(वीक एंड लिखाण. )
पाच सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक लांबलेली सायंकाळ. का माहीत नाही पण वेळ पुढे कसा तो सरकत नव्हता. जेवणे थोडे लवकर आटोपून झोपायची तयारी करत होतो. पण झोप येत नव्हती. बराच वेळ झोपेची आळवणी केली पण व्यर्थ! मग एक जुन्या हिंदी सिनेमाच्या गाण्याची सीडी लावली आणि ऐकत पडलो. एकाहून एक सरस गाणी होती त्या सीडीत. डोळे झाकून ऐकत असताना डोक्यात विचार घोळायला लागले. काय संगीताचे वैभव होते त्या काळी! खरे तर ते संगिताचे सुवर्ण युगच होते. "जाने कहां गये ओ लोग" हा विचार आला. एक तलत महेमूदचे गाणे ऐकताना एक हिंदी गाणे आठवले. "जमाने ने देखे जवां कैसे कैसे.एका गाण्याने माझे लक्ष जरा जास्तच वेधून घेतले. ते होते इचक दाना बिचक दाना. लता आणि मुकेशने हे गाणे गायले आहे. मुळातच गाणे अतिशय सुरेल आणि पडद्यावर नर्गिस आणि राजकपूर यांच्यावर फिल्म केलेले आहे. मै यादोंके गलियारोंमे खो गया. मला या गाण्यातील विशेष आवडलेले कडवे खाली देत आहे.
एक जानवर ऐसा जिसके
दुम पर पैसा
सर पे है ताज भी
बादशाह के जैसा
बादल देखे छम
छम नाचे अलबेला
मस्ताना इचक दाना
नर्गिस (शिक्षिका) मुलांना विचारते बोलो बोलो आणि मुले उत्तर देतात "मोर". याच प्रकारात मोडणारे अजून एक गाणे आठवले जे मेरा नाम जोकर या सिनेमात आशा भोसलेने गायलेले आहे. त्याचे पहिले कांही बोल असे आहेत.
तीतर के दो आगे तितर
तीतर के दो पीछे तीतर
आगे तितर पीछे तीतर
बोलो कितने तीतर
या नंतर माझ्या पाठ्यपुस्तकातील कविता आठवली. आज ज्यांचे वय साठ वर्षांच्या पुढे असेल त्यंना खालील कविता नक्कीच माहीत असेल.
चाक फिरवतो गरागरा
मडके करतो भराभरा
ओळखा पाहू मी कोण?
याचे उत्तर "कुंभार" आहे. या कवितेत त्यावेळी दैनंदिन जीवनाशी निगडीत सर्व कलाकार (आर्टीजन्स) होते; जसे की लोहार, सुतार वगैरे वगैरे. आता या सर्व गोष्टी काळाच्या पडद्याआड लुप्त झाल्या आहेत. हे जुने संदर्भ हल्लीच्या पिढीतील मुलांना माहीत पण नसतील कदाचित. उदाहरणार्थ, जुन्या काळी लहान मुलांना भोवरा गावातील सुतार बनवून देई. आता प्लॅस्टीकचे भोवरे विकत मिळतात. मुलांना कसे माहीत असणार भोवरे सुतार बनवत होते.
याच कवितेपासून प्रेरणा घेऊन अशीच कोडी असलेली एक रचना तयार केली आहे. या रचनेत सध्याचे संदर्भ असल्यामुळे कविता थोडी खोचक वाटेल कदाचित. कोणालाही दुखवायचा उद्देश नाही. बघा कशी वाटते ती आणि उत्तरे ओळखायचा प्रयत्न करा. ही परिक्षा नसून एक छंद म्हणून आहे केवळ. ही कविता फेब्रुवारी २०१४ मध्ये रचलेली आहे' त्या वेळची राजकीय परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून वाचा म्हणजे नीट संदर्भ लागतील.
१)
उच्च पदावर असून, साधा
कडक जॅकेट, निळसर पगडी
मूग गिळोनी निमूट बघतो
भ्राष्टाचारी, अनेक लफडी
अर्थतज्ञ मी असून सुध्दा
देश लागलाय देशोधडी
परवानगीविना बोलू कसे?
म्हणून पाळत असतो मौन
ओळखा पाहू मी कोण?
२)
नसताना पद, सत्ता माझी
राजघराण्याचा मी वारस
शहजादा म्हणणार्यासाठी
माझ्या मनात आहे आकस
मंत्री, संत्री खिशात माझ्या
चमचे, चमचे अन् चमचे बस!
सारे माझी ओढतात री SSS
वर्तुळास म्हणता चौकोन
ओळखा पाहू मी कोण?
३)
महाग करतो सालोसाली
कांदे आणि खूप कमवतो
बिल्डर लॉबी, साखार धंदे
शिक्षणक्षेत्री चित्त रमवतो
पंतप्रधानाच्या गादीचे
रात्रंदिन मी स्वप्न पाहतो
माझी कन्या, माझा पुतण्या
बाकी सारे दिसते गौण
ओळखा पाहू मी कोण?
४)
मुलगा माझा पिता म्हणेना
संबोधत असतो "नेताजी"
राज्यामध्ये असून काशी
मजला प्यारे मुल्ला, काझी
दिल्लीश्वरचे अपेंंडिक्स मी
सदैव त्यांची करतो "हां जी!
"मते मिळवण्या करेन अनुनय
दहशतवादी माझा झोन
ओळखा पाहू मी कोण?
5)
रुसतो, फुगतो, त्रागा करतो
वय झाले हे विसरुन जातो
अहंभाव उत्तुंग एवढा!
