माझ्या आठवणीतील मायबोली - अरूण

Submitted by अरूण on 21 September, 2021 - 14:47

आज माबोला २५ वर्ष झाली आहेत, त्यानिमित्ताने आठवणींना उजाळा देण्याचा माझा हा एक प्रयत्न.

नक्की सांगायचे झाले तर जानेवारी २००३ मध्ये मी मायबोली जॉईन केली. त्यावेळी ऑफीसात काम कमी आणि वेळ जास्त असल्यामुळे बराच वेळ मायबोलीवर पडीक असायचो. अर्थात फार काही लिखाण करता येईल असं काही नसल्यामुळे केवळ टीपी चालू असायचा.
पण हा टीपी करायला सुद्धा बरीच जणं असायची. USPJ हा मुख्य ग्रुप होता. कधी कधी इतक्या वेगात तिथे पोस्टी पडायच्या, की अ‍ॅडमिन तिथे येऊन शिक्षा करण्याची धमकी देऊन जायचे आणि एकदा तर ती धमकी खरी करून दाखवली होती. त्या शिक्षेच्या काळातच बाकीची मायबोली वाचून झाली. तेंव्हा V&C ग्रुपवर बर्‍याच चर्चा व्हायच्या, पण त्यात भाग घ्यायच्या ऐवजी माझा सहभाग फक्त वाचण्यापुरताच राहिला.
नाही म्हणायला एका ग्रुपवर मी बर्‍यापैकी लिहिलं (आणि बर्‍यापैकी शिव्या खाल्या) तो म्हणजे ‘पुण्यातले पुणेकर‘ आणि शिव्या खाल्ल्या, कारण माझी ४० पानी ….. Happy

जुन्या मेंब्रांपैकी USPJ वरचे आठवतायत ते म्हणजे असामी, वेलदोडा, केड्या, नात्या, सँडीजी, योगीबेअर, मै, सशल, स्टोरवी, हह आणि खुद्द अ‍ॅडमिन. यापैकी बर्‍याच जणांना मै च्या घरी प्रत्यक्ष भेटीचा योग पण आला. ते माझे पहिले गटग.
आणि मग २००४ मध्ये पुण्यात आल्यावर तर अजुन बरेच मित्र / मैत्रिणी मिळाल्या मला इथे मायबोलीवर. मया, रुमा, मिल्या, पूनम, अथक, गंधार, राकु, हिम्या, साज्या, राम, केप्या, संकल्प, श्रद्धा, सुशान्त, मीनू, अतूल, मंजुडी, प्राची …. ही लिस्ट खूप मोठी आहे. या काळातच मला मायबोलीच्या बर्‍याच उपक्रमांमध्ये भाग घेता आला.

पुण्यात आल्यावर सगळ्यात पहिली भेट झाली ती सई, गंधार, अंबर आणि नीधपची. ते माझे पुण्यातले पहिले गटग. त्यानंतर गटग ठरवायच्या आणि प्रत्यक्ष आयोजन करण्यासाठी बर्‍याच माबोकरांना भेटलो. सलग काही वर्षं गटग संयोजनात थोडाफार सहभाग घेता आला.
नंतर नंतर गटग ला जाता आलं नाही, तरी बर्‍यापैकी माबोकरांच्या संपर्कात आहे. पुण्यात असताना रविवारी वैशली आणि ‘बुधवार’ साजरा करण्याच्या निमित्ताने माबोकरांना भेटता आले.

सध्या मायबोलीवर फक्त वाचनमात्रेच असतो, राजकीय चर्चा वगळता मुख्यता प्रवासवर्णन आणि काही निवडक लेखकांचे लिखाण आवर्जून वाचले जाते. पण मुख्य म्हणजे, मायबोलीवर ओळख झालेल्या या जुन्या मित्रांच्या काँटॅक्ट मध्ये आहे, पण मायबोलीबाहेर. असं खर म्हणजे व्हायला नको, पण आहे खरं असं.
तर अशा तर्‍हेने मायबोलीमुळे मला अनेक मित्र / मैत्रिणी मिळाले. त्यातील काही अजून माबोवर आहेत, काही जणं नाहीत, पण तरीसुद्धा, जेंव्हा जेंव्हा आम्ही भेटतो किंवा सोमीवर भेटतो तेंव्हा तेंव्हा माबोचीच चर्चा जास्त होते.

असो. फार काही जास्त लिहिता येत नाही मला, त्यामुळे इथेच थांबतो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरेच्या किती लवकर आवरतं घेतलंस! Happy मी तुला पहिल्यांदा शिकागो ला भेटले होते. एकदा ट्युलिप फेस्ट ला आणि एकदा माझ्या घरी गट्ग झाले तेव्हा.
यूएस मधील पुणेकर वर फास्ट पोस्टी आणि अ‍ॅडमिन ची "शिक्षा" हे आत्ता आठवलं .

मायबोलीवर ओळख झालेल्या या जुन्या मित्रांच्या काँटॅक्ट मध्ये आहे, पण मायबोलीबाहेर. असं खर म्हणजे व्हायला नको, पण आहे खरं असं. >>> +१ सेम हिअर.

बाकी लहान लेखाच्या कॉमेण्ट्सशी सहमत. चाळीस पानी ची चर्चाच मी नुसती ऐकली. त्यात काही मालमसाला असेल तर तो लिही इथे Happy

मात्र "बुधवार" चा उल्लेख असलेल्या या पहिल्याच आठवणी असतील. मीही एकदोनदा आलेलो आहे. एकदा शांग्रिला मधे व एकदा नव्या पेठेत कोणत्यातरी रेस्टॉ मधे. ही दोन तरी नक्कीच आठवतात. बाकी जुन्या माबोची वर्णने नवीन आहेत. वरचे अनेक आयडी माहीत नाहीत. बाय द वे तू २००४ च्या आधी कोठे होतास? एकदम २००४ ला पुण्यात येण्याचा उल्लेख आहे. असे एकदम एखाद्या ठिकाणी येण्याचे उल्लेख कोकणातील कथांमधल्या गावांच्या मूळ पुरूषांचे वगैरे असतात Happy

खुलासा: "बुधवार" हे बुधवारी होणार्‍या गटगबद्दल आहे. कोणत्याही पेठेबद्दल नाही.

चांगली आठवण
या उपक्रमा निमित्ताने अनेक आयडी लिहिते झाले हे विशेष वाटते.

छान मनोगत पण फार लवकर संपवले असे वाटले. तुमच्याकडे लिहीण्यासांगण्यासारखे बरेच असणार हे नक्कीच. हात आखडता घेतलात लिहीताना असे वाटतेय

अभिप्रायांबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपुर्वक आभार. Happy

आता नी च्या सजेशन प्रमाणे ४० परिच्छेद येतील अशी भीती घालू का? :

But on a serious note, नाही लिहू शकलो जास्त. बरेचसे संदर्भ आले नाहियेत इथे, जसे की अआ, ववि संयोजन इत्यादी. पण ते परत कधीतरी.