पक्ष्यांवरील इंग्रजी कविता

Submitted by सामो on 24 September, 2019 - 17:26

सर्व फोटो नेटवरुन घेतलेले आहेत.
________________________________________________________
इंग्रजी भाषेतील पक्ष्यांच्या नावांचा गंधही नव्हता. लार्क, नाइटिंगेल या पक्ष्यांच्या कवितांच्य पुढे धाव गेलेली नव्हती पण "The bird-lovers anthology" हे दुर्मिळ, जुने पुस्तक ग्रंथालयात सापडले व नंतर मी ताबडतोब ते विकत घेतले. या पुस्तकातून इतके पक्षी, विविध ऋतुंमधील त्यांचे आगमन, लकबी, सवयी, त्यांची नावे मूड, अदा, गळा याचे वर्णन करणारा व मुख्य म्हणजे त्यांच्याबद्दलच्या वर्णनातीत सुंदर कवितांचा खजिनाच सापडला.माॅकिंग बर्ड, व्हीपुरविल, सॅंडपायपर, पाणबदक कॅटबर्ड, रॉबिन,चिकडी, रेन-क्रो अशा अनेक पक्ष्यांवरती तर कविता सापडल्याच पण घुबड, गिधाड, कावळा अशा भेसूर गाणाऱ्या/ सवयी असणाऱ्या पक्ष्यांवरही कविता लिहील्या जातात हे कळले. पक्ष्याची नावे कळली ज्यायोगे मी ते पक्षी गुगल करून शोधू शकले ते वेगळंच.
.
आता हा बोबोलिंक पक्षी - कसला गोड आवाज आहे ओह माय गॉड!
हा पक्षी जूनमध्ये दिसणारा हे कवितेतूनच कळले. याच्यावर एक मस्त कविता सापडली त्यातील "Brook of laughter" अर्थात या पक्ष्याला दिलेली हास्यझरा ही उपमा एकदम आवडून गेली. खळखळणारा हास्याचा झरा.

June's bridesman, poet o' the year,
Gladness on wings, the Boblink is here.
Half-hid in tip-top apple-blooms he swings,
Or climbs against the breeze with quiverin' wings,
or givin' way to't in a mock despair,
Runs down a brook o' laughter, through the air.
.
खालची घुबडावरची कविताच घ्याना. कविता म्हणजे दवणियता असेच काही नसते. ही नकारात्मक छटा असलेली कविता इतकी उत्कट आहे की वाचक तिच्या नकारात्मक जादूत ओढला जातो व पुढे पुढे वाचत जातो. कवितेचे नावाचा 'भयावह घुबड' आहे. याचे वर्णन लार्क या अतिशय गोड गाणाऱ्या पक्ष्याशी ३६ चा आकडा करणारा असे केलेले आहे. -
.
OWL SINISTER - Rose o'Neill
Ah, can you never still,
Unhealable complainer of the wounded will?
You Groan-in-the-dark,
You sobber of no shape,
And strong negation of the lark!
You wrong-recounter of no words !
Ape
Of lovely birds,
And hunchback of the singing breed!
You void! You, irremediable Need,
Make nothing of desire.
With long, cold, crying famine you put out the fire,
And esperances of the day rescind.
Eater of shadows! Ghoul and gullet of the wind!

.
यलो हॅमर
यलो हॅमर या पक्ष्याची रॅट-टॅट-टूट शीळ कविने कधीतरी लहानपणी ऐकलेली आहे. खरे तर कविच्या बालपणी, या शीळेने पहाटे त्याची झोपमोडच केलेली आहे. आणि तेव्हा जरी त्रासदायक वाटली असली तरी याच शीळेस आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे कारण परत जेव्हा जेव्हा कवि ही शीळ ऐकतो तेव्हा तेव्हा तो परत बालपणाच्या सुखद दिवसांची सफर करु शकतो, इतकी ती लहानपणीच्या दिवसांशी निगडीत आहे.

