शशक पूर्ण करा २ - 'मुंबई-पुणे नॉनस्टॉप' - मी अश्विनी

Submitted by मी अश्विनी on 20 September, 2021 - 12:19

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि बिनाड्रायवरचे फिरणारे स्टिअरिंग बघून काळजाचा ठोका क्षणभर चुकला.
हुश्श! ह्या बिनाड्रायवरच्या ऑटोपायलट टॅक्सी ना! मला कधी सवय होणार ह्यांची देव जाणे!
पण भलतेच आवडले बुवा हे प्रकरण! एअरपोर्टवरून पुणे नॉनस्टॉप!
अ‍ॅपवर पुण्याचे डेस्टिनेशन टाका, मनासारखे गाणे लावा, टेंपरेचर बदला! अहाहा! - सो डॅम-कूल धिस थिंग ईज!
आरशातून ड्रायवरची वखवखलेली नजर झेलणे नको की मुद्दाम लावलेले 'होंठो से छुलो तुम' ऐकणे नको.
हे टाईट जॅकेट काढून ऐसपैस बसावे, आताशी कुठे खंडाळ्याचा घाट......
छ्या! आता कुणाचा मॅसेज!
Unknown Number
'Darling, lose the top too!'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छाने Lol

Thank you!

कल्पक...

Thanks.

हे शशक आधी कळले नव्हते. आधी वाटले कोणीतरी पिपिंग टॉम आहे Wink तिच्यावर लक्ष ठेउन असलेला. आणि धस्स झालेले. Happy
सुपर्ब कलाटणी आहे.