शशक पूर्ण करा - शूर - मुग्धमानसी

Submitted by मुग्धमानसी on 17 September, 2021 - 02:03

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो आणि ’ईssssssss' किंचाळत आम्ही सारे पसार होतो. पिंट्या कपाटावर चढून बसतो, मनी खिडकीच्या गजांना लटकते आणि मी थेट घराबाहेरच धावते!
पण बाथरूम मधून बाहेर पडलेल्या बाबांच्या चेहर्यावर विजयी भाव! युद्धातल्या शूरासारखं ते प्लास्टिकच्या पिशवीतला मेलेला उंदीर हातात उंच धरून सगळ्यांना दाखवतात आणि आम्ही सारे पुन्हा जमिनीवर येतो. बाबा किती शूर!

उंदिर घराबाहेर फेकून बाबा परततात आणि घाम पुसत हळूच आईला विचारतात - ’दरवाजाला बाहेरून कडी तू लावलीस ना टवळे?’

आई गालात खुदूखुदू हसताना मीच पाहिली. कुण्णाला सांगितलं नाही.

Group content visibility: 
Use group defaults

भारी! Lol

डबल पोस्ट

Rofl

असा किस्सा एकदा घडला होता माझ्या घरात. किचनमधे उंदीर, मी तर बै किचन ओट्यावर चढून बसले होते नवर्याने त्याला बाहेर घालवेपर्यंत.

हा , हा मस्तच !! माझ्याही डोक्यात उंदीर ऐवजी पालच आली . कारण हा प्रसंग असाच घरी घडला आहे . फक्त आमचे बाबा खरोखरचे शूर असल्याने आईला दरवाज्याला कडी लावण्याची वेळ आली नाही .

मला वाटतं जयवंत दळवींची टवळी आणि टवळ्याची मस्त गोष्ट आहे.
" अगं टवळे" हे भांडणात आहे, मैत्रीत आहे की लाडात आहे यावर त्याचे संदर्भ बदलतात..
Just Like 'He is an Old Rascal.'

>>>>>" अगं टवळे" हे भांडणात आहे, मैत्रीत आहे की लाडात आहे यावर त्याचे संदर्भ बदलतात..
ओह गॉट इट.

टवळे शब्द मला नाही आवडला Sad कधी वापरात सहजगत्या आलेला नव्हता.>> सामो, वाचन कमी पडतंय हां Wink असे शब्द संग्रही असले की साधं बोलणंही लक्षवेधी होते. घरातल्या तरूण पिढीवर tried and tested Lol

धन्यवाद लोकहो!
खरंच सांगते मलाही पालीलाच मुख्य भुमिका द्यायची होती. पण तो शब्द लिहितानाही कसंसंच होतं मला म्हणून उंदराला तो रोल दिला.

>>>>>पण तो शब्द लिहितानाही कसंसंच होतं मला
+ १०० फार किळसवाणा प्राणी आहे.

>>>>>सामो, वाचन कमी पडतंय हां Wink
अगं नाही ऐकलाय हा शब्द मजेतमजेत. पण ... नाही आवडत. मी हा शब्द ऐकला तेव्हा कॉन्टेक्स्ट फार मजेचा पण टोकेरी हेटाळणीचा होता.