Yellow hammer's Rat-tat-too on the Orchard bough;
That's the sound that used to break through my
morning dreams;
Heighho! Heart of youth!when I hear it now,
Back again my boyhood comes; very near it seems.
.
गोल्डफिंच म्हणजे मला वाटतं हळद्या असावा का?.
गोल्डफिंच बद्दलची पुढील कविता बहारदार उपमा घेऊन येते. कविला वाटते आहे की एका मोठ्ठ सूर्यफूल ताठ उभे आहे, वाऱ्यावर डोलत आहे. या सूर्यफुलाच्या बिया टिपण्याकरता आलेले गोल्डफिंच पक्षी ही जणू सूर्यकिरणेच आहेत. आणि आता पक्ष्याच्या रूपात, ही सूर्यकिरणे जणू परत सूर्याच्या शोधात निघालेली आहेत.

now that the giant sunflowers rise
Along the garden way,
The shy goldfinches seeking seeds,
visit them through the day.
One fancies as one watches them
And hears their low refrain,
That they are sunbeams changed to birds,
That seek the sun again
- Elisabeth Scollard

.
नाइटिंगेल.
नाइटिंगेल शब्दातील नाईट म्हणजे रात्र व हा पक्षी रात्री गातो म्हणून त्याला नाइटिंगेल म्हणतात हे मला हे पुस्तक वाचून कळले. जांभळट केशरी अशी संध्याकाळ जगावर पसरत चाललेली आहे. वाहणाऱ्या नदीचा ध्वनी जणू बासरीसारखा मधुर असा कविस भासतो आहे. कुठे पर्वतावरून थंडगार झुळूक स्पर्शून जाते, अशा समयी, संध्येची पहीली चांदणी नभी उगविली की मग या आतापर्यंत मूक अशा या पक्ष्याला गोड कंठ फुटतो असे कवितेत येते.

on the crimson edge of the eve,
by the Berada's flute-like flow,
When the shadow-shuttles began to weave
And the mountain airs to blow,
with the sight of the eve's first star,
As though it were dumb too long,
There burst on the ears the wonderous bar
From a spirit dowered with song
- stephen crombie
.
वर्डसवर्थ ची या पक्ष्यावरची कविता तर प्रसिद्ध आहेच. या कवितेपुढे शब्दच थिटे आहेत. वर्डस्वर्थ वर्णन करतो - जणू काही नाइटिंगेलचे काळीज आगीचा कल्लोळ आहे, त्यात या पक्ष्याने, ईश्वरी सुरेचे आकंठ सुरापान करून, या शांत अशा रात्री टोकदार सुरेल लकेरी मुक्त कंठाने आसमंत भेदले आहे.
O NIGHTINGALE! thou surely art
A creature of a "fiery heart":--
These notes of thine--they pierce and pierce;
Tumultuous harmony and fierce!
Thou sing'st as if the God of wine
Had helped thee to a Valentine;
A song in mockery and despite
Of shades, and dews, and silent night;
And steady bliss, and all the loves
Now sleeping in these peaceful groves.
- Wordsworth

.
बॅलिओल रुक /सेबल रुक
बॅलिओल रुक/ सेबल रुक हा कावळ्यासारखा दिसणारा पक्षी दिसतोय.त्याचं वर्णनही एक राकट, विषमस्थितीत, हवामानातही तग धरुन रहाणारा पक्षी म्हणुन केलेल आहे. हा थंडी-वारा-पावसाने डळमळणार्‍या नाजूक पक्ष्यांपैकी नव्हे असेच कविंनी वर्णन केलेले आहे. जेव्हा वाऱ्याचा मारा होतो, झाडांच्या फांद्या पार झोडपून निघतात, तेव्हा हा सेबल रुक पक्षी झाडाच्या शेंड्यावरती झोक्याची मजा घेता असतो.

