दिल्ली - मुंबई प्रवास (स्वतःच्या गाडीने)

Submitted by mandard on 24 December, 2021 - 05:44

गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास माझी मुंबईला बदली झाली पण करोना च्या दुसर्या लाटेमुळे मुंबईला Physically यायला जुलै उजाडला. आधी गाडी दिल्लीत विकुन मुंबईत नवीन घ्यायचा विचार होता पण एकंदर परिस्थीती बघता हीच गाडी अजुन काही वर्षे वापरायच ठरल. तसेच करोना मुळे २०१९ नंतर कुठे फिरायला गेलो नव्हतो तेव्हा अनायसे फिरुन पण होइल असा विचार करुन रोड ट्रिप करायची नक्की केल. १६ जुलै ला पहाटे निघायचे ठरले. मी आणि बायको दोघेही गाडी चालवणार होतो.
१५ ला सामानाची बांधाबांध झाली आणि सामानाचा ट्र्क गेला. त्या रिकाम्या घरात एक रात्र काढायची पण जीवावर आल होत पण नाईलाज होता. १६ वर्षाच्या दिल्ली NCR मधल्या वास्तव्याची शेवटची रात्र. माझ्या आयुष्यातील सर्वात यशस्वी कालखंड. जरी घरी परत जात असलो तरीही मन भरुन आल. बायकोला तर खुप वाईट वाटत होते. मुलगा तर इथेच लहानाचा मोठा झाला होता. असो.
१६ला पहाटे निघालो आदल्या दिवशीच्या दगदगीने मला थकल्यासारखे वाटत होते. त्यामुळे बायकोने गाडी चालवायला घेतली. सकाळच्या वेळी जास्त रहदारी नव्हती तसेच राजस्थान सिमेवरील शेतकरी आंदोलनाची ट्रफिक चुकवायची होती त्यामुळे निघायची घाई केली. आंदोलनाच्या जागी थोडे diversion होते. पण एकही आंदोलक नव्हता थोडेफार पोलिस होते.आंदोलक बहुदा चहा नाष्टा करुन १० वाजेपर्यंत येत असावेत. तसेही ही आंदोलनाची मेन जागा नव्हती. थोड्यावेळाने आम्ही नीमराणाला नाष्टा करायला थांबलो. "चुक ना जाना - किंग का खाना" पराठे, डोसा चहा उरकुन पुढे निघालो. जयपुर बायपास करुन अजमेरच्या आसपास जेवायला थांबलो. वाटेत मी गाडी चालवायला घेतली. गुरगावात हलकासा पाऊस होता पण येथे प्रचंड गरम होत होते. (राजस्थान आणि जुलै - अजुन काय असणार :-)). मजल दरमजल करत रात्री आठच्या सुमारास आमच्या पहिल्या मुक्कामी उदयपुरला Radisson Blueला पोचलो. नुकतेच lockdown उठल्यामुळे break fast / Dinner included चांगल डील मिळाले होते. तेथे तर दोन लग्ने पण होती. कोणीही मास्क घालत नव्हते. मास्क घातलेले आम्ही एलियन सारखे दिसत होतो. थोडा टाइमपास करुन, जेवुन झोपलो.
आज - गुरगाव - जयपुर बायपास-अजमेर बायपास - ब्यावर-राजसमंद-नाथद्वारा-उदयपुर - ६३२ कि.मी.
दुसर्या दिवशी आरामात उठुन नाष्टा करुन निघालो (किती आरामात ११ वाजता :-)) आज मी एकदम फ्रेश होतो त्यामुळे गाडी चालवायला घेतली. उदयपुर अहमदाबाद हायवे एकदम मस्त आहे. साधारण २ वाजता गुजरात मधिल मोडासाला जेवायला थांबलो. आज कुठे रहायचे ते ठरवले नव्हते. शेवटी सुरत फायनल करुन Marriot बूक केले. येथे पण चांगली डिल मिळाली. जेवल्यानंतर बायकोने गाडी चालवायला घेतली. ह्या रोडवर रहदारी खुपच होती. वडोदरा गाठायला सहा वाजले. तेथे चहा घेवुन सुसाट निघालो. लकीली भरुच टोलला जास्त वेळ न अडकता ९ पर्यंत सूरत गाठले सुरतच्या अलिकडे पाऊस लागला आणि मुंबई जवळ आल्याची चाहुल लागली.
आज उदयपुर - मोडासा-वडोदरा-भरुच-सुरत ४९६ कि.मी.
आज पण आराम होता. येथुन पण आम्ही ११ वाजता निघालो. आज मात्र पाऊस चांगलाच पडत होता. त्यामुळे गाडी आरामात चालवत होतो . traffic पण खुप होती. महाराष्ट्र येताच घाट रस्ते चालु झाले. साधारण सातच्या सुमारास घोडबंदर रोडला आलो आणि जवळपास तासभर traffic jam मधे अडकलो शेवटी ८.३० ला ठाण्यात पोचलो. सामानाचा ट्रक यायला अजुन दोन दिवस होते त्यामुळे झोपायला मित्राच्या घरी कांजुरमार्गला गेलो.
आज सुरत - वलसाड-वापी-वसई विरार-घोडबंदर रोड - ठाणे २८२ कि.मी.
-----
आजकाल मुंबई दिल्ली रोड ट्रिप भरपुर लोकं करतात. ह्यात काहीही नाविन्य नाही. पण आमच्यासाठी ही पहिली मोठी रोड ट्रिप होती.
सर्वसाधारण रस्ते सुंदर आहेत काही भाग वगळता
गाडीने (Swift Dezire) काहीही त्रास दिला नाही
आम्ही दोघांनी Driving केले त्यामूळे जास्त दमणुक झाली नाही.
राजस्थान गुजरात सिमेवर चेकिंग होते. तेव्हा दारुच्या बाटल्या सामानात ठेवु नका.
माझ्या १४ वर्षाच्या सदस्य कालावधीत मी प्रथमच माबोवर लिहिले आहे. तेव्हा थोड्याफार चुका असतील तर माफ करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलय प्रवासवर्णन.
दोघांनी ड्रायव्हींग केले हे मस्तच. Happy
आमचाही सासरगावी जायला 700किमी रोडप्रवास होतो वर्षातून एकदा. कोरोनामुळे मागचे दोन वर्षे गेलो नव्हतो. नोव्हेंबर महिन्यात जाऊन आलो.

