शशक पूर्ण करा ----- वामकुक्षी -------- माऊमैया

Submitted by माऊमैया on 20 September, 2021 - 10:29

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
'कसला आवाज? आत्ता तर कुठे डोळा लागला होता.' ती मनातल्या मनात बोलली.
' एवढ्या पावसात , दुपारी अंगावर पांघरूण घेऊन झोपण्यात कसली मज्जा असते ! शाळेत असताना बऱ्याचदा आम्ही हेच करायचो.'
' ओ मॅडम, पण लग्न झालंय आता आपलं. आठवडाच झालाय. सासूबाईंना काही दुपारी झोपायची सवय नाही. त्यामुळे मलाही मनसोक्त लोळता येत नाही. उगाच अपराधी वाटतं, तरीच मनाला हुरहूर लागलीय.'
' आता उठावंच लागेल. ' तिने डोळे उघडले.
आजूबाजूला बघून हसूच आलं आणि हुश्श पण झालं.

हनिमून रिसॉर्टची रुम न्याहाळत ती नवऱ्याच्या कुशीत शिरली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह..!!

सही ! . गोड ! .
जुने दिवस आठवले.
साबा-साबु दूपारी झोपत नाही म्हणून अपराधी भावनेने मीही विकांताला नुसती सोफ्यावर काहितरी वाचत नाहीतरी टीवी बघत बसायचे .
आता निर्ढावलेय .. बिन्धास्त झोप काढते एक .

मस्त!
दुपारी अंगावर पांघरुण घेऊन असं पाहिजे ना?

खूप खूप धन्यवाद सर्वांना.....
हे माझे पहिलंच कथालेखन. ( त्यात पुन्हा शशक ) .
खरंतर हा स्वानुभवच आहे. मी पण क्षणभर दचकून जागी झाले होते तेव्हा. बाहेर पाऊसही होता. त्यामुळे ही शशकची सुरुवात वाचून तीच आठवण झाली होती.
इतके दिवस लिहू की नको, चालू होतं. शिवाय १०० शब्दांची मर्यादा. पण डोक्यातला किडा शांत बसू देईना.
माझी हौस म्हणून लिहिलं. पण इतके छान प्रतिसाद येतील, असं वाटलं नव्हतं. खूप भारी वाटलं.

दुपारी अंगावर पांघरुण घेऊन असं पाहिजे ना?>>>>> बदल केला आहे, वावे. धन्यवाद.