.
The rook sits high ,
when the blast sweeps by,
Right pleased with his wild see-saw;
And though hollow and bleak by the fierce wind's shriek,
It is mocked by his loud caw-caw
.
हमिंग बर्ड
मधुचुख्यावर तर इतक्या कविता आहेत आणि इतक्या सुंदर आहेत की सगळयाच इथे द्याव्याश्या वाटल्या पण त्यातील मला आवडलेली - कवि म्हणतो आहे, उदास वातावरणात, सुळकन सूर मारून काहीतरी झळकून जाते काय आहे ही जादू? हा तेजस्वी रत्नानी जडलेला, पक्षी आहे तरी कोण?

but fleetly across the gloom
This tremulous shape will dart,
for searching for some fresh bloom
To quiver about it's heart
Then you, by thoughts of it stirred,
will dreamily question them;
"Is it a gem half bird,
Or is it a bird half gem?"

ब्लॅकबर्ड.
या पक्ष्यावर एक एकदम उत्कट कविता आहे. त्याच्या शीळेने कविला जो आत्मिक आनंद मिळतो, अनिर्वचनिय सौंदर्याचा साक्षात्कार होतो त्याचे वर्णन या कवितेमध्ये केली आहे. ब्लॅकबर्ड ची शीळ ऐकताना, जणू कवीने आकाशालाच स्पर्श केलेला आहे. स्पर्शही कसा तर आकाशाच्या हृदयाचा ठोकाच कवीच्या हातात आलेला आहे. अनवट, मधुर आणि अनुपम, जिला उपमा नाही अशी ही शीळ म्हणजे जणू श्रीहरीचे मधुर बासरीचा. या गोड लकेरींमुळे कवीच्या आत्म्यालाच जणू भरारी घेण्याकरता,पंख मिळालेले आहेत.

A Blackbird Suddenly - Joseph Auslander
Heaven is in my hand, and I
Touched a heartbeat of the sky,
Hearing a blackbird cry.
Strange, beautiful, unquiet thing.
Lone flute of God, how can you sing
Winter to spring?
You have outdistanced every voice and word.
And given my spirit wings until it stirred
Like you a bird.
.
कॅटबर्ड
कॅटबर्ड चा मूळ आवाज कर्कश्य असावा असे या कवितेतून प्रतित होते. या कवितेत कवि म्हणतो की कशाला तू अन्य पक्ष्यांच्या आवाजाची भ्रष्ट नक्कल करत फिरतोस? आणि कवि या पक्ष्याला बरीच दूषणे देतो पण शेवटी मग कविलाच वाईट वाटते व तो म्हणतो, तुझी काहीही चूकी नाही रे, प्रत्येकजणच त्याच्या परीने पृथ्वीवरती संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. तू देखील अपवाद कसा असणार? तेव्हा तुझ्या कंठाळी आवाजाबद्दल दूषण देणे देणेही योग्य होणार नाही.

You who would with wonton art
Counterfeit another's part,
And with noisy utterance claim
Right to an ignoble name -
Inharmonious! - why must you
To a better self untrue
Gifted with the charm of song,
do the generous gift such wrong.
.
.
.
.
For the sake of those who love us,
For the sake of God above us,
Each and all should do their best
To make music for the rest
.
So I will no more reprove,
Though the chiding be in love:
uttering harsh rebuke to you,
That were inharmonious too

.
टेक्सासमध्ये हा पक्षी मी पाहीला आहे, इथे विस्कॉन्सिनमध्य्देखील. बहुधा सर्रास आढळणारा पक्षी असावा. पण जेव्हा नीरीक्षण केले होते तेव्हा दांडगटच्च वाटला होता. स्वारी नाजूक साजूक नव्हती. पुढील कविता वाचून तर खात्रीच पटली, जिच्यात याला मनमुक्त स्वच्छंद, आक्रमक असा खलनायक म्हटले आहे. आणि इतका वैट्ट वैट्ट असला तरी हा अप्रिय होऊच शकत नाही का तर तो इतका देखणा आहे की जणू निळ्या फुलांनाच पंख फुटले आहेत, अशा खल पण देखण्या पक्ष्याच्या प्रेमात आपण पडल्याशिवाय रहात नाही असे कवि नमूद करतो.
ही कविता मला फार आवडते. या पुस्तकातील, माझी सर्वात आवडती कविता म्हणालात तरी चालेल.

