पुण्यात बाणेर - बालेवाडी भागात शाळांबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by गोगो on 25 November, 2021 - 02:45

बालेवाडी बाणेर भागातील शाळांबद्दल माहिती हवी आहे. माझ्या लेकीसाठी इयत्ता ७वि मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. सध्या ICSE बोर्ड आहे. तेव्हा प्रेफरेन्स ICSE ला आहे पण चांगली शाळा असेल तर CBSE ला बदलून घ्यायला आमची हरकत नाही. सध्या ती विबग्योर मध्ये आहे (बंगलोर) पण management आणि टीचर्सच्या quality अनुभव इतका चांगला नाहि. विबग्योर च्या इतर ब्रॅंचेस बद्दलही असाच फीडबॅक मिळाला म्हणून इतर ऑपशन्स बघतो आहोत.
सध्या २री भाषा म्हणून फ्रेंच आणि ३री भाषा हिंदी आहे. मराठी (३री भाषा) करून घेऊ शकेन तिच्याकडून पण २री भाषा फ़्रेंच मिळाली तर उत्तम असा विचार आहे.
आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझी मुलगी Vidya valley मध्ये आहे .शाळा उत्तम आहे..कॅम्पस आणि बाकी infrastructure पण छान आहे .शाळेच्या बसेस आहेत.. service चांगली आहे..ICSE board आहे..फ्रेंच ऑप्शन पण आहे...बाणेर पासून जवळ आहे..
अजून काही माहिती हवी असेल तर जरूर विचारा

PICT school - Balewadi
Dhruv global school - sus Goan
Vidya valley - wakad branch (CBSE curriculum)
GIIS - near balewadi stadium
The orchid international school - Baner - mhalunge road

या शाळा सध्या पाषाण, वाकड, सुस बालेवाडी इ. भागांत trending आहेत. Vidya valley (sus- ICSE school ) तर आहेच पण अँडमिशन मिळणे थोडसं कठीण असते. (तुमच्या केस मधे नाही, in general म्हणते आहे मी ) . मी मुलांना admission साठी या बघितल्या होत्या.
Vibgyor ही आहे पण ऐकलेले रिव्ह्यू ५०%-५०% आहेत.

www. parentree.in फोरमवर शाळेची बरीच माहिती मिळते.

फ्रेंच 2री भाषा असली तरी प्रायव्हेट ट्यूशन लावा. कारण शाळेत नावालाच फॉरेन लँग्वेजेस असतात.
बरीच मुले हिंदी भाषा 2री आणि मराठी 3री अशी निवडतात. त्यांमुळे 2री भाषा फॉरेन असणारी मुले कमी असतात.

जरा वेगळ्या पद्धतीचे शिक्षण देणारी आणि IGCSE बोर्डाची शाळा चालणार असेल तर पाषाण-सूस रस्त्यावर असलेली DLRC ही शाळा बघू शकता. फ्रेंच भाषा शाळेत शिकवत नाहीत. पण ही शाळा विद्यार्थांना आणि पालकांना खूपच स्वातंत्र्य देते. फ्रेंच भाषा शिकायचीच असेल तर बाहेरून शिकण्याची सोय करता येऊ शकते. बाहेरील शिक्षकांनी देलेले मार्क DLRC शाळा वार्षिक निकालात सामावून घेते.

सोहा..बरोबर. आणि तशीच स्वधा नावाची देखील आहे शाळा. पाषाण मध्येच.
पण या केसमध्ये आता सातवीत हा change खूपच मोठा असेल..