पक्ष कसपटासमान दिसतो
चुचकाराया नेते येती
कमळालाही तुच्छ लेखतो
सुतासारखा सरळ वागतो
नागपूरहून येता फोन
ओळखा पाहू मी कोण?
उत्तरे शोधण्यासाठी डोके खाजवा. सापडली उत्तरे तरीही प्रतिसादात उत्तरे सांगू नका.
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो क्र. ९८९०७ ९९०२३
सर्व उत्तरे सापडली. मजा आली.
सर्व उत्तरे सापडली. मजा आली.
मजा आली. >> +९९
मजा आली. >> +९९
अनाजीपंत ना..?? सहज ओळखू येते
अनाजीपणतू ना..?? सहज ओळखू येते वाचता वाचताच
निवडणुका आल्यावरती पुलवामा,
निवडणुका आल्यावरती पुलवामा, दंगे घडती देशात
मी मात्र निवांत फिरत राहतो परदेशात
बेरोजगारी, महागाई, चीन , इंधनदर हे शब्द ऐकताच मुग गिळून बसतो
बढाया मारायची खूप सवय मला एक काम धडाचे मी करत नसतो
ज्यावेळी करोनाने गोरगरीब तडफडून स्म्शानात अहोरात्र जळतो
त्यावेळी अडाणी-अंबानी यांची घरभरणी कराया मी वर्षभर झिजतो
चमकोगिरी आणि चमच्यांची भारी मौज मला वाटत असते
देश आणि जनता गेले खड्यात तरी फिकीर मला नसते
ओळखा पाहू मी कोण?
जिद्दु, अहो असे लिहिलं तर
जिद्दु, अहो हे असं काहीबाही लिहिलं तर पणतुंना फार राग येतो हां..!! ते मग कारस्थाने करतात..!!
पाऊस लई होता मोठा
पाऊस लई होता मोठा
म्हणून झोपड्यांमध्ये जाऊन घेतला आसरा
समिर रावा च नावं घेते
दाऊद माझा सासरा
ओळखा पाहू कोण?
जिसको भी मैने मारी मिठी
जिसको भी मैने मारी मिठी
जिसको भी मैने मारी मिठी
.
.
.
उसकी किस्मत फूटी!
झालो होतो मी तडीपार
झालो होतो मी तडीपार
डोक्यावर केस नाहीत शिल्लक चार
बोलता येईना आत्मनिर्भर
माझी खासियत घोडेबाजार
बोलाचा भात अन् बोलाचीच कढी
बोलाचा भात अन् बोलाचीच कढी
मी करितो निंदा कडी
टक्कल माझे चमके
टक्कल माझे चमके
जसे गुलाब जाम
नाव शहरांचे बदलणे
हेचि माझे काम
दहशतवादी असल्याच्या माझ्यावर
दहशतवादी असल्याच्या माझ्यावर शिक्का
कोर्टात खेटे मारताना द्या माझ्या व्हीलचेअर ला धक्का
कोर्टाबाहेर खेळते बास्केटबॉल गरबा कबड्डी
स्त्री पुरुष संसारापासून कोसो दूर आहे मी ..... साध्वी
(No subject)
सोडली मी बायको
सोडली मी बायको
सोडली भावंडे अन् आई
नोटबंदी, जी.एस. टी. , इंधन दरवाढ
वाढवून ठेवली मी महागाई..
आठ हजार कोटींचे विमान माझ्या दावणीला
समस्त महामूर्ख भारतीय जनतेला लावले भिकेला
आम्हा दोघांच्या नावात
आम्हा दोघांच्या नावात
फुले आणि फळे
लोक म्हणे आम्हा
चंपा नी टरबुजे
देशपांडे, हा धागा राजकारणात
देशपांडे, हा धागा राजकारणात हलवा.
मी एक फकीर, घेऊन फिरतो झोळी
मी एक फकीर, घेऊन फिरतो झोळी
रंगा-बिल्ला नंतर माझीच एक नंबर टोळी
सोडली मी बायको पण सोडले नाहीत तिचे दागिने
दावणीला बांधले आहेत आयटी सेल चे शाने
- मी सोत्ता केली आहे. आमची प्रेरणा सामाजिक न्याय राज्यमंत्री
खाल्ली मी चिक्की
खाल्ली मी चिक्की
खाल्ले मी बंधारे
भगवान गडावर मी काहीही बरळते
माझा जयजयकार करारे..
नीच आदमी ओळखा पाहू कोण
नीच आदमी
ओळखा पाहू कोण
तमिल वानखेदे अतो वा क्लंती
तमिल वानखेदे अतो वा क्लंती लेडकल अतो
आमता पक्स कायम ठामपणे उभा लाहिल पाठीशी
तोडपानी कलायला येता
का लावू ईडी अन् सीबीआय तौकशी..?
अध्यक्ष महोदय मी दिसायला
अध्यक्ष महोदय मी दिसायला लंबोदर
बायकोला वाटते ती गाते अतिसुंदर
पहाटे उठून राजभवनात जाईन
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन
गावी कुत्रं विचारेना म्हणून
गावी कुत्रं विचारेना म्हणून आलो सासुरवाडीला
सासुरवाडीला मूर्ख माणसांनी केला माझा सत्कार
सरकारात भेट दिला तंबाखूचा बटवा
आता कुणीतरी मला छान नटवा
एसटीत बसवा अन् कोल्हापूरला पाठवा..
प्रतिसादाचा आणि प्रतिकाव्याचा
प्रतिसादाचा आणि प्रतिकाव्याचा श्रावण धो धो बरसला या धाग्यावर. मनापासून अभार सर्वांचे.
मस्त धमाल चालू आहे इथे.
मस्त धमाल चालू आहे इथे.

लेखातल्या गाण्यामुळे या चित्राची आठवण झाली.