.
Villain among the birds is he,
A bold , bright rover, bad and free;
Yet not without such loveliness
As make the curse upon him less.
If Larkspur blossoms were a-wing,
If iris went adventuring,
Or on some morning we should see
Heaven bright blue chicory
Come drifting by, we would forgive
Some little sins and let them live!
.
ही अशीच अजून एक अफाट सुंदर कविता देते आहे. गोल्डन फाल्कन म्हणजे सोनेरी गरुडाबद्दल-
या शिकारी पक्ष्याच्या क्रौर्यावरती ही उत्कट कविता लिहीलेली आहे. वा! पक्ष्याचे क्रौर्य देखील कवितेचा विषय होऊ शकतो तर! त्याच्या रुपाचे वर्णन करताना कविने त्याच्या नख्यांना तलवारीची उपमा दिलेली आहे व डोळे जणू केसरीया रंगाच्या ज्वाळा आहेत असे म्हटले आहे. या कवितेचा, शेवटही प्रचंड क्रूर आहे - जगणारे जीव हे सुंदर असतात आणि सुंदर गोष्टी यांना मरण आलेच पाहीजे कारण देवाला सुंदर गोष्टी आवडतात. आहे कि नाही उफराटा न्याय. सोनेरी गरुड जणू सर्व गोंडस, सुंदर पक्ष्याना चिरस्थायी शांती देतो.

He sees the circle of the world
Alive with wings that he
Was born to rend; his eyes are stars
Of amber cruelty.
.
God lit the fire in his eyes
And bound swords on his feet,
God fanned the furnace of his heart
To everlasting heat
.
His two eyes take in all the sky,
East, West, North and South
Opposite as poles they burn
And death is in his mouth.
.
Death because his masters knew
That death is last and best
Because he gives to those he loves
The benison of rest
.
Golden, cruel word of God
Written on the sky!
Living things are lovely things,
And lovely things must die.
- Robert p Tristram Coffin

काही नाही तर या पुस्तकातून अनेकानेक पक्ष्यांची नावे कळली आणि मग गृहपाठ - प्रत्येक पक्षी गुगल करणे, त्यांचे आवज यु-ट्युबवरती ऐकणे असा क्रम सुरु झाला. मी तरी अनेक नावेच ऐकली नव्हती तर काय गुगल करायचे कळणार कसे? ओव्हन बर्ड, ओरिओल , थ्रॅशर, लिनेट , व्हाइट थ्रोट (याचा गळा शुभ्र असतो) हॉर्नड आऊल ,बीच बर्ड , सी बर्ड , हर्मिट, रॉबिन, वूड थ्रश , हेरॉन, ग्रॅकल . चिकडी अशी अनेक नावे कळली.
.
रॉबर्ट फ्रॉस्ट यांची ' अ मायनर बर्ड' ही तर इतकी गोड लहानशी कविता आहे. नितांत सुंदर संदेश शेवटच्या कडव्यात येतो. कविला सारखा एका पक्ष्याचा किलबिलाट ऐकू येतो आहे आणि कदाचित कवि लिहीत असेल किंवा एकाग्रतेने अभ्यास करत असे, काही का असेना, त्याची तंद्री भंग होते आहे. मग कवी टाळी वाजवुन, हातवारे करुन सारखा त्या पक्ष्याला उडवत आहे पण कितीही हाकला हा पक्षी परत हजर, परत किलबिल सुरुच. असे बराच वेळ चालल्यानंतर शेवटच्या कडव्यात शेवटी उपरती होऊन कवि म्हणतो, "शेवटी मला कळले की चूक त्या चिवचिवणार्‍या पक्ष्याची नसून, माझी होती. असं कोणच्याही काळजामधून उस्फुर्त फुटाणारं गाणं दाबुन टाकण्याचा प्रयत्न करणे हेच मुळी चूकीचे आणि क्रूर नाही का!

