बसमधले विचार

Submitted by सामो on 13 September, 2021 - 00:27

------------------------------------------------------- अन्यत्र प्रकाशित ------------------------------------------------------------------
काही वर्षांपूर्वी स्ट्रीमींग थॉट्स- कागदावर उतरविण्याचा तेव्हा मला तरी अभिनव असलेला प्रयोग सन्जोपरावांनी केला होता. अतिशय आवडलेला. त्याच धर्तीवर, आज बसमध्ये जे काही विचार मनात आले ते उतरवून काढत आहे. काही अतिवैयक्तिक विचारांना कात्री लावून पण प्रांजळपणे मांडत आहे. अगदी भारताकरता "इंडिया" हा शब्द मनात येण्यापासून. अन अंगठीकरता "रिंग".
___
आला हा केसाचं टोपलं वाला काळा. कंगवाही केसातच अडकवतो. ह्म्म यांना निग्रो नाही म्हणायचं, तो गुन्हा आहे. नाही काय फ्युचर आहे इतकं टोपलं केस असलेल्या माणसाच? : ( का नाही? सत्यसाईबाबांचं नव्हतं टोपलं? त्यांनी घडवलच की त्यांचं फ्युचर. पण ते विभूती होते. होते का? असणारच आयुष्यभरचं ढोंग कसं शक्य आहे .
..
ही फुंकाडी, पण हिचे हात कसले नाजूक आहेत. एकच नाजूक रिंग घातलेय डाव्या हातात. इथे इतकी नाजूक रिंग पहायला मिळणं विरळच. बोटं लांबसडक आहेत वा!!नाहीतर आपण नखं खाऊन वाट लावलीये. खरच सुंदर आहेत बोटं.
..
खोकला का हा नीळं विंड्चीटरवाला परत? याला इबोला असावा की काय? ए बाबा मला भारतात जाऊन येऊ दे मग काय इबोला व्हायचाय तो होवो. खरच? रियली? मग होऊ देत? तसं नाही म्हणायचं मला ... एनीवे
..
ही रेडनेक रोज उजवीकडे बसते ती आज डावीकडे कशी? रेडनेक नाही हां बिचारी कष्टाळू वाटते. हिच्या जागेवर नवीनच कोणीतरी बसलय. असो.
..
रेल्वे लाइन आली. ए बघ बाबा गाडी येत नाही ना, उगाच टक्कर व्हायची. मला इंडियाला जाऊन येऊ द्या बाबांनो.
..
एकवीरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यावरी
गाणं बेफाम रुंजी घालतय सकाळपासून. फुलाचा सुगंध दाटावा तसं हे गाणं दाटून राहीलय मनात. वा वा! या विचाराकरता तरी आज लेख लिहायला हवा.
..
एकवीरा आई तू डोंगरावरी
.
परवा रडणारी, मध्यमवयीन उतरली उतरली. गॉड ब्लेस हर. खरच गॉ-ड ब्ले-स ह-र.
..
झोप फार येतेय. ह्म्म कॉफी नाही झाली आज अजून. किम चा शॅक एव्हाना उघडला असेल. बरं झालं बुवा तिच्या मुलीला स्क्रीनींग मध्ये कॅन्सर सापडला नाही. असो..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.... नेहमीच बस ने प्रवास करणार्‍या मला तरी हा लेख खूप रिलेट झाला अन अगदी नाविन्यपुर्ण वाटला. या लेखनप्रकाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...!! Bw

शर्मिला, मृ, DJ. - धन्यवाद
लहानसा प्रवास होता २०-२५ मिनीटांचा अ‍ॅट द मोस्ट त्यामुळे कमी विचार सापडले. पण असे विचार लिहायला खरच हवेत, बरच लेखन साहित्य सापडतं. Happy

