दिवाळी अंक २०२१ माहिती व चर्चा

Submitted by अश्विनीमामी on 2 November, 2021 - 06:42

शुभ दीपावली.

ही दीपावली व नवे वर्श आप णा सर्वांस सुखा समाधानाचे व आनंदाचे आरोग्याचे जावो.

कोणते दिवाळी अंक घेतलेत बाजारात आलेत.? ऑनलाइन अंक पाहिलेत का?

ह्या चर्चे साठी धागा.
मी येत्या काही दिवसात मॅजेस्टिक ठाणे ला जाणार आहे तर काही अंक मिळाले तर इथे लिहिते च.

चकली दही व दिवाळी अंक. सूख म्हणजे दुसरे काय असते.

काल स्टेशन पर्यंत गर्दीत चालत जाउन खालील अंक आणले. आता एक एक परीक्षण लिहीन सावकाश. एखादी माहीती हवी असल्यास प्रतिसादात विचारा.

उत्तम कथा रु. २५०.००

नवल रु. ४००.००

ग्रहांकित रु. ३००.००
मौज रु. ३००.००
माहेर रु. २५०.००
मेनका रु. २५०.००

मटा रु. १५०.००
आवाज रु. ३६०.००
साप्ताहिक सकाळ रु. १२०.००

व एबीपी माझा त्या विक्रेत्याने फुकट दिला रु. १५०.००

शतायुषी बंद झाला. धनुर्धारी दिसला नाही. चंद्रकांत किशोर मानि नी व्गैरे अंक पण आले आहेत.

किल्ली ह्यांनी दिलेली लिंक
https://drive.google.com/file/d/1_Rj2X1r9TjqCkoaaVDIt_ZgusWOwhBAF/view?u...

ह्यात माबो करांचे लिखाण आहे.

वाचकांना शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकसत्तेत स्वागत दिवाळी अंकांचे हे सदर येते.
ऑनलाइन शोधलं तर पार २०१२, १५ चा मजकूर दिसतोय. पण २०२१ नाही.
ईपेपर वाचावा लागेल.

नवल दिवाळी अंक function at() { [native code] } भरगच्च आहे. रहस्य कथा भय कथा चातुर्य कथा लेख अश्यातून ही जॉनरा वेल एक्स्प्लोअर्ड आहे. व वाचकांस सर्व प्रकारच्या कथांचा आनं द घेता येतो. मतकरी व खांबेटे ह्यांच्या कथा पुनर्मुद्रीत्त आहेत. मी रवि वारी निरो एक तमासगीर सम्राट हा मोठा व माहितीपूर्ण लेख वाचला. मी ह्या वर रोमन हिस्ट्रीचे एक ऑडि ओ बुक फार काळ ऐकत आहे काम करताना ऑफिसात पण मराठीतून माहिती जास्त छान समजते व एंजॉय करता येते. उच्चार समजतात. हे नक्की.

भवतालचा दिवाळी अंक भूजल विशेषांक आहे. यातले अनेक लेख आवडले, आवर्जून वाचण्यासारखे.
जागतिक तज्ञांचे लेख मात्र भाषांतरामुळे काहीसे बोजड वाटले.

या वर्षी दिवाळी अंकांमध्ये माझ्या दोन कथा आहेत.
आवाज दिवाळी अंकात 'जगावेगळी प्रेमकहाणी' आणि
सामना दिवाळी अंकात 'झान्गडगुत्ता'
वाचल्यास अभिप्राय जरूर कळवा

दरवर्षी बुकगंगा वरून ऑर्डर करत असतो पण काही लोकप्रिय अंक आजून दिसत नाहीत. ह्यावेळी अक्षरधारा site वर सगळे दिवाळी अंक आहेत
https://www.akshardhara.com/en/37--2021-diwali-ank-2021
घरच्यांना तिथूनच ऑर्डर केले आहेत . किंडल वर निदान निवडक अंक तरी यावेत अशी अपेक्षा आहे म्हणजे इथे वाचायला मिळतील . सध्या मीडिया watch अंक आणि साधनाचे अंक किंडल वर आहेत. मीडिया watch चा अंक बरा वाटला. रवीशकुमार , प्रशांत किशोर , जी .ए.कुलकर्णी आणि जयंत पाटील ह्यांचे व्यक्तिचित्रं आवडले.

मौजेतल्या शिप ऑफ थिसियस वरच्या लेखात " माध्यमांना जसे मानवी मज्जासंस्थेचा विस्तार मानल्या जाते" अशी रचना आहे.
त्याच परिच्छेदात आधी "नावाजली गेली आहे" असंही आलंय.
आता दिवाळी अंकात पञ‌, मैञी असं दिसलं की मी सुडोमिमो.

लोकसत्तेत चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या शंभरी निमित्त चार लेख आहेत. त्यांत खूप overlapping आणि ठळक errors of ommission आहेत. चौथा लेख थोडं balancing करतो. तो‌ वाचताना आपणही चीनच्या वाटेनेच जात आहोत असं वाटायला लावतो. तसा मुद्दाम लिहिलाही असेल.