A Minor Bird - Robert Frost
I have wished a bird would fly away,
And not sing by my house all day;
Have clapped my hands at him from the door
When it seemed as if I could bear no more.
The fault must partly have been in me.
The bird was not to blame for his key.
And of course there must be something wrong
In wanting to silence any song.

"The Mourning Dove - W. W.christman" या कवितेमध्ये कवि त्याच्या लाडक्या पक्ष्याचे वर्णन करताना म्हणतो, गोड गळ्याचे अन्य अनेक पक्षी असतीलही, परंतु माझे हृदयच इअवल्याशा चोचीने टिपून घेऊ जाणतो तो पक्षी म्हणजे मौर्निंग डव्ह च. या पक्ष्याच्या शोकाकुल, आर्त कुजबुजसम आवाजाचे आकर्षण कविस वाटते असे दिसून येते. Mourning अर्थात शोकव्हिवळ या शब्दातच त्याच्या आवाजाचे वर्णन आहे.
.
Mourning Dove
Sweet is the Hermit's evening bell,
And sweet the mellow canticle
of the wood thrush;
but more I love The murmur of the Mourning Dove.
.
'Tis he awakes the vague unrest
That makes one wander East and West-
The fond fond bird, tender and true,
He'll take the very heart from you
.
O shirring wings! O trembling throat
That puts such heartbreak in a note!
All through the woodlands shadows dim,
My heart is glad to follow him
.
O soft an low -- but I'll no more
Over the ferny forest floor
At dawn or dusk to listen lest
He pluck the heart out of my breast

स्कार्लेट टॅन्जर वरील कवितांमध्ये एक नाही तर दोघा तीघा कविंनी या पक्ष्याला आगीच्या ठिणगीची, आगीचा लोळ जणू हिरवळीतून, झुडपांमधुन इतर-तितर जाताना दिसतो अशी उपमा दिलेली आहे. धन्य तो सुंदर पक्षी आणि धन्य ते कवि ज्यांना इतक्या सुंदर सुंदर उपमा सुचतात.
.
"On first having heard the skylark" ही Edna St Vincent Millay यांची सर्वोत्कट, उच्च कविता आहे. माझी ही अनेक लाडक्या कवितांपैकी अत्यंत लाडकी कविता आहे आणि ती मी पूर्णच देणार आहे कारण ती कविता वाचणे हा एक सर्वंकष अनुभव आहे. कवयत्रीने पहील्यांदा skylark चे सूर ऐकले आणि तिची अतिशय बेचैन अवस्था झाली कार पक्षी दिसत तर नव्हता पण सातत्याने त्याचे कोवळे सूर अतिशय गोड गाणे, कवयत्रीचे हृदय पार विदग्ध करुन टाकत होते, एखाद्या अणकुचीदार बाणासारखे हे सूर तिच्या काळजास भेदत होते. आणि या सुरावटींचा ती शोध घेत असताना, तिला हा "मर्त्य" पक्षी आकाशाच्या विशालतेवरती एखाद्या काळ्या ठिपक्यासारखा दिसला. आणि ती मटकन खाली बसली, तिच्या नेत्रांतून अश्रूपात होऊ लागला. झरझर अश्रू वाहू लागले. ही उत्कटता निव्वळ एका पक्ष्याच्या गाण्याकरता असे वाचकांच्या मनात येणे साहजिकच आहे, आणि तरीही हे लक्षात ठेवले पाहीजे की कलाकार, कवि, चित्रकार हे प्रतिमांमधुन आयुष्यावरचे भाष्य करतात. कदाचित कवयित्रीने आयुष्यातील पहील्या प्रेमाचे, किंवा पहील्या अपत्यप्राप्तीच्या आनंदाचे उत्कट वर्णन सुद्धा रूपकात्मक केले असण्याचा संभव आहे.