अमेरीकेत असताना, ऑफीसला जाताना ट्रेन आणि बस घेताना, हा माझा विरम्गुळा असायचा. रोज तेच चेहरे न्याहाळायचे.
ऑफ्फीसच्या बसमध्ये, एक माणूस नेहमीच अनायसे माझ्या समोरच्या सीटवर बसायचा. नेहमी बसला खुर्चीत की, तो पुर्ण सफेद पांढरा ब्रेड , त्याला एका स्लाईसला लावलेला कमीत कमी २ इम्च जाडीचा जॅम आणि पीनट बटर दुसर्‍या साईसला असं सँडविच खायला लागायचा. मग ती मोठी काळी कॉफी भरलेला ट्रॅवल कप बॅगेतून काढून प्यायचा.
पुर्ण प्रवासात फक्त हसायचा, हाय बोलायला सुद्धा तोंड उघडायचा नाही. मग त्याचा स्टोप येइपर्यंत झोपायचा.
माझे तेच तेच विचार असायचे, त्याचे ते रोज न चुकता पीबी़जे खाणे व कॉफी पिणे.
मला वाटायचे, रोज फक्त हा हेच कसे खातो? मला आवडते, पीबीजे पण सकाळी सकाळी, इतकं गोड जॅम आणि पीनट बटर .... नो नो वाटायचं.
आणि, सफेद ब्रेड सुद्धा मी खाणं सोडलं असल्यामुळे वाटायचं मी ओरडून त्याला सांगावं, अरे बाबा तो सफेद ब्रेड कमी खा. Happy

बरं, तो माझ्याच ऑफीसमध्ये काम करायचा , पण वेगळ्या बिल्डिंगमध्ये... काय म्हणून कामाला होता माहित नाही. असो.
असे बरेच चेहरे न्याहाळत प्रवास व्हायचा.

माझ्या , त्या बसमधल्या व ट्रेनमध्ल्या प्रवासाची जर डायरी लिहिली असती तर भारीच गंमतीदार असती.
माझ्या बाजूला, सीटवर कोण बसतं ह्याचही मला टेंन्शन असायचं; कारण काहींच्या अंगाला यायचा घाण वास. आणि पारोसे चेहरे नकोसे वाटायचे. खास करून आपण स्वच्छ अंघोळ करून नवीन ड्रेस घालून जातो. न्युयॉर्क मध्ये तर सबवे किळसवाणे असायचे.

बर्‍याच मुली, पुर्ण प्रवासात चेहर्‍याची अशी काय रंगरंगोटी करून घेत, की उतरताना त्याच का? असे वाटेल.

किती सुंदर.... फारच रीलेट झाल. एक काळी माझा दीड तास प्रवास असायचा बसचा. पुस्तक होईल एवढे किस्से.

छान

ईंटरेस्टींग आहे... ट्रेन चालू झाल्या तर हे ट्राय करेन. तेव्हाच वा त्या त्या दिवशीच हे विचार लिहिण्यात मजा आहे.

मस्त आहे कल्पना.... मी पण सतत माणसांचं निरीक्षण करत असते बाहेर गेल्यावर......
असे विचार लिहून बघावे म्हणते, विचारांचं घोडं कुठून कुठे धावतं, तेही समजेल.

ऋन्मेष, माऊमैय्या लवकर लवकर लिहा. खरं तर बस कशाला. माबो चाळताना म्हणजे धागे व लेखक वाचतानाही आपल्या मनात विचार येतातच की Wink मग वाट कसली बघताय? उचला लेखणी.

मस्तच आहे. प्रवासात भारी भारी कल्पना डोक्यात येतात हे खरंच आहे. प्रत्येक माणसाला बघून काहीतरी वाटतंच.
वरचं सगळं वाचताना मला अगंबाई अरेच्चा १ आठवला. उगाचच. पण वाचताना सगळं त्याच टोनमधे वाचलं मी आणि मज्जा आली.

खरच छान वाटला हा लेखन-प्रवास.. प्रवास म्हटला कि कितीतरी चेहरे अन त्यांच्यानुरुप विचार- प्रसंग प्रत्यक्ष घडत असतात.. त्यांची गुंफण हि अशी शब्दात मांडणं..वेगळीच कल्पना..