लता दीदीं बरोबर मीना ताई, ऊषा ताई, ह्रुदयनाथ जी, त्यांच्या पत्नी व मुले. अगदी खेळीमेळी च वातावरण. अगदी घरगुती कपड्यात. दीदी राधाला आणी आदिनाथला सांगत होत्या आपण दुपारी shopping ला जाऊ.

दीदींनी बसायला सांगितलं. विचारल, चहा घेणार का? आम्ही नको म्हणायच्या आत, स्वःताच ऊठल्या व kitchen मधुन चहाचा tray आणला. व आपल्या हातांनी चहा करुन आम्हाला cup दिला.

आम्ही विषय सुरु केला. तुम्हाला घ्यायला कोण येणार, किती वाजता कार्यक्रम सुरु होणारं, दीप प्रज्वलन, त्यांच भाषण, इत्यादी इत्यादी. त्यांच्या assistant नी सगळं टीपुन घेतलं आणी दीदीनं होकर दिला. मग शेवटी माझ्या कडे बघुन म्हणाल्या, “माझी एक request आहे”. मी म्हणालो, सांगा. “मी बुटकी आहे, तर माझ्या भाषणा करता podium च्या मागे मला ऊभ रहायला एक छोट stool ठेवा.” मी म्हणालो नक्की. व आम्ही आनंदात बाहेर पडलो.

लता दीदीं चा अर्धा तास सहवास. त्यात काही Star पणा नह्वता. खुप सुंदर, खुप सहज.

कार्यक्रमाचा दिवस उजाडला. Auditorium गच्च भरल होत. लता मंगेशकरांच्या भाषणा साठी व ईतर कार्यक्रमांची मजा लुटण्यास सुमारे चार ते पाच हजार अमेरिकातील मंडळी उपस्थित होती. खुप छान वातावरण होत. Stage वर किल्या ची सजावट केली होती. लता दीदींसह ईतर आमंत्रित मंडळी बसली होती.

कार्यक्रमाची सुरवात झाली. मी विंगेत ऊभा होतो. सगळी stage वरची व्यवसथा बारकाईने बघत होतो. Stage वर सगळ्यांच्या स्वागताच भाषण सुरु झालं. व सुत्रधारानी लता दीदींना भाषणास आमंत्रित करण्यासाठी सुरवात केली.

आणी माझ लक्ष podium कडे गेल. काळजात धस्स झालं आणी मला घाम फुटला. त्या सगळ्या धावपळीत मी दीदींची request विसरलो होतो. Stool ची व्यवसथा राहीली होती. आता काय होणारं? एवढ्या मोठ्या व्यक्तीनं एक छोटीशी गोष्ट मागावी व ती मी विसरावी. पण मग मी लगेच नजर Stage मागे फिरवली. Set decoration team च काही सामान ईथ तिथं पसरल होत. आणी माझी नजर एका step stool वर पडली. मी पटकन धावलो व ते stool उचलल.

तिथे सुत्रधार दीदींना आमंत्रित करुन त्यांच्या पाशी गेले होते. ती संधी साधून मी पटकन Podium कडे गेलो व stool जागेवर ठेवले. लता दीदी जागेवरून ऊठल्या व podium कडे आल्या. सहज stool वर ऊभ्या राहिल्या व सुंदर भाषण झाले.

त्यांच्या वाणी नी मी विंगेत मंत्रमुग्ध झालो होतो. दीदींनी मागितलेली एक छोटीशी गोष्ट मी पुरवू शकलो. मी ठेवलेल्या stool वर त्या ऊभ्या होत्या. लांबूनच मला त्यांच्या पायांचा स्पर्ष झाल्याचा अहसास झाला.

दीदींना आदरांजली। ॐ शांती।
उदय विरकुड
PHOTO-2022-02-16-11-17-52.jpg

Group content visibility: 
Use group defaults

खूपच मस्त.. अजून त्या भाषणाबद्दल आणि त्यांच्या कार्यक्रमाबद्दल वाचायला आवडेल , नक्की लिहा.

छान

खूपच मस्त.. अजून त्या भाषणाबद्दल आणि त्यांच्या कार्यक्रमाबद्दल वाचायला आवडेल , नक्की लिहा. >> नुकतेच फेसबुकवर ते भाषण ऐकले. बीएमेम ने लिंक दिली होती.

उदय छान आठवण !

आयत्यावेळी स्टुलाची सोय झाली नसती तर कायमची रुखरुख राहिली असती मनात. विसरभोळेपणा सुद्धा कधी कधी सुखद आठवणी देऊन जातो. अनुभव छान लिहिला आहे. भाग्यवान व्यक्तींमध्ये तुमच्या नावाची नोंद झाली आहे. अभिनंदन.

ऐकलं ते भाषण, अगदीच वाचून काढलंय, थोडं विनोदी पण वाटलं कारण त्यांना कधी असे बोलताना ऐकलं नाहीये Happy