बिल्डर ची करारनामा[agreement] करण्यास टाळाटाळ .. कृपया जाणकारांचा सल्ला अपेक्षित ..

Submitted by bvijaykumar on 23 January, 2022 - 04:29

साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी एका प्रतिथयश बिल्डर ची साईट सूरु आहे कळताच तेथे फ्लॅट बुक केला .... २०२५ मध्ये ताबा मिळणार आहे असे कळते .. प्रकल्प रेरा संमत आहे ... २०% रक्कम हि त्यास दिली .. त्याची रीतसर पावतीही घेतली आहे ... परंतु ४० दिवस उलटूनही करारनामा [agreement] करण्यास टाळाटाळ करत आहे काय करावे ? ...... कृपया जाणकारांचा सल्ला अपेक्षित ..

Group content visibility: 
Use group defaults

20% रक्कम द्यावी इतकी

20% रक्कम द्यावी इतकी बिल्डिंग वर आली आहे का ?

बिल्डर लोक एगरिमेन्ट बल्क मध्ये करतात , म्हणजे रजिस्टर ऑफिसात ग्रुप मॅनेज करणे त्यानासोपे जाते

त्यामुळे थोडे थांबा

ते करून देतील
आणि तसेही हे एगरिमेन्ट झाल्याशिवाय त्यांना पुढचे पेमेंट रिलीज होणार नाही

लवकर रजिस्टर न होण्याचा एक फायदाही आहे, नको वाटले तर कॅन्सल करु शकता

वकील काय करणार ह्यात ?

त्याने दिले नाही अजून तर एक नोटीस काढेल , 10 हजार घेऊन
फुकट खर्च होईल
त्यापेक्षा तुमच्या बिल्डरकडे जाऊन किती फ्लॅट विक्री तुमच्या विंगेत होत आहे , हे बघा, त्यांच्या संपर्कात रहा, म्हणजे ते एकदम सर्वाना नेतील

धन्यवाद ............ BLACKCAT
.....................................................
20% रक्कम द्यावी इतकी बिल्डिंग वर आली आहे का ? <<<< ......... १०% झालि आहे .

लवकर रजिस्टर न होण्याचा एक फायदाही आहे, नको वाटले तर कॅन्सल करु शकता <<<< ....... भरलेली रक्कम परत मिळण्यास काही अडचणी उपस्थित करू शकतो का बिल्डर ...

धन्यवाद ............ Srd
.....................................................
थोडे थांबा. चार महिन्यांनंतर पैसे परत मागा............. <<<<< तशी वेळ येऊ नये असे वाटते ...

माझ्या भावाने नौपाडा(ठाणे) इथल्या बिल्डरकडून (४ वर्षांपूर्वी) पैसे मागून घेतले.आणि ते बरेच झाले. दुसरीकडे भरून ती इमारत होऊन राहायलाही गेले तरी पहिल्याचे काही पुढे सरकलेच नाही. सावध आणि साशंक राहाणे उत्तम.

वकिलाची नोटीस द्यावीच लागेल. जर पुरेसे बुकींग मिळाले नसेल ( हल्ली सगळीकडे होतंय) तर रजिस्ट्रेशनला टाळाटाळ करतात बिल्डर. पैसे परत करणार असेल तर एक तर व्याजासहीत किंवा बुकींगचा सध्याचा दर यातले जे जास्त असेल त्याप्रमाणे त्याला फरक द्यावा लागेल.

विसरा ते

पावतीवर स्पष्ट छापलेले असते , 1 वर्ष अवधीत रिफड मिळेल, 5 % कापून मिळेल

आकडे उदाहरण आहे , काहीही असू शकतील

INGRAM पोर्टल वरून MAHARERA ला त्याच्या ऑफिस ऍड्रेस, SITE ऍड्रेस आणि RERA नंबरसहित ऑनलाईन कॉम्प्लिनच्या करावी. तसेच सोबत तुम्ही त्यांना पायमेन्ट करण्या आधी आणि नंतर केलेले डोकमेंट्स आणि PAYMENT च्या डिटेल्स जोडाव्यात. याशिवाय बिल्डर च्या ऑफिसशी ई-मेल द्वारे काही कोम्मुनिकेशन केला असल्यास ते जोडावे. त्यानंतर कॉम्प्लिनच्या रेजिस्टरेड झाल्यावर AKNOWLEDGENET गेणेरते होईल ती बिल्डरच्या ऑफिस ला पाठवावी. सकारात्मक RESULT मिळेल.

ंआझे श्वशूर दादर, मुंबई इथे रहात असत, रेंट कंट्रोल असल्याने त्यांचे भाडे नगण्य होते. पण चाळ हळू हळू कोसळत होती.
१९९० मधे त्यांच्या चाळीच्या मालकाने म्हंटले की मला प्रत्येकी दहा हजार रुपये द्या. मी ही चाळ पाडून नवी चांगली इमारत करतो नि तिथे तुम्हाला तुमच्या जागेहून मोठी जागा देतो. त्याचा विचार असा होता की तीन मजली ऐवजी पाच मजली बांधीन. तीन मजले जुन्या भाडेकरूंना नि इतर फ्लॅट्स इतरांना भरपूर जास्त भाड्यात देता येतील.

हळू हळू दहा वर्षात सर्व भाडेकरूंनी पैसे दिले नि चाळ खाली केली. मग हळू हळू ती चाळ पाडली, २००५ मधे नविन इमारतीची पायाभरणी झाली. आजतागायत तिथे एकहि मजला बांधून झाला नाही.
दरम्यान २००२ मधे माझे श्वशूर स्वर्गवासी झाले!
आता ते दहाहजार गेले नि सगळेच गेले.
मज्ज आहे न् काय भारतात!!