मौजेचा अंक दीपावली आणि अक्षर पेक्षा वजनाला कमी आहे. पण किंमत जास्त. अंकात जाहिराती नसल्यात जमा. आहेत त्या वाङ्मयासंबंधी.
आशा बगेंची कथा आवडली. एकाच परिच्छेदात "तिने बी ए ला सायकॉलॉजी घेतले" आणि "सायकॉलॉजी आणि इंग्लिश लिटरेचर घेतले" अशी वाक्य आहेत. पुढे टी वायला शेवटच्या पेपरनंतर मित्राला सांगते - "माझ्या विषयाचा पेपर होता. सायकॉलॉजी."

कृष्णात खोत यांची कथा आणि अरुणा ढेरेंचा लेख एकेक परिच्छेद वाचून सोडून दिले. काश्मीरवर आक्रमण - नरेंद्र चपळगावकर आणि व्ही पी मेनन - अंबरिश मिश्र हे लेख वाचून नवं काही कळलं.
अमिरी बराका वरचा लेख वाचून हा माणूस मारला कसा गेला नाही असा प्रश्न पडला. म.फुल्यांची आठवण झाली.
सुबोध जावडेकरांचे मानवी वर्तनातले विज्ञान सांगणारे लेख आवडतात. धाटणी उत्तम शिक्षकाची आहे.
शिप ऑफ थिसियसवरचा लेख वाचायचा प्रयत्न सोडून दिला. इतकं जड सध्या वाचायचं नाहीए.
विनय हर्डीकरांच्या म द हातकणंगलेकरांच्या व्यक्तिचित्रावर नजर फिरवली. त्यांनी स्वतः बद्दलच जास्त लिहिलं आहे.
वैयक्तिक आठवणींबद्दलचे लेख वाचायचे नाहीत असं ठरवलं होतं. पण राणी दुर्वेंचा त्या राहिलेल्या वेगवेगळ्या घरांवरचा लेख वाचतच राहिलो.
अनिल अवचटांचा बाबा आढावांवरचा लेख वाचेन.

भरत, विनय हर्डीकरांच्या लेखासाठी +१
त्यांचे किती तरी लेख असेच असतात. स्वतःबद्दल जास्त हे तर झालंच, शिवाय मोठ्यांच्या छोट्या गोष्टी जास्त असतात. या गोष्टी इथे का लिहिल्या आहेत, असा प्रश्न नेहमी पडतो. हाही लेख तसाच आहे!

वर्जित मध्याचा नियम ही कथा आवडली.
लॉजिक मधल्या संकल्पनांसाठी वापरलेले मराठी शब्द छान आहेत.
स्मृतिशेषनिष्ठा म्हणजे nostalgia का?
तेवढं वैदिक गणित नसतं तर बरं झालं असत़‌

मौज अंक फार आवडला.बराच वाचायचा राहिला.
राणी दुर्वे यांचा लेख अप्रतिम आहे.काही ठिकाणी तर अगदी अगदी झाले.
नरेंद्र चपळगावकर यांचा लेखही चांगला आहे.
आशा बगेची कथा नेहमीप्रमाणे छान.का कुणास ठाऊक त्यांच्या काही कथा वाचत गेल्या की मनावर खिñnतेचे सावट येते.
अंबरिष मिश्रांचा आणि साल्वाडोर दाली वरचा लेख वाचायचा राहिला.
विनय hardikaranche मी मी सोडल्यास hatkangalekaranvarcha लेख वाचनीय वाटला.

कालनिर्णय सांस्कृतिक

यात श्री म माट्यांच्या गीते वरील पुस्तकावर एक लेख आहे. त्यात गीतेत काय म्हटलंय, माटे काय म्हणतात , टिळक काय म्हणतात कशाचा कशाला पत्ता लागत नाही. हे तिघे काय म्हणतात ते सांगता सांगता लेखकाने स्वतःला काय वाटते तेही सांगितले आहे. गीतेतले श्लोक दिलेत , त्याचा अर्थ वाचकांना माहीत आहे किंवा समजेल असे गृहीत धरले आहे. गीतेवर वर्ग चालू आहे आणि सगळेजण ही तीनचार पुस्तके वाचून आले आहेत किंवा समोर ठेवून बसले आहेत, असे वाटले. फक्त चातुर्वर्णाबद्दलचे लेखकाचे मत मला आवडले.
ना मदार गोखल्यांबद्दलचा लेखही असाच.
राज खोसलांवरचा लेख म्हणजे त्यांची फिल्मोग्राफी तक्त्याऐवजी वाक्ये लिहून.
चिक चॉकलेट - सी रामचंद्र, ओ पी नय्यर, आर डी आदि संगीतकार म्युझिक अ‍ॅरेंजरनी केलेल्या रचना स्वतःच्या नावावर विकणारे मध्यस्थ (लेखकाने दुसरा काही तरी शब्द वापरला आहे) जयराज साळगावकरांचा हा लेख वाचून धन्य झालो.
रविमुकुल कुलकर्णींचा शान्ता शेळक्यांच्या वेगळ्या आठवणी सांगणारा लेख कचर्‍याच्या डब्यात टाकला तर तो डबा खराब होईल.
रवि आमलेंचा नूर इनायत खान वरचा लेख, सुभाष शहा या शृंगारकथा लेखकावरचा लेख आणि मायबोलीकर प्रभाकर करंदीकर यांचा भारतीय लोकशाहीवरचा लेख आवडले. नूर इनायत खान - आणखी विस्तार हवा होता. करंदीकरांच्या लेखनातील नागरिकत्व सुधारणा आणि कृषी विषयक कायद्यांविरोधातील आंदोलना बद्दलची मते पटली नाहीत. पण लेख बर्‍यापैकी संतुलित आणि परखड आहे.