.

Skylark
Not knowing he rose from earth, not having seen him rise,
Not knowing the fallow furrow was his home, And that high wing untouchable, untainted,
A wing of earth with the warm loam,
Closely acquainted,
I shuddered at his cry and caught my heart.
Relentless out of heaven his sweet crying like a crystal
dart
Was launched against me, scanning the empty sky
I stood with thrown back head until the world reeled.
Still still he sped his unappeasable shafts against by
breast without a shield
He cried forever from his unseen throat
Between me and the sun.
He would not end his singing, he would not have done.
"Serene and pitiless note, whence whence are you?"
I cried "Alas these sorrows how fast they fall
Ay, me, beset by angels in unequal fight,
Alone high on the shaven downsurprised and not a
tree in sight!"
Even as I spoke he was revealed
Above me in the bright air,
A dark articulate atom in the dark enormous blue,
A mortal bird flying and singing in the morning there.
Even as I spoke, I spied him, and I knew
And called him by his name;
"Blithe spirit!" I cried Transfixed by more than
mortal spears
I fell; I lay among the foreign daisies pink and small,
And wept,
staining their innocent faces with
fast flowing tears.
.
"A bird sings at night" कवितेमध्ये कवि रात्री गाणार्‍या पक्ष्यास उद्देश्युन म्हणतो, "अरे बाबा, किती लवकर गातो आहेस, अजुन तर पहाट व्हायची आहे, सारी पृथ्वी निद्राधीन झालेली आहे. सुंदर आठवणींची मिरवणुक नेत्रांसमोरुन जाते आहे. सर्वाधिक प्रिय आठवण पालखीत बसून निघालेली आहे. आणि कुठे तू या "स्वप्नांच्या" दिमाखदार मिरवणुकीमध्ये व्यत्यय आणतोस बाबा!"
Consent to silence and a simple dark;
Permit the heart to lie within the breast
Unveiled before a hthosand memories,
And in parade salute the loveliest
.
Permit the heart unaltered by your singing,
To have within the dark it's pensive way.
Release the heart amid it's joys and sorrows
Untroubled by what angels have to say
.
Unhindered comes the dawn, and you may sing
Victorious and vocal to the light.
But now delay, and let the heart reverse
Time's sinister profile on the wall of night.

हॉर्नड आऊल या पक्ष्याचे राज्य रात्री सुरु होते. अशी वेळ की जेव्हा धीटुकल्यातील धीटुकला पक्षीही बाहेर पडण्यास कचरतो. त्यामुळे, घुबड जरी दिवसा ढोलीत कैद असले तरी त्याच्याबद्दल कीव वाटण्याचं तुम्हाला मुळीच कारण नाही कारण ते रात्रीचे अनभिषिक्त सम्राटपद गाजवते. खूप छान आहे ही कविता. विषय काय तर घुबड! : )
Horned owl
IN the hollow tree, in the old gray tower,
The spectral owl doth dwell;
Dull, hated, despised, in the sunshine hour,
But at dusk he ’s abroad and well!
Not a bird of the forest e’er mates with him;
All mock him outright by day;
But at night, when the woods grow still and dim,
The boldest will shrink away!
O, when the night falls, and roosts the fowl,
Then, then, is the reign of the hornèd owl!

.
.
.

Mourn not for the owl, nor his gloomy plight!
The owl hath his share of good:
If a prisoner he be in the broad daylight,
He is lord in the dark greenwood!
Nor lonely the bird, nor his ghastly mate,
They are each unto each a pride;
Thrice fonder, perhaps, since a strange, dark fate
Hath rent them from all beside!
So, when the night falls, and dogs do howl,
Sing, ho! for the reign of the hornèd owl!
We know not alway
Who are kings by day,
But the king of the night is the bold brown owl!

