आंदोलनजीवींनी उन्मत्त सत्ताजीवींना शरण आणले

Submitted by ashokkabade67@g... on 30 November, 2021 - 12:58

छप्पन ईंच छाती ,एकदा घेतलेला निर्णय कधीच माघारी न घेणारा नेता अशी भ्रामक प्रतिमा मीडियाच्या सहाय्याने भक्तांच्या मनात जोपासणारा नेता आपला पराभव डोळ्यासमोर दिसताच कणखरपणाचे घातलेले खोटे कवच फेकून देत राष्ट्रीय एकात्मता ,तपस्या ,माफी आदी शब्दांचा फुलोरा पसरवत अक्षरशः भक्तांचा भ्रमनिरस करत शेतकरी कायदे परत घेऊन पराभव पत्करतो तेंव्हा आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिनवणारा नेताही फक्त आणि फक्त सत्ताजीवी ठरतो।आपणास जनतेने बहुमत दिलेल्या म्हणजे मी म्हणेल ते सारेच जनतेने मान्य करायला हवे विरोध करणारे सारेच देशद्रोही आहेत अस समजणाऱ्या आणि स्वताला देशाचा महान क्रांतिकारी नेत्यालाही शरण आणता येते हे ज्यांना भाजप नेत्यांनी आंदोलनजीवी म्हणून हिनवले त्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आणि ज्या दादागिरीने कुठलिही चर्चा न करता शेतकरी कायदे रेटून नेत कायदे करणाऱ्या मोदींनी आणखी संसदेत या बिलाची चिरफाड होऊन संसदेसमोर आपला खरा हेतु येऊ नये म्हणून कुठलीही चर्चा न होऊ न देता तिन्ही कायदे गपगुमान परत घेतले .भारतीय संसदेत पाशवि बहुमत असतांनाही सरकारवर एकदा केलेले कायदे परत घेण्याची पाळी येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही ,संपूर्ण बहुमत असतांनाही सन1965 मधे तत्कालीन काँग्रेस सरकारलाही हिंदीसक्ती कायदा परत घेण्याची नामुष्की पत्करावी लागलु होतु फरक ईतकाच आहे की तत्कालीन पंतप्रधानांनी आश्वासन देताच त्यावर विश्वास दाखवत दक्षिणेकडील राज्यात सुरु असलेले आंदोलन संपले होते कारण जनतेला विश्वास होता की पंतप्रधान आपले आश्वासन पाळतीलच पण आता महान क्रातीकारी जनहितदक्ष कणखर आणि क्रांतीकारी निर्णय घेणाऱ्या पंतप्रधानांनी आश्वासन देऊनही त्या़च्चा शब्दावर विश्वास न ठेवता आंदोलन सुरुच ठेवून अविश्वास दाखवणे हाच खरतर सरकारचा सर्वात मोठा पराभव आहे आणि याला कारण आहे सरकारचे शेतकरी आंदोलनाबाबतचे धोरण आज जरी मोदींनी सत्तेसाठी का होईना माफी मागितली असली तरीही प्रत्येक इंदोलन आपण सहज चिरडून टाकु शकतो हा विश्वास सरकार ,मोदीजी व शहांना नडला आपल्या विरोधी कुठल्याही आंदोलनाला देशद्रोही ठरवत सहज संपवता येते हा आत्मविश्वास नडला ,आंदोलन सुरु असतांना भाजप नेत्यांना आंदोलनाबाबत रोजच नवनवे शोध लागत होतै कुणाला आंदोलनस्थळी एके 47 रायफली दिसत होत्या तर काही भाजप नेत्यांना आंदोलनाआड खलिस्तानवादी आतंक फैलावणार असे भासत होते तर एका भाजप सचिवाला हे पाकिस्तान प्रणित आंदोलन असल्याचा शोध लागला होता तर दुसऱ्या महिन नेत्याला हाय टुकडा टुकडा गँगचे कारस्थान वाटत होते सरकारचीही मजल शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत गेली होती सरकारच्या काही मोदीप्रेमी हस्तकांनुही न्यायालयात जात आंदोलन संपवण्यासाठी असफल प्रयत्न करुन पाहिले सरकारनेही कधी विज कापत तर कधी ऐन थंडीत शेतकऱ्यावर पाण्याचा मारा करत तर कधी रस्त्यावर खिळे ठोकत दडपशाही करून आंदोलन दडपण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करुन पाहिला स्वता भारतिय भाषा शब्द कोषात आंदोलनजीवी या शब्दाची भर धालत पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवली पण शैतकरी हटले नाहीत जवळपास सातशे शेतकऱ्यांचा बळी घेत शेवटी हरले ते सरकार .।
मोदींचा माफिनामा वा तपस्या कमी पडल्याचा बहाणा हे सारे नाटक आहे पंजाबमधे भाजपला जनाधार नाही आणि तो कधिच नव्हता अकाली दलाच्या खा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माठ भक्तांना तोंडावर पाडले शेठने.
ज्या वेगात हे कृषी कायदे संसदेत बिना चर्चेने पास करून घेतले त्याच्या दुप्पट वेगाने मागेही घेतले.