पाककृती धन्य आहेत.
सुबोध जावडेकरांचा लेख वेळे अभावी वाचता आला नाही. बाकीचे वाचावेसे वाटले नाहीत.

आता सकाळ दिवाळी अंक आणला आहे.

रविमुकुल कुलकर्णींचा शान्ता शेळक्यांच्या वेगळ्या आठवणी सांगणारा लेख कचर्‍याच्या डब्यात टाकला तर तो डबा खराब होईल. <<< म्हणजे नेमके काय आहे त्यात? Happy

एबी पी माझा अंक चक्क छान आहे. वाचनीय आहे. अन्नपूर्णा शिखरावर चढाई, वर लेख आहे. प्लस जोशी मांगले तत्ववादी व अजून एकाचा असे चार लेख वाचनीय आहेत. ओव्हर ऑल छान आहे.

करंदीकरांच्या लेखनातील नागरिकत्व सुधारणा आणि कृषी विषयक कायद्यांविरोधातील आंदोलना बद्दलची मते पटली नाहीत. पण लेख बर्‍यापैकी संतुलित आणि परखड आहे.>> संतुलित, परखड तरी मते पटलेली नाहीत? झेपलं नाही.

एकंदरित लेख संतुलित , परखड.
दोन आंदोलनांबद्दलची मतं पटली नाहीत. बाकीच्या लेखाशी आणि त्यातल्या विचाराशी बव्हंशी सहमत.
त्या लेखात जनलोकपाल आंदोलनाचा उल्लेख आणि त्यावर टिप्पण्णी हवी होती.

https://www.ankninad.org/
अमेरिकेतून प्रसिद्ध होणारा जागतिक दिवाळी अंक>>> ह्या अंकात मायबोलीकर मोहना यांची "चॉम्प्ट" ही कथा/अनुभव छान लिहिला आहे. त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत.
प्रिया जोशी यांची एक चांगली कथा आहे. या लेखिका म्हणजे बहुतेक मायबोलीकर निमिता असाव्यात.
मला हा अंक चांगला, वाचनीय वाटला.

कुणी यंदाचा लोकप्रभेचा दिअं वाचला का? किंमत अवघी ५० रू. अप्रतीम जमून आला आहे अंक. गाथासप्तशतीवरचा लेख, संजीव जोशींची विज्ञानकथा, बचापोश ही तालीबानच्या अफगाणीस्तान ताब्यात घेण्याच्या पार्श्वभुमीवरील कथा, सुक्ष्मजीवांवरचा एक लेख आणि अकोला तालुक्यातील गुहावजा घरे यावरील लेख खुप आवडले. इतरही लिखाण दर्जेदार आहे. कित्येक वर्षांनी कस लावणारे शब्दकोडे सोडवले.

सकाळचा दिवाळी अंक म्हणजे शनिवार रविवार पुरवणीत छापायचे लेखन दिवाळी अंक म्हणून दिले आहे. काही लेख तर वृत्तपत्रीयच आहेत. दिवाळी अंका साठी म्हणून लेखन मागवलेले वाटत नाही.
मुखपृष्ठावरच्या तापसी पन्नूचे केस डोक्यावरून न्हाल्यानंतर टिपायच्या आधी फोटो काढल्यासारखे आहेत. कानात झुंबरं लटकवलीत.
दोन तीन लेख वाचले. बाकी काही वाचावेसे वाटत नाही.

वाचावा वाचलाच पाहिजे असा - व्यथाकथा सह्याद्रीची - डॉ माधव गाडगीळ

कुणी यंदाचा लोकप्रभेचा दिअं वाचला का? >>> हो वाचला..
छान जमून आलायं अंक..!
बचा पोष कथा वाचून खूपच सुन्न वाटलं..

मौज वाचायला घेतला. पैसे वसूल अंक आहे. विनय हर्डीकर मराठीतले थॉमस फ्रीडमन म्हणावेत का ?

Pages