मुंबई आणि आईस हाऊस

Submitted by प्रसाद70 on 26 January, 2022 - 08:20

मुंबई आणि आईस हाऊस
मुंबईत प्रथम बर्फ आणला तो १८३५ मध्ये मेसर्स जहांगीर वाडिया आणि कंपनी ने .तुमचा विश्वास बसणार नाही पण अमेरिकेतील साऊडॅपटन बंदरातून हा बर्फ समुद्रीमार्गे प्रवास करून शंभर दिवसांनी मुंबईत पोहचे. ह्या बर्फाची मुंबईतील लोकप्रियता एवढी होती कि मुंबईतील सधन लोकांनी वर्गणी काढून रु. १०,००० जमा केले व बर्फ साठवण्यासाठी एक आईस हाऊस बांधले. सध्याच्या के .आर . कामा इन्स्टिटयूट ऑफ ओरिएंटल स्टडी च्या जागेवर ते बांधले होते.त्याची रचना गोल होती व वर डोम होता .या इमारतीला खिडक्या व दरवाजे नव्हते . वरून आत जाण्याची सोय होती .भिंतीलगत आतल्या बाजूने जिना होता. बर्फाला उष्णता लागून तो वितळू नये म्हणून अशी व्यवस्था होती. अमेरिकेतील व्यापारी फेड्रिक ट्युडर या बर्फाच्या लाद्या तलावातून कापत असे , त्यांची वाहतूक करण्यासाठी पाईन लाकडाचा भुसा व लोकर वापरीत. वर्षातून साधारपणे दोनदा हा बर्फ मुंबईत येत असे. जमशेटजी जी. जी. भॉय यांनी प्रथम त्यांच्याकडील पार्टीत बर्फ व बर्फापासून तयार केलेले पदार्थ (बहुदा आइसक्रीम) ठेवले होते.त्या काळात हा बर्फ ४ अणे पर पौंड असा विकला जायचा. त्यामुळे हि एक चैनीची गोष्ट समजली जायची.वाढलेला खर्च व वाढलेला कर त्यामुळे १८५७ मध्ये हा बर्फ मुंबईत आलाच नाही. मुंबईतील श्रीमंत लोकांना आता या बर्फाची चटक लागली होती. त्यांनी सरकारकडे याची तक्रार केली .पुढे १८६० मध्ये या बर्फाची वाहतूक सुरळीत झाली .तसेच बर्फाची आवक देखील वाढली . त्यामुळे हा बर्फ २ अणे पर पौंड मिळायला लागला. १८६४-६५ मध्ये हा बर्फ मुंबईत अगदी सहज मिळायला लागला कि तो गरिबांना देखील सहज परवडू लागला. ट्युडर आणि कंपनीने अमेरिकेतून बर्फ़ाबरोबर सफरचंदे पाठवायला सुरवात केली .एवढ्या लांबच्या प्रवासात ३० ते ३५ टक्के सफरचंदे खराब होत .या सफरचंदना भरपूर मागणी असे .हि सफरचंदे आली कि आठवाडाभरात विकली जात. 'मंदारीन ' जातीची उत्तम प्रतीची सफरचंदे २ रु डझन या भावाने विकली जात, तर लहान आकाराची सफरचंदे १रू ८० पैसे आणि १२ अणे पर डझन ने विकली जात . पुढे १८६३ मध्ये एडनला मेसर्स लूयक थॉमस आणि कंपनी ने बर्फाचा कारखाना सुरु केला. हा बर्फ त्यांनी पी अँड ओ या शिपिंग कंपनी मार्फत मुंबईत पाठवायला सुरवात केली.पण त्यामुळे ट्युडर आणि कंपनी चा बर्फ आणि सफरचंदाचा व्यापार बंद पडला .पुढे जवळ जवळ २० वर्षांनी मुंबईत पहिली आईस फॅक्टरी उभारली गेली .हा बर्फाचा व्यापार बंद झाला.पुढे या आईस हाऊस चा वापर साध्या गोदामाप्रमाणे होऊ लागला . १९१६ मध्ये हे आईस हाऊस पाडून त्या जागेवर मे. खारसेटजी रुस्तमजी कामा यांच्या नावाने के . र. कामा ओरिएंटल इन्स्टिटयूट बांधली गेली.

संदर्भ -:’Shells from the sands of Bombay ‘by sir D.E. Waccha

ice house and bombay .jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हा हा.. फारच ईण्टरेस्टींग माहिती आहे.
मला आठवतेय अगदी म्हणजे अगदी लहानपणी आमच्याकडे फ्रीज नव्हता वा चाळीत क्वचितच कोणाकडे असायचा. तेव्हा रविवारच्या मटणाच्या जेवणाला आणि दारूला जो बर्फ लागायचा. तो आम्ही माझगाव डॉकयार्ड जवळच्या बर्फाच्या कारखान्यातून आणायचो. पुढे घराघरात फ्रिज आले आणि आम्ही मोठे होता होता ती फॅक्टरी बंद पडली. पण त्या बसस्टॉपचे नाव पुढे कित्येक वर्षे आईस फॅक्टरीच होते.

ऋनमेष दारू पीत नाही.
मग दारू पिण्यास रविवारी बर्फ आणतो असे का लिहल त्यांनी