खूप खूप कविता आहेत या पुस्तकात आणि एकेक कविता म्हणजे अक्षरक्ष: रत्न आहे. दुर्मिळ, जुने पुस्तक आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उच्च सुंदर लेख ! मला 2-3 दिवस दिसत होता पण कविता आहेत म्हणुन फुरसदीत वाचायला ठेवला होता.
सामो, धन्यवाद! खुप छान पुस्तक ओळख करून दिली आहेस. तुझा लेख तर निवडक 10 त ठेवला आहेच, पण पुस्तकही मिळवुन संग्रहात ठेवायला आवडेल.
खरं तर या कवितांशी संबंध नाही तरी मला पद्मा गोळे यांची 'आकाशवेडी' कविता आठवली.

आकाशवेडी

मी एक पक्षीण आकाशवेडी
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणातळी.

स्वप्नात माझ्या उषा तेवते
अन निशा गात हाकारीते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय नीडांतुनी
अन विजा खेळती मत्त पंखातुनी.

अशी झेप घ्यावी, असे सूर गावे
घुसावे ढगामाजी बाणापरी,
ढगांचे अबोली भुरे केशरी रंग
माखुनी घ्यावेत पंखांवरी.

गुजे आरुणी जाणुनी त्या उषेशी
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारिते काय वीणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर.

किती उंच जाईन, पोचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी,
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी.

- पद्मा गोळे

धन्यवाद मीरा.
आय होप तुला ते पुस्तक सापडेल.
पद्मा गोळे यांची मला आवडणारी कविता आहे ही. शिवाय शांता शेळके यांची धीवर वरची कविता गं.

खंड्या (धीवर पक्षी)

तळ्याकाठी गाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड.
झाडावर धीवराची,
हाले चोच लाल जाड.

शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफ़ा यावा फ़ुली.
पंख जणू थंडीमध्ये,
बंडी घाली आमसुली.

जांभळाचे तुझे डोळे,
तुझी बोटे जास्वंदीची.
आणि छोटी अखेरची
पिसे जवस फुलांची.

गड्या पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना,
नको मारू मात्र मासा

आज किशोरचा १९७५-मे चा अंक चाळताना, प्रकाश गोळे यांचा एक लेख सापडला. त्यात बर्‍याच पक्ष्यांची, झाडांची नावे मिळाली. मग एक एक गुगलवरती शोधत बसले होते. पैकी हा शिपाई बुलबुल -
प्रकाशचित्र साभार - https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4...

https://lh3.googleusercontent.com/pw/AMWts8BTJYg_OueaZBidLLWAwlDTX_nB0pAY_fAlc495YQfXHic8NkqG-MNWUZU1KzuT8_26sXYxN-m7mjFTKnK8QsdAGe51qZXPKStbB6MKFQT4wriTtxmGlK8LxCLJiXwjluLsH2zel9EjawEFiIjRW8jzoA=w800-h590-no?authuser=0

लाल बुड्या बुलबुलहून हा जरा वेगळा आहे. काळा तुरा व डोळ्याकडील रंग.
------------------------
बंटिंग पक्षी सुद्धा खूप पाहीलेला आहे - https://en.wikipedia.org/wiki/Bunting_(bird)
--------------------
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Silk%20Cotton%20Tree.html - ही काटेसावर. माहीत नव्हते. भारतात हे झाड पाहील्याचे स्मरते.
https://lh3.googleusercontent.com/pw/AMWts8C4Fc1so9627BTztTtoDQbzL-RfuqSqtWLcMqmGRDBjvxnOg53HmzjfbzmbSfdvZ_jGiRXp7OE43fZbcqk-d8xMxFHc9bBowK6VfoWv_2aQ91ozIOCY-ccuOicKW2YAEy0j0RtMZdRCCGJBvNSmLCfkqA=w600-h449-no?authuser=0
------------------------
कॅशिआ म्हणजेच बहावा का?

Pages