आंदोलनजीवींनी उन्मत्त सत्ताजीवींना शरण आणले (2)
पंजाबात भाजपला जनाधार कधीच नव्हता अकाली दलाच्या खांद्यावर बसुन मिळेल तेवढे नेहमीच भाजपने पदरात पाडुन घेतले पण या तीन कायद्यांमुळे भाजपसोबत केंद्रात सत्तेत राहिल्यास आपला जनाधार गमवावा लागेल या भितीने अकाली दलाने युती तोडत सत्तेतुन बाहेर पडण्याचा निर्णय अकाली दलाने घेतला आणि भाजपला तिथे मीत्रपक्षही उरला नाही काँग्रेस मधुन बाहेरच्या र पडलेले कँप्टन अमिंदरसिंगांशी युती शक्य होती पण अडचण हे कायदे होते बर हे आंदोलन पंजाबपुरतेच न रहाता उत्तर प्रदेशातही पसरले आणि त्यातच आलेले निकाल पहाता भाजपला आपला पराभव दिसु लागला 2024 मधे जर मोदींना सत्तेवर यायच असेल तर 2021 मधे युपीत योगींचा विजय होणे गरजेच आहे हे भाजपच्या अमित शाह याचाणक्यान आधिच सांगितले पण तेथेही पराभदाचीच शक्यता दिसत आहे मग मोदींना तपस्या माफि वापर गरे शब्द आठवले व देशाची क्षमा मागत हे कायदे शब्दाचां पीसारा फुलवत परत घेतले गेले या आंदोलनाले फक्त सत्ताधाऱ्यांनाच नाही तर विरोधी पक्षानाही सरकारला नमवता येण्याचा एक नवा मार्ग दाखवला कितीही बहुमत असुद्या आणि कितीही उन्मत्त पंतप्रधान असुदेत यासत्ताजीविंना सत्तेवर आच आणताच शरण आणता यांनी ते ।
पण या सत्ताजिवींनी आपल्या समर्थकाऔचे मात्र पार हसेच केले आधी हे शेतकरी कायदे शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे आहेत हे घसा फाडून सांगणाऱ्यांना आता परत या माघारीचेही समर्थन करावे लागणार आहे आता यात राष्ट्रीय एकात्मता ,मोदीं कसे नम्र आहेत हे सांगितले जाईलच म्हणा या बाबत भाजपचा आयटी सेल आणि अंधभक्त पुढेच असतील म्हणा पण जे सातशे शेतकरी शहिद झालेत त्यांनाही न्याय मिळायलाच हवा आणि भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्यि नेत्यांनी आता क्षमा मागायलाच हवी । तस आता युपीतील विजयासाठी संघही मैदानात हिंदू मुद्दा घेऊन उतरतोच आहोत म्हणा पण या माघारी नंतरही भाजपला फायदा होईलच असे सांगता येत नाही कारण आता मत मिळवून देणारा चेहऱ्यावर आता जनतेचा विश्वास उरला नाही हे या आंदोलनाने दाखवून दिले ।देशात सुधारणा घडवता यांनी तच नाही असे नाही त्यासाठी हवी असते सत्ता सोडण्याची तयारी मनमोहन सिंगानी तो कणखरपणा दासशखवला होता आणि तेंव्हा हेच भाजप नेते काँग्रेस आता देशही विकुण खाणार अशी टिका करत होते आता ती टिका भाजप नेत्यांनी सोईस्कररीत्या विस्मरणात नेली म्हणा कारण दिले शाची मालमत्ता मोदीजींनीच विकण्यास सुरवात केली आहे तरीही क्रुषीक्रांती शतकऱ्यांचे समुपदेशन करत काँग्रेस सरकारने यशस्वी करून दाखवलीच होती ना पण त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेतले आधी समुपदेशन केले कायदे नाही आणि शेतकऱ्यांनीही मग ही क्रांती स्विकारली कुठलाही बदल कायदे लादुन करता येत नाही हेच शेतकऱ्यांनी दाखवून दिले एक मात्र खरे आता सत्ताजीवी हा एक नवा शब्द शब्द कोषात समाविष्ठ झाला आणि आंदोलन जीवींनी सत्ताजीवींना शरण आणले आणि भारतीय संसदेत दुसऱ्यांदा सत्ताजींवींवर कायदे परत घेण्याची नामुष्की आली आता यातुन समर्थकांनीही धडा घ्यावा आणि कुठलाही सारासार विचार न करता उगाच कशाचेही समर्थन करु नये नाही तर नाय ते कधी पलटी मारून समरथकांना केंव्हा तोंडावर पाडतील हे सांगता येत नाही ।