बाराशे किमी आणि दोन स्टॉपस म्हणजे दगदग नाही.
छान.
कोणता तुकडा आवडला? आणि तिथून कोणत्मा वेळी मजा येत असणार?

पण आमच्यासाठी ही पहिली मोठी रोड ट्रिप होती.

माझ्या १४ वर्षाच्या सदस्य कालावधीत मी प्रथमच माबोवर लिहिले आहे
>>>>

बहुत कुच लाईफ मे पहली बार होता है...
तुम्ही दोन गोष्टी जमवल्यात.. अभिनंदन!

मस्तच लिहिलंय.

ठाणा हल्ली हिट डेस्टिनेशन झालं आहे, मराठी लोकांसाठी आणि रहायला आहे पण छान. पटकन रुळाल ठाण्यात. ठाण्यात स्वागत.

फोटो असतील तर बघायला आवडतील. या सगळ्या प्रदेशांबद्दल आणि गावाच्या नावांबद्दल ऐकून आहे पण गुरगाव आणि ठाणे हे दोन सोडले तर अजून कुठल्याच शहराला भेट दिलेली नाही (अगदी वसई विरारही नाही). फोटो पाहून तेवढीच दुधाची तहान ताकावर !

मस्तच लिहिलेय.
तुमच्या दिल्लीतल्या खास अनुभवावरून जरूर लिहा

फोटो जास्त नाहीत. Videos आहेत. ते दोन दिवसात टाकतो.
दिल्ली की ठाणे? दिल्लीत 16 वर्षे होतो दिल्लीशी एक ऋणानुबंध जुळला आहे. ठाण्यात 4 महिनेच झालेत. सध्या कोलशेत, घोडबंदर, राम मारुती रोड इ. ठिकाणच्या traffic शी जुळवून घेतोय. शहराशी पण घेऊ Happy

चांगलं लिहिलंय.
पहिल्या लेखाबद्दल , पहिल्या मोठ्या रोड ट्रिपबद्दल अभिनंदन.
MMR मध्ये स्वागत.

छान लेख, प्रवासासोबतच कुठे काय खाल्लं आणि काय जास्त आवडलं हेही सांगितलं असतं तर अजून मजा आली असती.

छान अनुभव कथन... एकदा उदयपुरला (मुंबईहून) जाण्याची इच्छा आहे. बघू कसे जमतंय ते. (माझ्या कडे पण डिझायरच आविन Wink )

एकदा उदयपुरला (मुंबईहून) जाण्याची इच्छा आहे. >> नक्की जावा सकाळी लवकर निघालात तर आरामात पोचाल.

मला एका सरदार मित्राने ( त्यांचे ट्रक , ट्रान्सपोर्ट धंधा होता) सागितले की ग्रांड ट्रंक रोड कोलकाता ते पेशावर वर संध्याकाळी चार ते सहा सूर्य डोळ्यावर येतो.

Pages